HomeनांदेडViolation of Code of Conduct : आचार संहितेचा भंग ; कंधारमध्ये अनोळखी...

Violation of Code of Conduct : आचार संहितेचा भंग ; कंधारमध्ये अनोळखी इसमाविरुद्ध भेटवस्तू वाटल्याचा गुन्हा दाखल -NNL

नांदेड| 15 ऑक्टोबरला जिल्ह्यामध्ये विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना कंधार शहरात भेटवस्तू वाटप करतानाचे एक छायाचित्र व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या छायाचित्रावरून कंधार येथे आचारसंहिता भंग करण्याचा अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंधार येथील संभाजी नगर परिसरात पिकअप व्हॅन क्रमांक नंबर एमएच 14 जीयू 7751 मधील अनोळखी इसमाने कंधार येथील संभाजीनगर कंधार येथे आदर्श आचारसंहिता आदेशाचे उल्लंघन करून नागरिकांना भेटवस्तू वाटप करीत असल्याचे फोटो व्हाट्सअपवर व्हायरल झाला. सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास समाज माध्यमावर या संदर्भातील फोटो व्हायरल झाला. त्यानंतर या परिसरात शासनाच्या वतीने फिर्यादीने प्रत्यक्ष भरारी पथकाद्वारे पाहणी केली असता सदर पिकअप व्हॅन आढळून आली नाही.

मात्र या संदर्भातील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानुसार कंधार पोलीस ठाण्यात शासनाच्या वतीने श्री. राम ज्ञानोबा वारकड वय 40 वर्षे व्यवसाय नोकरी कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी कार्यालय कंधार राहणार संगुचीवाडी तालुका कंधार यांनी दुपारी तीनच्या सुमारास गुन्हा दाखल केला. या प्रकरणी 340/2024 कलम 170, 173, 223 भारतीय न्याय संहिता BNS 2023 प्रमाणे गुन्हा दाखल केल्याची माहिती लोहा विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरूणा संगेवार यांनी दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments