Kakda Dindi : काकडा दिंडीने सकाळच्या प्रहरी हिमायतनगरात घुमू लागले हरीनामाचे स्वर
हिमायतनगर, अनिल मादसवार | अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या समाप्तीनंतर अभ्यंगस्नानाने हिमायतनगर शहरात वारकरी संप्रदायाच्या महिला-पुरुष भजनी मंडळाने काकडा दिंडीचा शुभारंभ केला आहे. सकाळच्या रामप्रहरी टाळ-मृदंगाच्या निनादात “हरी नाम” घुमू लागल्याने दिवाळीच्या पर्वकाळात संपूर्ण शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.
शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धा-भावनेने पाळली जाते. सकाळच्या प्रहरी टाळ-मृदंगाच्या गजरात काढल्या जाणाऱ्या काकडा दिंडीत सहभागी होऊन देवी-देवतांचे दर्शन घेतल्याने मोक्ष मिळतो, अशी जनमान्यता आहे. श्री परमेश्वर मंदिर, महाकाली मंदिर आणि कालिंका मंदिर या प्रमुख देवस्थानांमधून ही दिंडी काढली जाते. टाळ-मृदंग, आरती आणि भक्तिगीतांच्या सान्निध्यात अबालवृद्ध आणि बालकही भगवा झेंडा हाती घेऊन दिंडीत सहभागी होतात.
गृहिणी पहाटे सडा-सारवण करून, रांगोळीने ...









