Thursday, May 14

Tag: a case has been registered against Isma

Violation of Code of Conduct : आचार संहितेचा भंग ; कंधारमध्ये अनोळखी इसमाविरुद्ध भेटवस्तू वाटल्याचा गुन्हा दाखल -NNL

Violation of Code of Conduct : आचार संहितेचा भंग ; कंधारमध्ये अनोळखी इसमाविरुद्ध भेटवस्तू वाटल्याचा गुन्हा दाखल -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| 15 ऑक्टोबरला जिल्ह्यामध्ये विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना कंधार शहरात भेटवस्तू वाटप करतानाचे एक छायाचित्र व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या छायाचित्रावरून कंधार येथे आचारसंहिता भंग करण्याचा अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंधार येथील संभाजी नगर परिसरात पिकअप व्हॅन क्रमांक नंबर एमएच 14 जीयू 7751 मधील अनोळखी इसमाने कंधार येथील संभाजीनगर कंधार येथे आदर्श आचारसंहिता आदेशाचे उल्लंघन करून नागरिकांना भेटवस्तू वाटप करीत असल्याचे फोटो व्हाट्सअपवर व्हायरल झाला. सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास समाज माध्यमावर या संदर्भातील फोटो व्हायरल झाला. त्यानंतर या परिसरात शासनाच्या वतीने फिर्यादीने प्रत्यक्ष भरारी पथकाद्वारे पाहणी केली असता सदर पिकअप व्हॅन आढळून आली नाही. मात्र या संदर्भातील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानुसार कंधार पोलीस ठाण्य...
error: Content is protected !!