HomeकृषीShort circuit : जवळगाव मध्ये शॉर्टसर्किट होऊन शेतातील ऊस जळून खाक; नुकसान...

Short circuit : जवळगाव मध्ये शॉर्टसर्किट होऊन शेतातील ऊस जळून खाक; नुकसान भरपाईची मागणी

हिमायतनगर, अनिल मादसवार| शनिवारच्या दिवशी दुपारी महावितरण कंपनीच्या वीज तारमध्ये घर्षण होऊन फुलंग्या पडल्याने उसाला आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे ऊस जळून खाक झाला असून, यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील शेतकरी पांडुरंग नारायण रावते यांच्या सर्व्हे नं. 130 मधील सुमारे 1.5 एकर उसाचे पीक आहे. दिनांक 04 ऑक्टोबर रोजी दुपारी विद्युत तारांच्या स्पार्किंगमुळे पेट घेत जळून खाक झाले. एकीकडे आग विझविली तरी दुरीकडे पेटं घेत होती, त्यामुळे हाता तोंडाला आलेला ऊस पूर्णपणे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

यंदा अतिवृष्टीने कहर केला त्यातून बचावलेल्या उसाला आता महावितरणाच्या वीज तारांचे घर्षण होऊन आग लागली. यामुळे शेतकऱ्यावर दुहेरी सनकोट कोसळले असून, या संदर्भात माहिती देताना शिवाजी सूर्यवंशी पारवेकर यांनी सांगितले की, घटनेची तात्काळ दखल घेऊन साखर कारखान्याने शेतकऱ्याचा उस न्यावा. आणि महावितरण कंपनीने शॉर्टसर्किटमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उचित भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

IMG 20251004 165514 Short circuit : जवळगाव मध्ये शॉर्टसर्किट होऊन शेतातील ऊस जळून खाक; नुकसान भरपाईची मागणी
Oplus_16908288

नुकसानीची पाहणी करून पंचनाम्यासह तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा महावितरणच्या विरोधात शेतकरी ग्राहक मंचात जाण्याच्या तयारीत असल्याचे माहिती शिवाजी सूर्यवंशी पारवेकर यांनी दिली आहे. 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments