Friday, May 15

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Shri Dattaprabhu : दत्तबर्डी येथे ४१ किलो चांदीच्या श्री दत्तप्रभू मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न 

Shri Dattaprabhu : दत्तबर्डी येथे ४१ किलो चांदीच्या श्री दत्तप्रभू मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न 

धार्मिक, नांदेड
हदगाव (गौतम वाठोरे) हदगाव तालुक्यातील दैवतस्थळ श्री दत्तात्रेय संस्थान, दत्तबर्डी येथे ४१ किलो चांदीच्या श्री दत्तप्रभू मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा ५ नोव्हेंबर रोजी मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. हा ऐतिहासिक सोहळा महंत श्री गोपाल गिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली पार पडला. न भूतो न भविष्य असा हा सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्रासह राज्याबाहेरून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. या दिव्य प्रसंगी श्री सुभाष शुगर प्रा. लि. साखर कारखान्याचे चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख (ता. जि. धाराशिव) तसेच कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांच्या वतीने जवळपास ३५ हजार भाविकांसाठी महाप्रसादाची भव्य व्यवस्था करण्यात आली होती. प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला ४ नोव्हेंबर रोजी शिव पार्वती मंगल कार्यालयातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बँड पथक, भजनी मंडळे, ४१ घोड्यांवरील महंतांची स्वारी, तसेच...
Parmeshwar Temple : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट : मनोभावे घेतलं श्रीचं दर्शन

Parmeshwar Temple : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट : मनोभावे घेतलं श्रीचं दर्शन

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन श्रीचे मनोभावे दर्शन घेतले.या प्रसंगी त्यांनी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. भाजपच्या पक्षीय कार्यक्रमानिमित्त अशोकराव चव्हाण हिमायतनगर शहरात आले असता त्यांनी शहरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक श्री परमेश्वर मंदिरास भेट दिली. मंदिराच्या पवित्र परिसराच त्यांनी निरीक्षण करून श्री परमेश्वरांच्या चरणी नतमस्तक झाले. मंदिराच्या शेकडो वर्षांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी व धार्मिक महत्त्वाविषयी माहिती खासदार चव्हाण यांना जाणून घेतली. या वेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि श्रीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. खासदार अशोकराव चव्हाण यांनी मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ व समिती सदस्यांचे अभिनंदन करत मंद...
Kakda Aarti : श्री परमेश्वर मंदिरातील काकडा आरतीचा भव्य समारोप दिंडी मिरवणुकीने उत्साहात पार पडला

Kakda Aarti : श्री परमेश्वर मंदिरातील काकडा आरतीचा भव्य समारोप दिंडी मिरवणुकीने उत्साहात पार पडला

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हिमायतनगर शहरातील आराध्य दैवत श्री परमेश्वर मंदिरात मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या काकडा आरती उत्सवाचा समारोप सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने शहरातून पालखी दिंडी टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. या भव्य शोभायात्रेत शहरातील महिला, पुरुष, तरुण, लहान बालके तसेच विविध भजनी मंडळींनी मोठ्या श्रद्धा-भावनेने सहभाग नोंदवला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, “श्री परमेश्वराचा जयजयकार” घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दिंडी मिरवणुकीची सुरुवात मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ व सेक्रेटरी अनंतराव देवकते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. प्रारंभी मंदिरात श्री परमेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व भजन सादर करून दिंडीची सुरुवात झाली. त्यानंतर दिंडीने शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ, बसस्थानक परिसर, तसेच विविध गल्लीबो...
Warkari couple : पोटा (बु.) गावातील वारकरी दांपत्याचा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते भव्य सत्कार

Warkari couple : पोटा (बु.) गावातील वारकरी दांपत्याचा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते भव्य सत्कार

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| यावर्षीच्या कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुख्यमंत्री मा. एकनाथ भाई शिंदे साहेब व त्यांच्या परिवारासोबत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या महापूजेचा मान मिळविण्याचे भाग्य पोटा (बु.) येथील मानाचे वारकरी दांपत्य श्री. रामराव बसाजी वालेगावकर व सौ. सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना लाभले. या अनोख्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते वालेगावकर दांपत्याचा सन्मान करण्यात आला. सत्कार कार्यक्रमास तालुक्यातील व जिल्ह्यातील मान्यवर, वारकरी, संतप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार सोहळ्यात बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले, “पोटा (बु.) गावासह संपूर्ण तालुका व विधानसभा क्षेत्राचे हे मोठे भाग्य आहे की आपल्या गावातील वारकरी दांपत्याला ...
Laxman Shakti Program : लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम श्रीक्षेत्र बोरगडी येथे शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबरला

Laxman Shakti Program : लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम श्रीक्षेत्र बोरगडी येथे शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबरला

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) तालुक्यातील तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असलेल्या मौजे श्रीक्षेत्र बोरगडी (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे धार्मिक उत्साहात लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता होणार आहे. या प्रसंगी श्रीराम भक्तीचा उत्सव, हनुमानाच्या पराक्रमाची कथा आणि लक्ष्मण शक्तीचा प्रसंग यांचे प्रभावी सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गावातील सर्व श्रद्धाळू व युवक मंडळींनी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू केली आहे. लक्ष्मण शक्ती कार्यक्रम दरम्यान “जय श्रीराम, जय हनुमान!” या घोषणांनी परिसर भक्तिभावाने दुमदुमणार असून, श्रद्धाळूंमध्ये या कथेबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरातील भाविक-भक्त, वाचक-सुचक आणि श्रोते मंडळीं, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लक्ष्मण शक्तीचे दर्श...
Welcome : सुकनी ते कपिलधार पदयात्रेचे शहापूरमध्ये जंगी स्वागत

Welcome : सुकनी ते कपिलधार पदयात्रेचे शहापूरमध्ये जंगी स्वागत

धार्मिक, नांदेड
देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| सुकनी ते कपिलधार या पारंपरिक पदयात्रेचे शहापूरवासीयांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. कार्तिक पौर्णिमेनिमित्त बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी ही पदयात्रा निघाली आहे. या यात्रेत सहभागी झालेले भाविक सुकनी, शेळगाव, शहापूर, वनाळी, सुगाव, एकलारा, मोटरगा, चाडोळा, मुखेड, सावरगाव, जाब, हाडोळती, शिरूर, चापोली, चाकूर, वाढवणा, वडवळ, गंगाखेड, परळी, आबाजोगाई आणि माजरसुबा या मार्गावरून पंधरा दिवस सतत चालत बीड जिल्ह्यातील कपिलधारकडे वाटचाल करत आहेत. या पदयात्रेदरम्यान सुमारे अडीचशे ते तीनशे किलोमीटरचे अंतर भाविक पार करतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील लाखो भाविक कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमेला दर्शनासाठी दाखल होतात. शहापूर येथे आलुर येथील शिक्षक राजू अजगरे यांच्या वतीने दिंडीचे स्वागत क...
Restoration of Datta idol : श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी येथे दत्त मूर्तीचा जीर्णोद्धार : ४१ किलो चांदीच्या दत्त मूर्तीची स्थापना ५ नोव्हेंबर रोजी होणार

Restoration of Datta idol : श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी येथे दत्त मूर्तीचा जीर्णोद्धार : ४१ किलो चांदीच्या दत्त मूर्तीची स्थापना ५ नोव्हेंबर रोजी होणार

नांदेड, धार्मिक
हदगांव, गौतम वाठोरे| हदगाव तालुक्याचे दैवत असलेल्या श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी येथील प्रसिद्ध मंदिरात श्री श्री १००८ महंत श्रीगोपाळगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली दत्त मूर्तीचा जिर्णोद्धार सोहळा ५ नोव्हेंबर रोजी होणार असून त्यानिमित्त आज दिनांक २९ ऑक्टोबर रोजी बुधवारपासून दत्तनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे. हदगाव शहरालगत निसर्गरम्य वातावरणामध्ये दत्तबर्डीच्या टेकडीवर श्री दत्तात्रयाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराला शेकडो वर्षाची परंपरा आहे. दत्तात्रयांचे हे मोठे घर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात अनेक वर्षांपूर्वी बनवलेली मूर्ती आहे या मूर्तीला बदलण्याची गरज असल्याचे सर्व भक्त गणांच्या आणि खुद्द श्री श्री १००८ महंत महाराजांच्या लक्षात आले. त्यासाठी दत्त भक्तांची बैठक घेऊन सर्वांच्या सहयोगाने महंत श्रीगोपाळगिरी महाराजांनी ४१ किलो चांदीची मूर्ती बसवण्याचा संकल्प केला. त्यासाठी सर्...
Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा बहु मान पोटा बु येथील शेतकरी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा बहु मान पोटा बु येथील शेतकरी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना

नांदेड, धार्मिक, पुणे
हिमायतनगर (अनिल मादसवार) कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे भाविकांच्या मोठ्या गर्दीत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याच्या पोटा बु गावातील अल्पभूधारक शेतकरी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय पूजेचा मान मिळाला आहे. गेल्या विस वर्षांपासून अखंड पायी वारी करणाऱ्या या वारकरी दांपत्याला यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सपत्नीक शासकीय पूजेचा बहुमान मिळाला. हिमायतनगर तालुक्यातील वारकरी संप्रदायामध्ये हा पहिलाच शासकीय पूजेचा मान असल्याने या दांपत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भक्तीभावाने दरवर्षी आषाढी व कार्तिकी वारी करणाऱ्या वालेगावकर दांपत्याने सांगितले, “गेल्या विस वर्षांपासून आम्ही विठ्ठल चरणी जात आहोत. आज कार्तिकी एकादशीला आम्हाला ‘मानाचा वारकरी’ म्हणून पुजेचा मान मिळाला. हे आमच्यासाठी विठ्ठलाचे आशीर्वाद आहे.” विशेष म्हणजे या शासकीय पूज...
Birth Anniversary : गुरु नानक देव जी महाराज यांच्या ५५६ व्या जन्मोत्सवानिमित्त नांदेडहून बिदरकडे धार्मिक चौकी रवाना होणार

Birth Anniversary : गुरु नानक देव जी महाराज यांच्या ५५६ व्या जन्मोत्सवानिमित्त नांदेडहून बिदरकडे धार्मिक चौकी रवाना होणार

धार्मिक, नांदेड
नांदेड (प्रतिनिधी) तख्त सचखंड श्री हजूर अबिचल नगर साहिब, नांदेड येथून श्री गुरु नानक देव जी महाराज यांच्या ५५६ व्या जन्मोत्सव (प्रकाशपर्व) निमित्ताने आयोजित धार्मिक चौकी दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरुद्वारा नानकझीरा साहिब, बिदर येथे जाणार आहे. या यात्रेसाठी गुरुद्वारा बोर्डातर्फे फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे (क्र. ०७६१५ – ०७६१६) ची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेसाठी विशेष धार्मिक बोगी व सलून जोडण्यात येणार असून यात्रेचा लाभ घेण्यासाठी भाविकांना ०४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७:०० वाजता नांदेड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १ वर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात्रेपूर्वी सकाळी ०७:०५ वाजता तख्त सचखंड साहिब येथे अरदास करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ०८:३० वाजता चौकी रेल्वेने बिदरकडे रवाना होईल. गुरुद्वारा नानकझीरा साहिब येथे दि. ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री गुरु नानक देव जी महाराज...
Rashtrasant tukadoji maharaj : हिमायतनगर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुसंस्कार शिबिराचा भव्य समारोप

Rashtrasant tukadoji maharaj : हिमायतनगर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुसंस्कार शिबिराचा भव्य समारोप

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर (प्रतिनिधी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त हिमायतनगर येथे आयोजित सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप गुरुवारी शहरातून भव्य रामधून दिंडी व नामजप सोहळ्याने करण्यात आला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. गेल्या सात वर्षांपासून हिमायतनगर येथे गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सात दिवसीय सुसंस्कार शिबिराचे आयोजन करत आहे. यंदाचे शिबिर २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान पार पडले. या शिबिरामध्ये हिमायतनगर तालुक्यातील २० गावांतील मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. शिबिरात विद्यार्थ्यांना “आपले संस्कार” या विषयासह अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ग्रामगीता काळाची गरज, प्लास्टिक मुक्ती व पर्यावरण संवर्धन, खेळ – कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, क्रिकेट...
error: Content is protected !!