Sunday, May 17

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Chief Minister Eknath Shinde : लाडक्या बहिणीनों महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या; काहीच कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : लाडक्या बहिणीनों महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या; काहीच कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| सभेला लाडक्या बाहीने, लाडके भाऊ, लाडके शेतकरी व लाडके जेष्ठ मोठ्या संख्येने येथे उपस्थित झालात त्याबद्दल धन्यवाद देतो. महाल भेटण्यासाठी तुमचा दर्शन घेण्यासाठी तुमचा लाडका भाऊ म्हणून मी येथे आलो आहे. राज्य शासनाने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेच्या माध्यमातून दिवाळीची ओवाळणी दिली. लाडक्या बहिणीची योजना बंद करण्यासाठी विरोधक मात्र कोर्टात गेले. परंतू तेथे त्यांची दाळ शिजली नाही हि बाब लक्षात घेता अश्या या सावत्र भावाला त्यांची जागा दाखवून द्या. तुमचा आशीर्वाद मिळाला तर मानधनात वाढविणार आहोत... त्यामुळे येत्या २० तारखेला महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना साथ द्या. हदगाव व हिमायतनगर शहराला एम आय डी. सी. मंजूर करून देतो, तसेच शेतकर्‍याच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले....
Instructions of the District Administration : प्रचारामध्ये महिला संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी नको बालकांचा वापर ही नको; जिल्हा प्रशासनाचे निर्देश -NNL

Instructions of the District Administration : प्रचारामध्ये महिला संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी नको बालकांचा वापर ही नको; जिल्हा प्रशासनाचे निर्देश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने आचारसंहितेमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे निवडणूक प्रचारादरम्यान महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे. प्रचारादरम्यान महिलांसंदर्भात कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात येऊ नये, तसेच मुलांचा वापर प्रचारामध्ये कुठेही होणार नाही. याची सर्व राजकीय पक्षानी तसेच उमेदवारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात येत असून अशा वेळी प्रचारासंदर्भातील आदर्श आचारसंहितेचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज या संदर्भात प्रशासनातर्फे सर्व उमेदवारांना तसेच राजकीय पक्षांना याबाबत सूचना केली आहे. अनेक ठिकाणी प्रचारामध्ये शाळकरी मुलांचा किंवा लहान मुलांचा अनावधानाने वापर केला जातो मात्र हा आचारसंहितेचा भंग ठरतो. यासंदर्भात तक्रारी आल्यास त्यावर कारवाई केली जाते. त्यामुळ...
Dr. Hansraj Vaidya : आम्हाला “नोटासाठी-नोटा” चे बटण दाबण्यास मजबूर करू नका -डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Dr. Hansraj Vaidya : आम्हाला “नोटासाठी-नोटा” चे बटण दाबण्यास मजबूर करू नका -डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| फेस्काॅमच्या ध्येय धोरणा प्रमाणे "गाव तिथे संघ व ज्येष्ठ नागरिकांचे प्रबोधन" कार्यक्रमांतर्गत डाॅ.हंसराज वैद्य ,अध्यक्ष मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम अध्यक्षीय समारोह करताना बोलत होते. ते म्हणाले कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी कितीही व कशाही "महायुत्या" तथा "महाआघाड्या" करू द्यात, नांदेड जिल्ह्याच्या नऊही विधानसभा मतदार संघात "ज्येष्ठ नागरिक मतदार समूहाचे" आशिर्वाद ज्या पक्षाच्या उमेदवारास मिळतील तोच नक्की आमदार होऊ शकेल अशी परिस्थिती सद्याला झाली आहे. कुणीही आमदारकीचे बाशिंग गुडघ्याला बांधून बसू द्या, त्याचे गुडघ्याचे बाशिंग गुडघ्यालाच राहील. त्याच्या नशिबी हार तूरे व गुलाल नाहिच. सर्व पक्षांच्या नेत्यांना व इच्छुक उमेद्वारांनां आमचे ज्येष्ठ नागरिकांचे उघड उघड जाहिर आवाहान आहे की,आज आमची खुली,रिकामि व कोरी पाटी पाहे! आज आम्ही कुण्याही पक्षाच्या दावणीला बांधले गेलेलो नाहित...
Permission is mandatory for voice messages : व्हाईस मेसेजेस, बल्क मेसेजेससाठी परवानगी अनिवार्य व्हिडीओ, ऑडीयोचेही प्रमाणिकरण आवश्यक- NNL

Permission is mandatory for voice messages : व्हाईस मेसेजेस, बल्क मेसेजेससाठी परवानगी अनिवार्य व्हिडीओ, ऑडीयोचेही प्रमाणिकरण आवश्यक- NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| प्रचाराच्या अंतिम काळामध्ये कोणत्याही उमेदवाराने ऑडीयो, व्हिडीओ मेसेज प्रसारित करण्यापूर्वी एमसीएमसी समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात कार्यरत असणाऱ्या एजन्सी तसेच उमेदवारांनी ही बाब लक्षात घ्यावी. विनापरवानगी इलेक्ट्रानिक्स फॉरमॅटमधील कोणत्याही प्रसिध्दी साधणाचा व प्रसिध्दी तंत्राचा वापर करण्यावर निवडणूक आयोगाने प्रतिबंध केला आहे. याचा फटका उमेदवाराच्या खर्चाच्या ताळमेळाला बसू शकतो. लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त खर्च निवडणूक विभागाकडून यासंदर्भात सूचना जारी झाल्या आहेत. उमेदवाराच्या खर्चासंदर्भातील पहिली बैठक झाली असून याबैठकामध्ये प्रसिध्दी विषयक कोणतेही साहित्य वापरताना माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) परवानगी अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय पक्षांनी या बाबींची परवानगी घ्यावी राजकीय पक्ष व उमेदवारांनी दूरचि...
If there is paid news in the newspaper : वृत्तपत्रामध्ये पेडन्यूज आल्यास उमेदवारांच्या खर्चात करा जमा -NNL

If there is paid news in the newspaper : वृत्तपत्रामध्ये पेडन्यूज आल्यास उमेदवारांच्या खर्चात करा जमा -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्यात बातमी आड पेडन्युजच्या माध्यमातून प्रचार होणार नाही याची काळजी घ्या. याकाळामध्ये सारख्या बातम्या आणि बातम्यांच्या आडून प्रसिद्धी सुरू असेल तर पेड न्यूज म्हणून हा खर्च उमेदवाराच्या खात्यात पकडण्यात यावा. तसेच याकाळात वृत्तपत्रांनी देखील कोणतीही बातमी पेडन्युज येणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण, प्रिंट माध्यमात येणाऱ्या जाहिराती व मजकूर या माध्यमातून पेड न्यूज तर जात नाही याची देखरेख करण्याकरिता, जाहिराती व पेड न्यूजचा खर्चाचा अहवाल एक्सपेंडिचर (खर्च) विभागाला देण्याकरीता माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे (एमसीएमसी )असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जा...
Expenditure inspector ; खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनी केली उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी -NNL

Expenditure inspector ; खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनी केली उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी -NNL

नांदेड, राजकीय
हदगाव/नांदेड। हदगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी आज खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनी केली या प्रसंगी काही उमेदवार तर काही उमेदवारांचे प्रतिनीधी उपस्थित होते. गुजरात क्डॅरचे चे २००९ बॅचचे आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे हे सुरत येथे आयकर विभागात अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव,भोकर,नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या विधानसभा क्षेत्राचे खर्च निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. मयंक पांडे (आयआरएस) यांचा संपर्क मोबाईल क्रमांक ०८४८३८४५२२० आहे.तर त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा परिषदचे नांदेड चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना मो.नं ९०११०००९२१ हे आहेत. खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनी आज उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी करून मार्गदर्शक सूचना दिल्या याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा हद...
Vikas Patil Devsarkar ; काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा -NNL

Vikas Patil Devsarkar ; काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर। येथील काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी कॉग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजिनामा जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्याकडे सोपविला आहे. त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हंटले आहे की, सन 2002 पासून कॉग्रेस पक्षाचा सक्रिय सदस्य आहे. त्याच प्रमाणे कॉग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदार पदावर गेली अनेक वर्ष पासून काम केले आहे. पक्षाचा प्रदेश स्तरावरुन आलेले वेगवेगळे उपकृम तालुक्यामध्ये राबवून पक्ष संघटनेसाठी पूर्ण वेळ दिला. परंतू आज कॉंग्रेस पक्षाच काम करतांना मला विश्वासात घेतले जात नाही. त्यामूळे मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. असे दिलेल्या राजीनामा पत्रात म्हंटले आहे, काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाचं ते समर्थन करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे....
Vinay Patil Girde ; दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश – NNL

Vinay Patil Girde ; दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेडl नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटात कांकाडीचे माजी सरपंच सुदीन‌ पाटील बागल यांच्या सह अनेकांनी पक्ष प्रवेश केला आहे. शिवसेना उपनेते हेमंत पाटील यांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालय येथे दक्षिण विधानसभा मतदार संघातील कांकाडी,तुप्पा भागासह ग्रामीण भागातील व सिडको हडको परिसरातील व पदाधिकारी असलेल्या दता पाटील कदम तुप्पा उपसरपंच, कैलास बागल ग्रामपंचायत सदस्य,दशरथ पाटील बागल तंटामुक्ती अध्यक्ष,शंभु गंगातीरे, ऋषीकेश भवर,रावण पाटील वर्तळे, उपसरपंच काळेश्वर बागल ,नंदु वर्तळे,प्रदीप कोल्हे, देवानंद हणवते, भागवत भवर , तानाजी भवर , श्रीकांत देशमुख,राजु देशमुख, सर्जेराव वर्तळे,शिवा सोळंके, नंदु वर्तळे या प्रमुख पदाधिकारी यांच्या सह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या हस्ते प्रवेश देण्यात आला आह...
Dr. Santukrao Humbarde  काँग्रेसने गेली 70 वर्षे लबाड बोलून देशाला फसवले – डॉ. संतुकराव हंबर्डे -NNL

Dr. Santukrao Humbarde काँग्रेसने गेली 70 वर्षे लबाड बोलून देशाला फसवले – डॉ. संतुकराव हंबर्डे -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| काँग्रेसने गेली 70 वर्षे लबाड बोलून देशाला फसवले आहे. देशातील गोरगरीब जनतेला लुटले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशातील जनतेच्या विकासाचे आणि हिताचे सरकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीने मित्र पक्षाच्या सरकारकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली देशभर विकासाची गंगा सुरू आहे. आपल्यालाही ही विकासाची गंगा नांदेडमध्ये आणायची आहे. त्यासाठी नांदेड मधील होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन नांदेड लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केले. देगलूर तालुक्यातील हाणेगाव आणि करडखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकांमध्ये ते बोलत होते. यावेळी डॉ . डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्यासह करडखेड येथील सभेस देगलूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार जितेश अंतापुरकार , देवि...
Devendra Fadanvis ; 95 गावांना चिमटा धरणामुळे विस्थापित होऊ देणार नाही – देवेंद्र फडणवीस -NNL

Devendra Fadanvis ; 95 गावांना चिमटा धरणामुळे विस्थापित होऊ देणार नाही – देवेंद्र फडणवीस -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ दिनांक 7 रोजी किनवट येथील जाहीर सभेत बोलत असताना या मतदारसंघात होऊ घातलेल्या चिमटा धरण या प्रकल्पात 95 गावी ही बुडीत क्षेत्रात जात असल्याचा आरोप विरोधकाकडून होत असल्याने त्यापैकी एकही गाव हे मी विस्थापित होऊ देणार नाही बुडीत क्षेत्रात येऊ देणार नाही कारण मी स्वतः पाटबंधारे मंत्री असल्याने एकाही शेतकऱ्यांची नुकसान होऊ देणार नाही. अशा स्वरूपाची ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसमुदायाला संबोधित करताना दिली. त्याचबरोबर लाडक्या बहिणी संदर्भात सावत्र भावापासून सावध रहा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. लाडकी बहीण योजना बंद करण्यात यावी यासाठी आघाडीच्याच लोकांनी हायकोर्टात धाव घेतली असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला. पण हायकोर्टाने त्यांच्या...
error: Content is protected !!