Maharishi Valmiki : भुत्याचीवाडी येथील श्री. खंडोबा मंदिर सभागृहात महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी

IMG 20251008 WA0023 Maharishi Valmiki : भुत्याचीवाडी येथील श्री. खंडोबा मंदिर सभागृहात महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी

उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे भुत्याचीवाडी ता. कंधार येथील श्री. खंडोबा मंदिर सभागृहात महादेव कोळी समाजाचे दैवत असलेल्या महर्षी वाल्मिकी ॠषी यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली.

यावेळी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन पोलिस पाटील कैलास कागदेवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. सरपंच माधव भुते , सरपंच प्रतिनिधी विश्वनाथ लामदाडे , वैभव मामिलवाड , सुभाष गडमवाड , मारोती गडमवाड , गोविंद कागदेवाड , परशुराम गडमवाड , लोकडु भुते , अंकुश गडमवाड, रत्नाकर गडमवाड , प्रभु गडमवाड , दत्तात्रय करेवाड , शामराव गडमवाड , माणिक गडमवाड , यांनी महर्षि वाल्मिकी ॠषी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी पोलीस पाटील कैलास कागदेवाड यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी गावातील तरुण, नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top