HomeनांदेडSant Namdev' Ghuman Yatra ; ११ व्या ‘संत नामदेव‘ घुमान यात्रेचा १७...

Sant Namdev’ Ghuman Yatra ; ११ व्या ‘संत नामदेव‘ घुमान यात्रेचा १७ ऑक्टोबर रोजी नरसी नामदेव येथून आरंभ

नांदेड l महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी नानक साई फाऊंडेशन ची नांदेड (हजुर साहिब) ते अमृतसर ११ वी ‘संत नामदेव‘ घुमान यात्रा २७ ऑक्टोबर रोजी पंजाब हरियाणा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान उद्या शुक्रवार,१७ ऑक्टोबर २०२५ रोजी नरसी नामदेव येथे नामदेव मंदिरात पूजा आरती करून यात्रेचा आरंभ होणार आहे अशी माहिती नानक साई फाऊंडेशनचे उपाध्यक्ष कवी शिवाजी कऱ्हाळे यांनी दिली आहे.

नांदेड येथील सामाजिक धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेले नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे (ज्येष्ठ पत्रकार) यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी नियमितपणे ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. आतापर्यंत दहा यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, यंदाची अकरावी यात्रा आहे.

🔹 प्रमुख वैशिष्ट्ये
संत नामदेव महाराजांच्या पवित्र कर्मभूमी घुमान (पंजाब) येथे नतमस्तक होणे. सुवर्ण मंदिर, अमृतसर येथे दर्शन व वाघा बॉर्डरवर राष्ट्रभक्तीचा थरारक अनुभव. दिल्ली,चंदिगड, भटिंडा, आनंदपूर साहिब, फतेहगड साहिब, जालियनवाला बाग या महत्त्वाच्या स्थळांना भेट. रामतीर्थ (लव–कुश जन्मस्थळ), वाल्मिकी आश्रम, भद्रकाली माता मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, नैना देवी शक्तीपीठ, भाक्रा नांगल धरण, पानिपत, कुरुक्षेत्र आदी ठिकाणांचा यात्रेत समावेश आहे.

पंजाबच्या पर्जिया कलान गावातील मुक्काम – तेथील संस्कृती व पाहुणचार जवळून अनुभवण्याची संधी यात्रेच्या माध्यमातून मिळणार आहे.श्रद्धा, संस्कृती आणि आनंदाचा संगम हि घुमान यात्रेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पंजाब चे मुखयमंत्री सरदार भगवंतसिंघ मान यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री श्रीमती हरपालकौर मान यावर्षी घुमान यात्रे चे संगरुर येथे स्वागत करणार आहेत.

या यात्रेला लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी एवं संत बाबा बलविंदर सिंघ जी, संत बाबा कश्मीरसिंघ जी भुरीवाले, संत बाबा गुरुदेवसिंघ जी आनंदपूर साहिब, संत बाबा बलबिरसिंघ जी,संत बाबा सतमानसिंघ जी पिपली साहिब, संत बाबा जोगासिंघ जी कर्नालवाले यांचा कृपा आशीर्वाद आहे.
घुमान सद्भावना यात्रा ही केवळ धार्मिक दर्शनापुरती मर्यादित यात्रा नसून भक्ती, इतिहास, कला, संस्कृती व मनोरंजन यांचा संगम घडवून आणते.

परिवारासह पर्यटनासाठी योग्य अशी ही कौटुंबिक सहल दरवर्षी शेकडो भाविकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरते. प्रत्येक टप्प्यावर पंजाब सरकार, विविध सामाजिक संस्था आणि संत मंडळींच्या वतीने यात्रेचे उत्साहाने स्वागत केले जाते. त्यामुळे यात्रेच्या दरम्यान भाविकांना पंजाबच्या मेहमाननवाजीचा आणि सांस्कृतिक परंपरेचा थेट अनुभव मिळतो.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील सुमारे २४८ भाविक यात्रेत सहभागी होणार आहेत. मागील दहा यात्रांमधून चार हजारांहून अधिक मराठी भाविकांना पंजाब हरियाणा राज्यातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे आणि संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीचे दर्शन घडविण्यात नानक साई फाऊंडेशनला यश आले आहे. भक्ती, संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा संगम अनुभवण्यासाठी, तसेच पंजाबी पाहुणचाराचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी यंदाच्या यात्रेत सहभागी होण्याचे असे आवाहन आयोजक समितीने (९८२३२६००७३) केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments