Chandrasekhar Bawankule : विकासाचा चढता आलेख कायम ठेवायन्यासाठी श्रीजयाताईला विधानसभेत पाठवा – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे -NNL
भोकर,गंगाधर पडवळे| होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात महायुतीची सत्ता येणार आहे. अनेक लोकोपयोगी योजना राबविण्यासाठी तसेच राज्याच्या विकासाचा आलेख वाढविण्यासाठी महायुती सरकार आवश्यक आहे. असेच भोकर विधानसभा क्षेत्रातील विकास हा इतर विधानसभेपेक्षा नक्कीच जास्त प्रमाणात झाला. आणि यापुढेही अश्याच प्रकारे वाढत जाणार आहे. विकासाचा चढता आलेख कायम ठेवायचा असेल तर श्रीजयाताईला विधानसभेत पाठविणे आवश्यक आहे. असे आवाहन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते आज भोकरमध्ये काढण्यात आलेल्या विजय संकल्प रॅलीच्या सभे दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
महायुतीचे सरकार राज्यात आले आणि अनेक सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले त्यात मोफत शेतीसाठी वीज, झिरो वीज बिल, एक रुपयात पीक विमा भरून देणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मोफत रॅशन, स्वछगृह...
