Om Namah Shivaya : श्री परमेश्वर मंदिरात अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञाची यशस्वी वाटचाल

IMG 20250818 111900 Om Namah Shivaya : श्री परमेश्वर मंदिरात अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञाची यशस्वी वाटचाल

हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रावण महिन्यातील धार्मिक वातावरणात श्री परमेश्वर मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. मंदिरात सुरू असलेल्या अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञाची यशस्वी वाटचाल होत असून यात दररोज शेकडो भाविक सहभागी होत आहेत. या यज्ञाचा समारोप दिनांक २१ ऑगस्ट रोजी अभिषेक, महापूजा व भव्य महाप्रसादाने होणार आहे.

पिंपळगाव येथील दत्त संस्थांचे मठाधिपती बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञाची वाटचाल सुरु आहे. अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञात सहभागी होऊन भक्तगणांनी मोठ्या श्रद्धा, विश्वास व उत्साहाने नामस्मरणात करत आहेत. मंदिर परिसरात दिवसरात्र अखंडपणे चालणारा हा जप संपूर्ण वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करीत आहे. नामजपाच्या ध्वनीमुळे संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे.

या धार्मिक उपक्रमात महिला, युवक तसेच वयोवृद्ध भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे. आयोजक मंडळाच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद व आवश्यक सोयीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. श्रावणातील या पवित्र उपक्रमामुळे परमेश्वर मंदिरात भक्तांची सतत रांग लागून राहिली असून, नामजपाचा हा महायज्ञ समाजातील एकात्मता, भक्तीभाव व श्रद्धा वृद्धिंगत करणारा ठरत आहे.

IMG 20250818 111822 Om Namah Shivaya : श्री परमेश्वर मंदिरात अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञाची यशस्वी वाटचाल

दिनांक २१ ऑगस्ट रोजी अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञाचा समारोप श्री परमेश्वरच दुःग्ध जलाभिषेक करून केला जाणार आहे. त्यानंतर भव्य महाप्रसादाने संगत होणार आहे. याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परमेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर, उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते व सर्व संचालक मंडळींनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top