हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरात शुक्रवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या मामिडवार कॉम्प्लेक्समधील सुनील मेडिकल या दुकानाचे कुलूप अज्ञात चोरट्याने लोखंडी रॉडच्या साहाय्याने तोडत आत प्रवेश केला.आणि गल्ल्यातील अंदाजे १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.



त्या वेळी शहरात दुर्गा मूर्ती विसर्जनाची मिरवणूक सुरू असल्याने परिसरात गडबड होती. याचा फायदा घेत चोरट्याने ही घटना घडवली असावी. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी मेडिकल चालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चोराकडून सोडलेला लोखंडी रॉड आणि तुटलेले कुलूप ताब्यात घेतले आहे. शेजारच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.



गेल्या काही दिवसांपासून शांत असलेली चोरीची मालिका पुन्हा सुरू झाल्याने दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीच्या घटनेनंतर स्थानिकांची पोलिस प्रशासनाला मागणी केली कि, सणोत्सव काळात गस्त वाढवावी चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन मुसक्या आवळाव्यात आणि सुरक्षा द्यावी.




