Sunday, May 17

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Parmeshwar temple news : श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे काकडा आरतीत सहभागी महिलांना साड्यांचे वाटप

Parmeshwar temple news : श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे काकडा आरतीत सहभागी महिलांना साड्यांचे वाटप

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) श्री परमेश्वर मंदिरात अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेल्या काकड आरती कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांचा गौरव करण्यासाठी आज, गुरुवारी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे साड्यांचे वितरण करण्यात आले. गृहिणी पहाटे सडा-सारवण करून, रांगोळीने घराची शोभा वाढवून शहरातून येणाऱ्या काकडा दिंडीचे स्वागत करतात. तर अनेक महिला मंडळी श्री परमेश्वर सह शहरातील इतर मंदिरात जाऊन काकडा आरतीत सहभागी होतात. विविध भक्तिगीते व आरत्या गात ग्रामस्थांना जागविण्याची ही एक सांप्रदायिक परंपरा जोपासत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री परमेश्वर मंदिरात आयोजित काकड आरती उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भक्तिभावाने आरती, भजन आणि प्रार्थनेत सहभाग घेणाऱ्या महिलांचा सन्मान म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी ट्रस्टच्या पदस...
Ghuman Yatra ; घुमान यात्रा” आज २७ ऑक्टोबर पासून पंजाब दौऱ्यावर : नानक साई फाऊंडेशन चा अद्वितीय उपक्रम

Ghuman Yatra ; घुमान यात्रा” आज २७ ऑक्टोबर पासून पंजाब दौऱ्यावर : नानक साई फाऊंडेशन चा अद्वितीय उपक्रम

नांदेड, धार्मिक
नांदेड l महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी नानक साई फाऊंडेशन ची नांदेड (हजुर साहिब) ते अमृतसर व्हाया नरसी नामदेव हि ११ वी "घुमान यात्रा" आज २७ ऑक्टोबर २०२५ रोजी नांदेड येथून गंगानगर एक्सप्रेस ने पंजाब हरियाणा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे. सर्व धर्म मानवतावादी असतात. ते समाजासमाजाला जोडण्याचे काम करतात. संत नामदेव यांनी मराठीची पताका थेट पंजाबपर्यंत नेली.त्यांच्या कार्याची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी नानकसाई फौंडेशन दरवर्षी "ना नफा ना तोटा" या पध्दतीने घुमानयात्रा आयोजित करते ही बाब ऐतिहासिक आहे. दहा दिवसांची घुमानयात्रा हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. आजवर या यात्रेत सुमारे ४ हजार जण सहभागी झालेले आहेत. नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी नियमितपणे ही यात्रा मोठ्या उत्सा...
Marathi-Punjabi : मराठी-पंजाबी भाषा व संस्कृतीचा अनुबंध म्हणजे ‘संत नामदेव‘ घुमान यात्रा : ज्येष्ठ साहित्यिक प्रा डा.जगदीश कदम यांचे प्रतिपादन

Marathi-Punjabi : मराठी-पंजाबी भाषा व संस्कृतीचा अनुबंध म्हणजे ‘संत नामदेव‘ घुमान यात्रा : ज्येष्ठ साहित्यिक प्रा डा.जगदीश कदम यांचे प्रतिपादन

नांदेड, धार्मिक
नांदेड l 'नानकसाई फाऊंडेशनच्या संत नामदेव घुमान सद्भावना यात्रेच्या माध्यमातून पंढरीनाथ बोकारे मराठी आणि पंजाबी भाषा आणि संस्कृतीचा उत्तम अनुबंध जोडत आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डा.जगदीश कदम यांनी नरसी नामदेव येथे आयोजित संत नामदेव सद्भावना परिषदेत केले. महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी नानक साई फाऊंडेशन ची नांदेड (हजुर साहिब) ते अमृतसर व्हाया नरसी नामदेव हि ११ वी "घुमान यात्रा" २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पंजाब हरियाणा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे. काल नरसी नामदेव (हिंगोली) येथे नामदेव मंदिरात पूजा आरती करून यात्रेचा आरंभ करण्यात आला. दरम्यान ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली संत नामदेव सद्भावना परिषद झाली. महानुभाव पंथाचे अभ्यासक डॉ प्रा संजय जगताप, नरसी नामद...
fund handed over : एक कोटीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

fund handed over : एक कोटीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर l महाराष्ट्रात राज्यात पावसाळ्यात अतिवृष्टी पुराचे पाणी यासह इतर कारणांनी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते यासाठी शेतकऱ्यांना नागरिकांना मदत व्हावी म्हणून माहुर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान कडून मुख्यमंत्री सहायता निधीत एक कोटीचा निधी देण्याची जाहीर करण्यात आले होते या अनुषंगाने रेणुका देवी संस्थानचे कार्यकारी मंडळ आणि विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी नागपूर येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन एक कोटीचा धनादेश दि 20 रोजी त्यांचे सुपूर्द केल्याने श्री रेणुका देवी संस्थानच्या कार्यकारी मंडळ विश्वस्त मंडळाचे अभिनंदन होत आहे श्री रेणुकाची संस्थान मंदिरात आल्यानंतर भाविकांना सुविधा सुरक्षा मिळाव्यात भाविकांना आनंदात दर्शन घेता यावे यासाठी श्री रेणुका देवी संस्थान दिवसेंदिवस गडावर सुविधात वाढ करत आहे तसेच अनेक वेळा शाळा अंगणवाड्या यासह भाविकांना देण्यात...
Bandichhod : तख्त सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड येथे बंदीछोड दिवस (दीपावली) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Bandichhod : तख्त सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड येथे बंदीछोड दिवस (दीपावली) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

नांदेड, धार्मिक
नांदेड| तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब, नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बंदीछोड दिवस (दीपावली) उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दीपमाला महल्ल्याला तोफांची सलामी देण्यात आली. गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (IAS Retd.) यांनी सांगितले की, जगभरातील हजारो भाविकांनी तख्त साहिब येथे दीपप्रज्वलन करून गुरु हरगोबिंद साहिब जींच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या दिवशी गुरु हरगोबिंद साहिब जींनी ५२ हिंदू राजांसह ग्वाल्हेर किल्ल्यातून मुक्तता मिळवून श्री अमृतसर साहिब गाठले होते. त्या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ दरवर्षी बंदीछोड दिवस साजरा केला जातो. दीपमाला महल्ला दुपारी ४ वाजता भाई ज्योतिंदर सिंघ जी यांच्या अरदासनंतर निघाला. यात निशानची सिंघ, सोन्या-चांदीच्या खोगीर लावलेले घोडे, कीर्तनी मंडळ, गतका, बँड पथक आणि देश-विदे...
Sant Namdev’ Ghuman Yatra ; ११ व्या ‘संत नामदेव‘ घुमान यात्रेचा १७ ऑक्टोबर रोजी नरसी नामदेव येथून आरंभ

Sant Namdev’ Ghuman Yatra ; ११ व्या ‘संत नामदेव‘ घुमान यात्रेचा १७ ऑक्टोबर रोजी नरसी नामदेव येथून आरंभ

नांदेड, धार्मिक
नांदेड l महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी नानक साई फाऊंडेशन ची नांदेड (हजुर साहिब) ते अमृतसर ११ वी ‘संत नामदेव‘ घुमान यात्रा २७ ऑक्टोबर रोजी पंजाब हरियाणा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान उद्या शुक्रवार,१७ ऑक्टोबर २०२५ रोजी नरसी नामदेव येथे नामदेव मंदिरात पूजा आरती करून यात्रेचा आरंभ होणार आहे अशी माहिती नानक साई फाऊंडेशनचे उपाध्यक्ष कवी शिवाजी कऱ्हाळे यांनी दिली आहे. नांदेड येथील सामाजिक धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेले नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे (ज्येष्ठ पत्रकार) यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी नियमितपणे ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. आतापर्यंत दहा यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, यंदाची अकरावी यात्रा आहे. 🔹 प्रमुख वैशिष्ट्ये संत नामदेव महाराजांच्या पवित्र कर्मभूमी घुमान (पंजाब) येथे नतमस्तक होणे. सु...
Agdambbuwa : श्री. संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण आणि रक्तदान शिबीराचे आयोजन

Agdambbuwa : श्री. संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण आणि रक्तदान शिबीराचे आयोजन

धार्मिक, नांदेड
उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर बुद्रुक ता. लोहा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हिमवंत वैराग्य पिठाधीश्वर श्री. श्री. श्री. १००८ जगद्गुरु भीमाशंकर महास्वामीजी शिवाचार्य रत्न श्री. ष. ब्र. प्र. षडाक्षरी शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात दि. १८ ऑक्टोबर २०२५ ते २५ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या श्री. संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यक्रम दि. २४ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सायं. सात वाजता अग्नी पुजा करुन अग्नी प्रज्वलित करण्यात येईल. व रात्रभर संगीत भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आणि दुसऱ्या दिवशी दिनांक २५ ऑक्टोबर शनिवारी सकाळी पाच वाजता पालखीचे अग्नीतुन प्रवेश व पालखीचे गावातील प्रमुख रस्त्याने वाजंत्रीच्या आणि टाळ मृदुंगाच्या संगीत भजनाच्या निनादात मिरवणूक नि...
Parmeshwar temple news : उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ तसेच सचिव अनंता देवकते यांची सर्वानुमते पुनर्नियुक्ती

Parmeshwar temple news : उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ तसेच सचिव अनंता देवकते यांची सर्वानुमते पुनर्नियुक्ती

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर | येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वार्षिक बैठकीत उपाध्यक्ष आणि सचिव या पदांवर फेरनिवडीचा कार्यक्रम तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ तसेच सचिव म्हणून अनंता देवकते यांची सर्वानुमते पुनर्नियुक्ती करण्यात आली. निवडींनंतर स्वागत करून अनेकांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. मागील अनेक वर्षांपासून येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचा कारभार प्रसिद्ध व्यापारी श्री महाविरचंद श्रीश्रीमाळ हे सांभाळत आहेत. त्यांच्या कुशल कार्यशैलीमुळे श्री परमेश्वर मंदिराचा कायापालट होऊन उत्पन्नात मोठी भर पडली आहे. येथील मंदिराचा कारभार धर्मदाय आयुक्तांच्या निगराणीखाली तहसीलदार यांच्या अध्यक्षेतेखाली चालविला जात आहे. दर तीन वर्षाला मंदिराचे उपाध्यक्ष व सेक्रेटरी पदाची निवड केली जाते. यंदाही तीन वर्षाचा कार्यकाळ संपल्...
श्री संत सेवालाल महाराज स्मारकाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल

श्री संत सेवालाल महाराज स्मारकाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल

धार्मिक, नांदेड
भोकर l भोकर येथील श्री संत सेवालाल महाराज स्मारकाच्या बांधकामाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. या निर्णयाचे खा. अशोकराव चव्हाण यांनी स्वागत केले असून, बंजारा समाजात आनंद व्यक्त केला जातो आहे. न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह व न्या.एस.व्ही.एन. भट्टी यांच्या खंडपिठाने ही याचिका अर्थहीन असल्याचे सांगून निकाली काढली. या निर्णयामुळे निर्माणाधीन असलेल्या या स्मारकाच्या पुढील बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून भोकर येथील नगर परिषदेच्या मालकीचा भूखंड श्री संत सेवालाल महाराज स्मारक तथा सामाजिक सभागृहासाठी देण्यात आला होता. सुमारे ७ कोटी रुपये अंदाजित खर्च असलेल्या या स्मारकाचे १७ ऑगस्ट २०२४ रोजी तत्कालीन पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य आ. ब...
Maharishi Valmiki Jayanti ; हरडप येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

Maharishi Valmiki Jayanti ; हरडप येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर l माहुर तालुक्यातील हरडप या गावी भगवान महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सुरवातीला गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी भगवान महर्षी वाल्मिकी यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून वंदन केले व नंतर सर्व गावाला नगर भोजन देऊन रात्री गावात मिरवणूक दि 10 रोजी काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील सर्व नवयुवक तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.हि जयंती यशस्वी करण्यासाठी राजुभाऊ पिसरवाड, विजय पिसरवाड, चंद्रभान निलेवाड, सतिष निलेवाड, रामकृष्ण अबनबोईनवाड, गजानन अबनबोईनवाड, गजानन निलेवाड,यादव दिपेवाड, गजानन दिपेवाड सुरज नाईनवाड, धनराज मोगेवाड , संदिप पिसरवाड, आकाश निलेवाड सुधाकर निलेवाड, प्रमोद निलेवाड कमलेश निलेवाड, देव कुमार पिसरवाड संतोष शेंडे, प्रभाकर शेंडे या गावातील तरुणांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला...
error: Content is protected !!