नांदेड (प्रतिनिधी) तख्त सचखंड श्री हजूर अबिचल नगर साहिब, नांदेड येथून श्री गुरु नानक देव जी महाराज यांच्या ५५६ व्या जन्मोत्सव (प्रकाशपर्व) निमित्ताने आयोजित धार्मिक चौकी दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरुद्वारा नानकझीरा साहिब, बिदर येथे जाणार आहे.


या यात्रेसाठी गुरुद्वारा बोर्डातर्फे फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे (क्र. ०७६१५ – ०७६१६) ची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेसाठी विशेष धार्मिक बोगी व सलून जोडण्यात येणार असून यात्रेचा लाभ घेण्यासाठी भाविकांना ०४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७:०० वाजता नांदेड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १ वर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


यात्रेपूर्वी सकाळी ०७:०५ वाजता तख्त सचखंड साहिब येथे अरदास करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ०८:३० वाजता चौकी रेल्वेने बिदरकडे रवाना होईल.


गुरुद्वारा नानकझीरा साहिब येथे दि. ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री गुरु नानक देव जी महाराज यांचा ५५६ वा प्रकाशपर्व मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. धार्मिक कार्यक्रमानंतर ही चौकी परतीच्या स्पेशल रेल्वेने दि. ०६ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२:०० वाजता बिदर येथून नांदेडकडे रवाना होईल आणि रात्री सुमारे ०९:०० वाजता नांदेड येथे आगमन होईल.


गुरुद्वारा बोर्डाने भाविकांना आवाहन केले आहे की, यात्रेदरम्यान सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून शिस्त आणि सुचनांचे पालन करावे व या पवित्र यात्रेचा लाभ घ्यावा.


