धार्मिकनांदेड

Nine-day Ganesha immersion : ढोल-ताशांच्या गजरात नऊ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील शहापूर येथील नव गणेश मंडळाच्या वतीने नऊ दिवस भाविक भक्तीभावाने आरती, पूजा-अर्चा, विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवसाचा गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.

नऊ दिवस गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. सकाळ-संध्याकाळ आरती, लहान बाल गोपाळांसाठी खुर्ची रेस, चमचा-गोटी स्पर्धा, तसेच महिलांसाठी भक्ती संगीतावर ढोल ताशाच्या तालावर नृत्यस्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

IMG 20250904 WA0046 scaled Nine-day Ganesha immersion : ढोल-ताशांच्या गजरात नऊ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

आज ढोल-ताशांच्या गजरात, जयजयकाराच्या घोषणा देत आणि भक्तीभावाने भरलेल्या वातावरणात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला, पुरुष, तरुण मंडळी मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस निरीक्षक मारोती मुढे, पोलीस उपनिरीक्षक फड, महिला पोलीस अधिकारी व पोलीस होमगार्ड यांचा विशेष बंदोबस्त तैनात होता.

IMG 20250904 193115 scaled Nine-day Ganesha immersion : ढोल-ताशांच्या गजरात नऊ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

IMG 20250904 WA0043 scaled Nine-day Ganesha immersion : ढोल-ताशांच्या गजरात नऊ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!