Sunday, May 17

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Kalu Ram Rawat ; विधानसभेसाठी पोलीस विभागाचे निवडणूक निरीक्षक कालु राम रावत यांचे आगमन – NNL

Kalu Ram Rawat ; विधानसभेसाठी पोलीस विभागाचे निवडणूक निरीक्षक कालु राम रावत यांचे आगमन – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड | विधानसभा निवडणुकीसाठी राजस्थान कॅडरचे २००८ तुकडीचे भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी कालु राम रावत यांचे आज नांदेड येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. कालुराम रावत शासकीय विश्रामगृहावर निवडणूक काळात कार्यालयीन वेळेमध्ये सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतील. त्यांचा निवडणूक काळातील स्थानिक संपर्क क्रमांक 8180830699 आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराडे ( 88888921OO)त्यांच्यासोबत असतील. नागरिकांना नांदेड विश्रामगृहातील व्हीआयपी सूट क्रमांक एक मध्ये त्यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल....
Chandrasekhar Bawankule : विकासाचा चढता आलेख कायम ठेवायन्यासाठी श्रीजयाताईला विधानसभेत पाठवा – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे -NNL

Chandrasekhar Bawankule : विकासाचा चढता आलेख कायम ठेवायन्यासाठी श्रीजयाताईला विधानसभेत पाठवा – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे -NNL

नांदेड, राजकीय
भोकर,गंगाधर पडवळे| होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात महायुतीची सत्ता येणार आहे. अनेक लोकोपयोगी योजना राबविण्यासाठी तसेच राज्याच्या विकासाचा आलेख वाढविण्यासाठी महायुती सरकार आवश्यक आहे. असेच भोकर विधानसभा क्षेत्रातील विकास हा इतर विधानसभेपेक्षा नक्कीच जास्त प्रमाणात झाला. आणि यापुढेही अश्याच प्रकारे वाढत जाणार आहे. विकासाचा चढता आलेख कायम ठेवायचा असेल तर श्रीजयाताईला विधानसभेत पाठविणे आवश्यक आहे. असे आवाहन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते आज भोकरमध्ये काढण्यात आलेल्या विजय संकल्प रॅलीच्या सभे दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. महायुतीचे सरकार राज्यात आले आणि अनेक सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले त्यात मोफत शेतीसाठी वीज, झिरो वीज बिल, एक रुपयात पीक विमा भरून देणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मोफत रॅशन, स्वछगृह...
Vanchit suddenly changed his candidate : किनवट/माहुर मतदार संघात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता असताना वंचितने अचानक उमेदवार बदलला -NNL

Vanchit suddenly changed his candidate : किनवट/माहुर मतदार संघात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता असताना वंचितने अचानक उमेदवार बदलला -NNL

नांदेड, राजकीय
किंनवट, परमेश्वर पेशवे| सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून यावर्षीची विधानसभा निवडणूक ही विशेष ठरणार आहे. गेल्या दोन वर्षाचे राजकारण पाहता मतदारांमध्ये पूरता गोंधळ उडालेला दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडून विद्यमान सरकार स्थापन झाले होते. विद्यमान सरकार स्थापन होताना पक्ष फुटी मोठ्या प्रमाणात झाली या फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका सर्वच मुख्य पक्षांना बसलेला दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाचे ही फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडलेले दिसून येत नाही. यामुळे जनता निश्चित कोण कोणाच्या बाजूने देईल हे सांगता येणार नाही. त्यातच मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण व धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकारला योग्य निर्णय घेता आलेला दिसून येत नाही. अशातच मराठा व ओबीसी संघर्ष पराकोटीला गेलेला दिसून येत आहे. याचाही फटका नेमका कोणाला बसेल हे निश्चित सांगता येणार नाही. एक म...
Jyotiba Kharate : ज्योतिबा खराटे यांना मतदार संघातून लढण्याची हाक ; खराटे यांच्या निर्णयाकडे जनतेचे लक्ष -NNL

Jyotiba Kharate : ज्योतिबा खराटे यांना मतदार संघातून लढण्याची हाक ; खराटे यांच्या निर्णयाकडे जनतेचे लक्ष -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| मागील दोन-तीन वर्षांतील झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी, पक्षांतर बदलांमुळे नेत्यांना लागलेला गद्दारीचा डाग अद्याप निघाला नसून निष्टावंत नागरिकांना व मतदारांना राजकिय नेत्यावर  फारसा विश्वास राहिला नाही.त्यामुळे राजकारणातील निष्ठावंत चेहर्‍याचा शोध जनता घेत आहे. त्यातच आता विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने मतदारांचा रंग वाढलेला दिसत आहे.किनवट-माहूर मतदार संघातील ठिकठिकाणी माणसांचे गट निवडणूकसंदर्भात चर्चा करतांना दिसत असून 'इस जंगलके हम दो शेर'या तिसरा कोई सिकंदर अशी विचारणा सुरू झाली असून आता महिनाभर चौकांसह चावडीवर राजकीय गप्पा रंगणार आहेत, हे निश्चित आहे. किनवट-माहूर मतदार संघात महायुतीकडून विद्यमान आ.भीमराव केराम यांना उमेदवारी जाहीर होवून त्यांनी गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहे.तर महाविकास आघाडीकडून माजी आ...
Coordination meeting : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहुरात महायुतीची समन्वय बैठक संपन्न -NNL

Coordination meeting : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहुरात महायुतीची समन्वय बैठक संपन्न -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.२६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे विधानसभा प्रमुख वैजनाथ करपुडे यांच्या अध्यक्षतेखाली तर भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची समन्वय बैठक येथील एकविरा धाम येथे पार पडली. यावेळी तालुकाध्यक्ष श्रीकांत घोडेकर, राष्ट्रवादीचे - तालुकाध्यक्ष अमित राठोड, शिवसेना - शिंदे गटाचे हिरासिंग चव्हाण, तालुका संघटक विनोद सुर्यवंशी, सदानंद पुरी, रीपाई आठवले गटाचे रफीकभाई, यांची उपस्थिती होती. या बैठकीत निवडणुकी संदर्भात महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला असता कार्यकत्यांकडून मौलीक सुचना व अडीअडचणी समजून घेतल्या, याबैठकीला मार्गदर्शन करताना वैजनाथ करपुडे म्हणाले की, ही निवडणूक जिंकण्यासाठी आपसातील मतभेद विसरून एकदिलाने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. २८ ऑक्टोबर र...
Veerashaiva Lingayat majority constituency ; वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यास वीरशैव लिंगायत बहूल मतदार संघात आम्हाला ‘नोटा’ चा पर्याय उपलब्ध ! – NNL

Veerashaiva Lingayat majority constituency ; वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यास वीरशैव लिंगायत बहूल मतदार संघात आम्हाला ‘नोटा’ चा पर्याय उपलब्ध ! – NNL

मुंबई, राजकीय
मुंबई | देशाच्या जडण-घडणीमध्ये वीरशैव लिंगायत समाजाचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठे योगदान राहिलेले आहे. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात देखील त्यांच्या वित्त, सामाजिक आणि धार्मिक विभागांची जबाबदारी वीरशैव लिंगायत समाजातील घटकांवरच असल्याचे पुरावे मिळतात. अलीकडे स्वतंत्र्योत्तर काळात देखील देशाच्या राजकीय जडण-घडणी मध्ये वीरशैव लिंगायत आणि जंगम समाजाचे महत्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. अगदी सुरुवातीला आणि त्यानंतर काही कालावधी वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी म्हणून देशाचे उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, लोकसभा व राज्यसभा खासदार तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा आमदार व विधानपरिषद आमदार होऊन गेले आहेत. मात्र नंतरच्या कालावधीत बदलत्या राजकीय पस्थितीचा फार मोठा फटका वीरशैव लिंगायत समाजालाच बसलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रारंभ...
Permission required : राजकीय जाहिरातींसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची परवानगी आवश्यक -NNL

Permission required : राजकीय जाहिरातींसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची परवानगी आवश्यक -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी कोणतीही जाहिरात तयार करताना, तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, सोशल मीडिया, यावरील पोस्ट, बल्क एसएमएस, रेडिओ जिंगल्स चित्ररथावरील व्हिडिओ थोडक्यात कोणत्याही प्रसिद्धीसाठी परवानगी आवश्यक असून ती घेणे अनिवार्य असल्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. जिल्‍ह्यातील लोकसभा पोटनिवडणूक व 9 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करण्याच्या दृष्टीने जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, व्यक्ती यांनी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष वापर / प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातींना जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. जाहिरातींमध्ये दूरचित्रवाहिन्या, केबल नेटवर्क/ केबल वाहिन्यांवरचे प्रक्षेपण प्रसारण...
Santosh Ambekar : काँग्रेस अनुसुचित जाती विभागाच्या नांदेड जिल्हाउपाध्यक्षपदी संतोष आंबेकर यांची निवड -NNL

Santosh Ambekar : काँग्रेस अनुसुचित जाती विभागाच्या नांदेड जिल्हाउपाध्यक्षपदी संतोष आंबेकर यांची निवड -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाच्या नांदेड जिल्हाउपाध्यक्षपदी संतोष आंबेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागातील युवा कार्यकर्त्याची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथिल उपसरपंच, सेवा सहकारी संस्थाचे संचालक आणि काँग्रेस अनुसुचित जाती विभाग हिमायतनगर तालुकाध्यक्ष पदांवर कार्यरत असलेले संतोष आंबेकर यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी लिलोटिया, महाराष्ट्र काँग्रेस अनुसुचित जाती विभाग प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या आदेशानुसार त्यांची "जिल्हाउपाध्यक्ष, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभाग " पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ...
Mp ajit gopchhade ; केंद्रीय पर्यटन तथा सांस्कृतिक समितीवर खा. डॉ अजित गोपछडे -NNL

Mp ajit gopchhade ; केंद्रीय पर्यटन तथा सांस्कृतिक समितीवर खा. डॉ अजित गोपछडे -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। केंद्रीय पर्यटन तथा सांस्कृतिक समितीवर खा. डॉ अजित गोपछडे यांची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे देशभरात स्वागत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनानुसार भारत सरकार द्वारा स्थापित केंद्रीय पर्यटन तथा सांस्कृतिक मंत्रालय समितीवर राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मणिपूर, पंजाबसह विविध राज्यात प्रवास करुन भारतीय सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी तसेच सद्भावना निर्मितीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. एकूण 25 सदस्य असलेल्या या समिती मध्ये केंद्रीय मंत्री, राज...
Prataprao Patil Chikhlikar : प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा “राष्ट्रवादी काँग्रेस’ प्रवेश ; भाजपाची अपरिहार्यता -NNL

Prataprao Patil Chikhlikar : प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा “राष्ट्रवादी काँग्रेस’ प्रवेश ; भाजपाची अपरिहार्यता -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| जिल्ह्याचे नेते भाजपाचे माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शुक्रवारी (२५ ऑक्टों) रोजी सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात राष्ट्र‌वादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यामूळे जिल्ह्यात राजकिय भूकंप झाला पण हा पक्ष प्रवेश दिल्लीतील शीर्ष भाजप नेत्यांच्या सहमतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारानेच घडवूनआणला. लोहा विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत आणि भाजपा नेतृत्वाना त्यांना दुखवायचे नव्हते त्यामुळेच हा प्रवेश झाला. ही भाजपाची राजकीय अपरिहार्यता होती, पक्ष तुमचा उमेदवार आमचा 'हा राजकीय प्रयोग होय भारतीय जनता पक्षाची जशी जिल्ह्यात अपरिहार्यता झाली. तशीच राजकीय कोंडी नेहमीच प्रतापरावांच्या वाट्याला आली. या निवडणुकीत त्यांनी लोकसभा लढविणार नाही मी लोहा विधानसभा लाढविणार असे त्यांनी पक्षाच्या ...
error: Content is protected !!