HomeनांदेडCoordination meeting : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहुरात महायुतीची समन्वय बैठक संपन्न -NNL

Coordination meeting : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहुरात महायुतीची समन्वय बैठक संपन्न -NNL

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.२६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे विधानसभा प्रमुख वैजनाथ करपुडे यांच्या अध्यक्षतेखाली तर भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची समन्वय बैठक येथील एकविरा धाम येथे पार पडली. यावेळी तालुकाध्यक्ष श्रीकांत घोडेकर, राष्ट्रवादीचे – तालुकाध्यक्ष अमित राठोड, शिवसेना – शिंदे गटाचे हिरासिंग चव्हाण, तालुका संघटक विनोद सुर्यवंशी, सदानंद पुरी, रीपाई आठवले गटाचे रफीकभाई, यांची उपस्थिती होती.

या बैठकीत निवडणुकी संदर्भात महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला असता कार्यकत्यांकडून मौलीक सुचना व अडीअडचणी समजून घेतल्या, याबैठकीला मार्गदर्शन करताना वैजनाथ करपुडे म्हणाले की, ही निवडणूक जिंकण्यासाठी आपसातील मतभेद विसरून एकदिलाने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. २८ ऑक्टोबर रोजी महायुतीचे उमेदवार भिमराव केराम हे नामनिर्देशन पत्र दाखल करणार असुन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. तसेच महायुती सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या विविध जन उपयोगी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोचवावी तसेच निवडणूक काळात सजग राहावे यासह आवश्यक त्या सुचना दिल्या.

या बैठकीला जेष्ठ कार्यकर्ते जोतीराम राठोड, नंदकुमार जोशी, विजय आमले, विलास चौधरी, अनिल वाघमारे, नगरसेवक गोपु महामुने, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनायक मुसळे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे, मनोहर भगत, मनोज पुरी, निलेश तायडे, बबनराव गेंटलवार, विलास टिपकर बाबुभाई वाईवाले, शंकर भालेराव, महीला मोर्चाच्या प्रदेश सदस्या पद्माताई गिर्‍हे, जिल्हा उपाध्यक्षा राधा उपलेंचवार, शहराध्यक्षा तालुका अध्यक्षा सुजाता कांबळे, तालुका सरचिटणीस अर्चना दराडे, स्वाती आडे, निर्मला जोशी, यांचेसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन अपिल बेलखोडे यांनी केले तर निळकंठ मस्के यांनी सर्वांचे आभार मानले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments