नांदेड| काँग्रेसने गेली 70 वर्षे लबाड बोलून देशाला फसवले आहे. देशातील गोरगरीब जनतेला लुटले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशातील जनतेच्या विकासाचे आणि हिताचे सरकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीने मित्र पक्षाच्या सरकारकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली देशभर विकासाची गंगा सुरू आहे. आपल्यालाही ही विकासाची गंगा नांदेडमध्ये आणायची आहे. त्यासाठी नांदेड मधील होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन नांदेड लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केले.
देगलूर तालुक्यातील हाणेगाव आणि करडखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकांमध्ये ते बोलत होते. यावेळी डॉ . डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्यासह करडखेड येथील सभेस देगलूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार जितेश अंतापुरकार , देविदास राठोड , पंकज देशमुख , शिवाजीराव देशमुख, लक्ष्मणराव पवार ,माणिकराव लोहगावे , अनिल पाटील खानापूरकर , पराग देशमुख , श्रावण पाटील भिलवंडे , राजेश महाराज , जनार्दन बिराजदार , प्रशांत पाटील , एडवोकेट रवी पाटील, निलेश देशमुख , प्रदीप लगडे यांची तर हानेगाव येथील बैठकीस श्री श्री 1008 शंकरलिंग शिवाचार्य महाराज हाणेगावकर यांच्यासह शिवाजीराव देशमुख तळेगावकर , शिवाजीराव देशमुख , राजेश महाराज , प्रथम देशमुख हाणेगावकर , शांताराम पाटील पळणीकर , शंकर राठोड , प्रशांत आचेगावकर ,मनोहर देशमुख, शेलगवकर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. संतुकराव हंबर्डे म्हणाले की, यापूर्वीच्या कोणत्याही केंद्र सरकारला शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना सुरू करता आली नव्हती . निसर्गाच्या अवकृपेने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील सरकारने शेतकरी सन्मान योजना सुरू करून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा केले आहेत . पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निसर्गाच्या प्रकोपापासून संरक्षित केले आहे . त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा कळवळ असणारे सरकार म्हणून भाजपाकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडे पाहिले जाते. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने महाराष्ट्रात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करून करोडो महिलांना महिना पंधरा हजार रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
दिवाळीपूर्वी आपल्या लाडक्या बहिणीला बोनस देण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले आहे. महाविकास आघाडी सरकारचे लक्ष जन विकासापेक्षा स्वतःच्या धन विकासाकडे जास्त लक्ष देणारे होते असेही ते म्हणाले. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मला विजयी करण्यासाठी कमळ या निशाणी समोरील बटन दाबा आणि देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा महायुतीचे उमेदवार आ. जितेश अंतापुरकर यांच्याही कमळ या निशाणी समोरील बटन दाबून भाजपा महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आता होत असलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत माहाविकास आघाडीकडून षडयंत्र वाचले जात आहेत . हिंदू मतांची विभागणी करून सत्तेची पोळी लाटण्याचा त्यांचा कुटील डाव सुरू आहे. त्यामुळे बटेंगे गे तो कटेंग याची जाणीव ठेवून हिंदू मतदारांनी आता एकजुटीची वज्रमूठ करून भाजपा महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. आपण आता स्वतःला सांभाळलो तरच भविष्यामध्ये आपल्या पिढ्यांना सांभाळता येईल. अन्यथा येणारा काळ आपल्या पिढ्यांसाठी अत्यंत कठीण असणार आहे असेही डॉ. संतुकराव हंबर्डे म्हणाले.