नांदेड| काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाच्या नांदेड जिल्हाउपाध्यक्षपदी संतोष आंबेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागातील युवा कार्यकर्त्याची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथिल उपसरपंच, सेवा सहकारी संस्थाचे संचालक आणि काँग्रेस अनुसुचित जाती विभाग हिमायतनगर तालुकाध्यक्ष पदांवर कार्यरत असलेले संतोष आंबेकर यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी लिलोटिया, महाराष्ट्र काँग्रेस अनुसुचित जाती विभाग प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या आदेशानुसार त्यांची “जिल्हाउपाध्यक्ष, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभाग ” पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांना निवडून आणण्यासाठी तसेच काँग्रेस पक्षाचे विचार घराघरात पोहचवुन पक्षाला बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत संतोष आंबेकर यांनी व्यक्त केले. यावेळी कुमार कुर्तडीकर, उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नांदेड, गंगाधर गाडगे, शहर उपाध्यक्ष, तुषार पोहरे लहानकर, शहर महासचिव रिजवान पटेल खुरगाव, शहर सचिव शेख नईम जवळगावकर, शहर सचिव, इंजि.प्रमोद श्रीखंडे, आकाश बोरीकर आदींची उपस्थिती होती.