Sunday, June 28

Tag: near the arch of the God Temple is ‘fake’

‘leopard fake Photo’ : हिमायतनगर : परमेश्वर मंदिर कमानीजवळ बिबट्या दिसल्याचा फोटो ‘फेक’ – वन विभागाची स्पष्टता

‘leopard fake Photo’ : हिमायतनगर : परमेश्वर मंदिर कमानीजवळ बिबट्या दिसल्याचा फोटो ‘फेक’ – वन विभागाची स्पष्टता

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील श्री परमेश्वर मंदिर कमानीजवळ बिबट्या फिरत असल्याचा एक फोटो शुक्रवारी सायंकाळपासून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. व्हॉट्सअॅप ग्रुपसह विविध प्लॅटफॉर्मवर पसरलेल्या या फोटोमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र वन विभागाच्या तपासणीनंतर हा फोटो पूर्णपणे बनावट व AI जनरेटेड असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी रात्री सुमारे १ वाजता मुख्य हिमायतनगर शहरातील मुख्य प्रवेश कमानीजवळ बिबट्या दिसल्याचा दावा करत हा फोटो मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड करण्यात आला. यामुळे शहरात संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अमोल कदम यांनी तात्काळ पथक पाठवून प्रत्यक्ष ठिकाणी पडताळणी केली. तपासात समोर आले की, संबंधित फोटोत दाखवलेले ठिकाण खरे असले तरी प्रत्यक्षात एका कुत्र्याचा फ...
error: Content is protected !!