Thursday, June 25

Tag: of drums and cymbals

Teacher felicitated : ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून शिक्षकाचा सत्कार

Teacher felicitated : ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून शिक्षकाचा सत्कार

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील गोंडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक संतोष शेषराव गंधे यांना शैक्षणिक क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याने गोंडवाडी गावाचे समस्त गावकरी व शालेय व्यवस्थापन समिती यांनी सत्कार सोहळा आयोजित करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकी द्वारे गावात हृदय सत्कार केला. यावेळी गावातील सरपंच,उपसरपंच, व्यवस्थापन समिती, सहकारी शिक्षक,ज्येष्ठ नागरिक, पालक व विद्यार्थ्यांनी मनोगत मांडताना“गुरु म्हणजे समाजाच्या भवितव्याचा शिल्पकार, ज्ञानदीप प्रज्वलित ठेवणारा तेजस्वी दीपस्तंभ”अशी उपाधी गंधे सरांना दिली. सत्कारानंतर संतोष गंधे यांनी सांगितले की,“विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे.गावकऱ्यांचे सहकार्य आणि मुलांचे प्रेम हेच माझे खरे बळ आहे. हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण गावाचा ...
Nine-day Ganesha immersion : ढोल-ताशांच्या गजरात नऊ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

Nine-day Ganesha immersion : ढोल-ताशांच्या गजरात नऊ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

धार्मिक, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील शहापूर येथील नव गणेश मंडळाच्या वतीने नऊ दिवस भाविक भक्तीभावाने आरती, पूजा-अर्चा, विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवसाचा गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. नऊ दिवस गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. सकाळ-संध्याकाळ आरती, लहान बाल गोपाळांसाठी खुर्ची रेस, चमचा-गोटी स्पर्धा, तसेच महिलांसाठी भक्ती संगीतावर ढोल ताशाच्या तालावर नृत्यस्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आज ढोल-ताशांच्या गजरात, जयजयकाराच्या घोषणा देत आणि भक्तीभावाने भरलेल्या वातावरणात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला, पुरुष, तरुण मंडळी मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस निरीक्षक मारोती मुढे, पोलीस उपनिरीक्षक फड, महिला पोलीस अधिकारी व पोलीस होमगार्ड यांचा विशेष बंदोबस्त तैनात होता....
error: Content is protected !!