Dr. Santukrao Humbarde काँग्रेसने गेली 70 वर्षे लबाड बोलून देशाला फसवले – डॉ. संतुकराव हंबर्डे -NNL
नांदेड| काँग्रेसने गेली 70 वर्षे लबाड बोलून देशाला फसवले आहे. देशातील गोरगरीब जनतेला लुटले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशातील जनतेच्या विकासाचे आणि हिताचे सरकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीने मित्र पक्षाच्या सरकारकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली देशभर विकासाची गंगा सुरू आहे. आपल्यालाही ही विकासाची गंगा नांदेडमध्ये आणायची आहे. त्यासाठी नांदेड मधील होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन नांदेड लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केले.
देगलूर तालुक्यातील हाणेगाव आणि करडखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकांमध्ये ते बोलत होते. यावेळी डॉ . डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्यासह करडखेड येथील सभेस देगलूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार जितेश अंतापुरकार , देवि...
