Om Namah Shivaya : श्री परमेश्वर मंदिरात अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञाची यशस्वी वाटचाल
हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रावण महिन्यातील धार्मिक वातावरणात श्री परमेश्वर मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. मंदिरात सुरू असलेल्या अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञाची यशस्वी वाटचाल होत असून यात दररोज शेकडो भाविक सहभागी होत आहेत. या यज्ञाचा समारोप दिनांक २१ ऑगस्ट रोजी अभिषेक, महापूजा व भव्य महाप्रसादाने होणार आहे.
पिंपळगाव येथील दत्त संस्थांचे मठाधिपती बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञाची वाटचाल सुरु आहे. अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञात सहभागी होऊन भक्तगणांनी मोठ्या श्रद्धा, विश्वास व उत्साहाने नामस्मरणात करत आहेत. मंदिर परिसरात दिवसरात्र अखंडपणे चालणारा हा जप संपूर्ण वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करीत आहे. नामजपाच्या ध्वनीमुळे संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दुमदुमून गेला ...
