भोकर,गंगाधर पडवळे| होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात महायुतीची सत्ता येणार आहे. अनेक लोकोपयोगी योजना राबविण्यासाठी तसेच राज्याच्या विकासाचा आलेख वाढविण्यासाठी महायुती सरकार आवश्यक आहे. असेच भोकर विधानसभा क्षेत्रातील विकास हा इतर विधानसभेपेक्षा नक्कीच जास्त प्रमाणात झाला. आणि यापुढेही अश्याच प्रकारे वाढत जाणार आहे. विकासाचा चढता आलेख कायम ठेवायचा असेल तर श्रीजयाताईला विधानसभेत पाठविणे आवश्यक आहे. असे आवाहन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते आज भोकरमध्ये काढण्यात आलेल्या विजय संकल्प रॅलीच्या सभे दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

महायुतीचे सरकार राज्यात आले आणि अनेक सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले त्यात मोफत शेतीसाठी वीज, झिरो वीज बिल, एक रुपयात पीक विमा भरून देणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मोफत रॅशन, स्वछगृह, घरकुल, स्त्रियानां मोफत उच्च शिक्षण, पन्नास टक्के प्रवास भाडे आदी योजना यशस्वी राबविण्यात आल्या आहेत. देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून गेली दहा वर्षाहून अधिक वर्ष मा. नरेंद्रभाई मोदीजी हे काम पाहत आहेत आणि त्यांच्या आशिर्वादामुळे आम्ही ही राज्यात महायुतीचे सरकार त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगत महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने काम करीत आहोत त्यामुळे आपल्या भागाचा आणखीन विकास हवा असेल तर राज्याचे नेतृत्व असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येणाऱ्या 20 नोव्हेंबरला नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व भोकर विधानसभा मतदारसंघासाठी कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा.

श्रीजयाला मत म्हणजे विकासाला मत यामुळे पुढचे पाच वर्ष श्रीजायाताई विकासाचे सर्व रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाहीत कारण त्या इतक्या जिद्दी आहेत की यांची मला खात्री आहे आपलं एक मत म्हणजेच मुख्यमंत्री, एक विकास साधता येतो असे मत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या विजय संकल्प यात्रा सभेदरम्यान व्यक्त केले. तर पुढे बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की काँग्रेस सरकार राज्यात येताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद ची भाषा हे आताच करत आहेत, मागील लोकसभा निवडणुकीत नेरेटिव्ह प्रचार करून येथील अज्ञानी आदिवाशी,मागासवर्गीय मतदारांना फसवून मतदान करून घेवून आपले खासदार यांची संख्या वाढवली तरीही सरकार भारतीय जाणता पार्टी व मित्र पक्षाचे आले असून पुढील पाच वर्षा पर्यंत तुम्ही निश्चिन्त राहा कोणीही संविधान बदलू शकत नाही आम्ही तर संविधानाचा आदर करणारे असून त्यानुसार चालतो असा विश्वास जमलेल्या जनसमुदयास या प्रसंगी दिला.शेवटी अध्यक्षीय भाषणात बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले की मला ही विश्वास बसत नाही एवढा मोठा मतदार माझ्या कुटुंबियांनावर विश्वास ठेवून श्रिजयाला आशीर्वाद देण्याच्या विजयी संकल्प रॅली च्या सभेतील गर्दी पाहून भराहून जाऊन बोलत होते यावेळी आता पर्यंत चे विजयाचे सर्व रेकॉर्ड मोडण्याचे आवाहन ही केले.
