HomeनांदेडShri Sai Baba Samadhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री...

Shri Sai Baba Samadhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

अहिल्यानगर। केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी गुरूस्थानचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

त्यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) गिरीश महाजन , पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे होते.

amit 1 Shri Sai Baba Samadhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

श्री साईबाबा संस्थानच्यावतीने शाह यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.

 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments