HomeनांदेडNavratri visarjan : हिमायतनगरात नवरात्र विसर्जनावेळी गोंधळ ; आमदारांच्या हस्तक्षेपानंतर समाधान

Navratri visarjan : हिमायतनगरात नवरात्र विसर्जनावेळी गोंधळ ; आमदारांच्या हस्तक्षेपानंतर समाधान

हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरात नवरात्रोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. महिला व मुलींनी भक्तिभावाने देवीची उपासना करून धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम रंगवले. शुक्रवारी उशिरा झालेल्या मिरवणुकीनंतर मूर्ती विसर्जनाच्या वेळी मात्र गोंधळ निर्माण झाला.

IMG20251004060934 01 Navratri visarjan : हिमायतनगरात नवरात्र विसर्जनावेळी गोंधळ ; आमदारांच्या हस्तक्षेपानंतर समाधान
oplus_0

नगरपंचायतीने तयार केलेल्या दुर्गंधीयुक्त विहिरीत मूर्ती विसर्जनास भाविकांनी तीव्र विरोध दर्शवला. अनेक वर्षांपासून गाळ न काढल्याने कुजलेल्या पाण्यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे विसर्जन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आणि भक्तांना रात्रभर वाट पाहावी लागली.

IMG20251004075342 Navratri visarjan : हिमायतनगरात नवरात्र विसर्जनावेळी गोंधळ ; आमदारांच्या हस्तक्षेपानंतर समाधान
oplus_0

या दरम्यान आमदार बाबुराव कदम कोहळीकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मच्छीमार पथक व क्रेनची व्यवस्था करून भाविकांना समजूत घालत शनिवारी सकाळी ६ वाजता कनकेश्वर तलावात विसर्जन सुरू केले. यामुळे परिस्थिती आटोक्यात आली. सकाळी १० वाजता वृत्त लिहीपर्यंत विसर्जन शांततेत सुरू असून, अजूनही ७-८ मुर्त्या मिरवणुका मार्गावर आहेत. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत विसर्जन शांततेत पार पाडण्यास हातभार लावला.

IMG20251004082133 01 Navratri visarjan : हिमायतनगरात नवरात्र विसर्जनावेळी गोंधळ ; आमदारांच्या हस्तक्षेपानंतर समाधान
oplus_0

मुख्याधिकारी पल्लवी टेमकर यांनी विसर्जन नियोजनात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तरीही प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल भाविकांमध्ये नाराजी होती. भाविकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की “आगामी काळात प्रशासनाने वेळीच तयारी करून अशा अडचणी टाळाव्यात.”

IMG20251004055458 01 Navratri visarjan : हिमायतनगरात नवरात्र विसर्जनावेळी गोंधळ ; आमदारांच्या हस्तक्षेपानंतर समाधान
oplus_0
IMG20251004073313 01 Navratri visarjan : हिमायतनगरात नवरात्र विसर्जनावेळी गोंधळ ; आमदारांच्या हस्तक्षेपानंतर समाधान
oplus_0
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments