Homeनांदेड‘leopard fake Photo’ : हिमायतनगर : परमेश्वर मंदिर कमानीजवळ बिबट्या दिसल्याचा फोटो...

‘leopard fake Photo’ : हिमायतनगर : परमेश्वर मंदिर कमानीजवळ बिबट्या दिसल्याचा फोटो ‘फेक’ – वन विभागाची स्पष्टता

हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील श्री परमेश्वर मंदिर कमानीजवळ बिबट्या फिरत असल्याचा एक फोटो शुक्रवारी सायंकाळपासून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. व्हॉट्सअॅप ग्रुपसह विविध प्लॅटफॉर्मवर पसरलेल्या या फोटोमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र वन विभागाच्या तपासणीनंतर हा फोटो पूर्णपणे बनावट व AI जनरेटेड असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुरुवारी रात्री सुमारे १ वाजता मुख्य हिमायतनगर शहरातील मुख्य प्रवेश कमानीजवळ बिबट्या दिसल्याचा दावा करत हा फोटो मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड करण्यात आला. यामुळे शहरात संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अमोल कदम यांनी तात्काळ पथक पाठवून प्रत्यक्ष ठिकाणी पडताळणी केली.

तपासात समोर आले की, संबंधित फोटोत दाखवलेले ठिकाण खरे असले तरी प्रत्यक्षात एका कुत्र्याचा फोटो मॉर्फ करून बिबट्यासारखा दाखवण्यात आला आहे. हा संपूर्ण फोटो AI च्या सहाय्याने तयार केला गेल्याचे निष्पन्न झाले आहे.

वन विभागाने स्पष्ट केले की, हिमायतनगर तालुक्यातील काही भागात बिबट्यांचा वावर असल्याचे नाकारता येत नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणारे फेक, मॉर्फ केलेले किंवा AI जनरेटेड फोटो , व्हिडीओ पूर्णपणे दिशाभूल करणारे आहेत. अशा संदेशांना नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, तसेच भीती पसरवणारे मेसेज फॉरवर्ड न करता तत्काळ थांबवावेत.

वन विभागाचे आवाहन : सत्य माहितीसाठी केवळ वन विभागाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवा. अनावश्यक भीती व अफवा पसरवू नका. जबाबदार नागरिक म्हणून सोशल मीडियाचा वापर संयमाने करा. अफवा थांबवा, सुरक्षित राहा. वन विभागाच्या या तातडीच्या पडताळणीनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शहरातील वातावरण पुन्हा सामान्य होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments