Sunday, May 17

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Pradeep Naik : प्रदीप नाईक यांना प्रचारात उदंड प्रतिसाद… गावोगावी तुतारीचा जोर वाढला -NNL

Pradeep Naik : प्रदीप नाईक यांना प्रचारात उदंड प्रतिसाद… गावोगावी तुतारीचा जोर वाढला -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे| महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार प्रदीप नाईक यांना प्रचारात उदंड प्रतिसाद मिळत असून ईस्लापूर ,शिवणी, जलधारा,अप्पारावपेठ, तोटंबा परिसरातील गावोगावी तुतारीचा जोर चांगलाच वाढल्याचे चित्र पाहावयाला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस ,शिवसेना उबाठा, माकपा व अन्य मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार प्रदीप नाईक यांचा दि. 11 नोव्हेंबर शनिवार रोजी इस्लापुर परिसरात प्रचार दौरा व गाव भेट दौरा आयोजीत करण्यात आला होता. या दौऱ्या प्रसंगी प्रथम त्यांनी नंदगाव, नंदगाव तांडा, रिठा तांडा, रिठा गाव परोटी गाव ,परोटी तांडा ,इरेगाव येथे भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला त्यानंतर ईस्लापूर येथे प्रचार कार्यालयाचे उदघाटन करून त्यांनी हुडी, चंद्रु नाईक तांडा ,दिपला नाईक तांडा, मानसीग नाईक तांडा, मार्लोगोंडा, गोंडेमहागाव, दुर्गानगर कंचली, चिखली या गावी भे...
Pandurang Shinde : रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश -NNL

Pandurang Shinde : रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या उपस्थितीत जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सातत्याने लोकनेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे व मराठा आरक्षण आंदोलनाची चेष्टा करणे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नापासून कोसोदूर जाऊन एक व्यक्तीकेंद्री भूमिका घेत, धर्मांध पक्षाच्या बाजूने घेतलेली भूमिका घेत असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्या मनाला न रुजल्यामुळे पांडुरंग शिंदे यांनी संघटनेला आणि सदाभाऊ खोत यांना सोडचिट्टी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला आहे पांडुरंग शिंदे गेल्या 15 वर्षापासून शेतकरी चळवळतीमध्ये कार्यरत होते.विद्यार्थी दशेपा...
In Mahavikas aghadi advertisement : मविआच्या जाहिरनाम्यात महिलांना वर्षाला ५०० रुपयात ६ सिलेंडर, २.५ लाख सरकारी रिक्त पदांची भरती, कंत्राटी भरती बंद, १०० युनिट मोफत वीज -NNL

In Mahavikas aghadi advertisement : मविआच्या जाहिरनाम्यात महिलांना वर्षाला ५०० रुपयात ६ सिलेंडर, २.५ लाख सरकारी रिक्त पदांची भरती, कंत्राटी भरती बंद, १०० युनिट मोफत वीज -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहिरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील भव्य पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय कामे करणावर व पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. या महाराष्ट्रनामामध्ये महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात दिले जातील, महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा आणला जाईल. ३०० युनिट पर्यंत वीजवापर असणा-या ग्राहकांना १०० युनिट मोफत वीज, नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर असेल. सरकारच्या विविध विभागातील रिक्त २.५ लाख जागा भरल्या जातील. एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरती केली जाईल. सरकारी नोकऱ्यातील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार, सरकारी विभागातील जागांचा अनुषेश भरून काढणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेतल...
The one who talks about Hindu interest will rule the country : जो हिन्दु हित की बात करेगा वही देश पर राज करेगा… NNL

The one who talks about Hindu interest will rule the country : जो हिन्दु हित की बात करेगा वही देश पर राज करेगा… NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| जो हिन्दु हित की बात करेगा वही देश पर राज करेगा...जय श्री राम च्या घोषणा देत राजस्थानी समाज मंचच्या वतीने रामदेवबाबा जयंती निमित्त जम्मा जागरण मध्ये नांदेड लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या विजयासाठी विजयी संकल्प बैठक अत्यंत उत्साहात पार पाडली. यावेळी नांदेड दक्षिण चे उमेदवार आनंदराव बोंढारकर, नांदेड लोकसभेचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रदेश सदस्य अ‍ॅड. चैतन्य बापु देशमुख, अभिषेक सौदे, दिलीपसिंघ सोडी, शंकरमामा जाधव, राम लुटे, अशुतोष धर्माधिकारी बरबडेकर, बजरंगसिंह ठाकूर, बालाजी पा. शेळगांवकर, अकेश हंबर्डे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखंड हिन्दुस्थानची अस्मिता आमचे दैवत प्रभु श्रीरामचंद्र यांचे मंदिर आयोध्येत उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्म घ्यावा लागला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 70 वर्ष काँ...
Nana Patole : महाराष्ट्रात सत्ता बदल होताच केंद्रातील सरकार कोसळणार – नाना पटोले -NNL

Nana Patole : महाराष्ट्रात सत्ता बदल होताच केंद्रातील सरकार कोसळणार – नाना पटोले -NNL

नांदेड, उमरखेड, राजकीय, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार| महाराष्ट्रातील राजकारणाचा प्रभाव संपुर्ण देशावर असुन येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार असुन महाराष्ट्रात सत्ता परीवर्तन होताच केंद्रातील नायडू व नितीशकुमारांच्या कुबडयावर असलेले सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली . ते उमरखेड येथील कॉग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजीत जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मंचावर खासदार नागेश पाटील आष्टीकर , वजाहत मिर्झा , संदेश चव्हाण, प्रफुल मानकर , तातु देशमुख , राम देवसरकर , बाळूपाटील चंद्रे, राजुभैय्या जयस्वाल, बळीराम मुटकुळे , नंदकिशोर अग्रवाल सह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपच्या भ्रष्टाचार प्रवृत्तीवर घनाघात केला मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणे म्हणजे भ्रष्टाचाराची परिस्थिती घातल्य...
Nitin Gadkari : 75 वर्षात काँग्रेसने फक्त जातीपातीचा राजकारण केलंय विकासाला प्राधान्य दिले नाही – नितीन गडकरी यांची टीका -NNL

Nitin Gadkari : 75 वर्षात काँग्रेसने फक्त जातीपातीचा राजकारण केलंय विकासाला प्राधान्य दिले नाही – नितीन गडकरी यांची टीका -NNL

उमरखेड, राजकीय, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार| 75 वर्षाच्या काळात काँग्रेसने ग्रामीण भागातील विकास कामाला प्राधान्य दिले नसून जातीपातीचा राजकारण केला फक्त शिक्षण संस्था वाटप करण्याचे काम केले त्यांच्या सोबतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोजगार हमी देत राहिले होते त्यामुळे काँग्रेस पक्षावर अशी वेळ आली असल्याची खणखणीत टीका उमरखेड येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली . भाजपाचे किसनराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष माधव सुपारे , माजी आमदार उत्तमराव इंगळे, आमदार नामदेव ससाने ,अंबादास साकळे, महेंद्र मानकर, महेश काळेश्वरकर, चितांगराव कदम, आरती फुफाटे सह आदींची मंचावर उपस्थित होती . पुढे बोलताना गडकरी म्हणाले जातिवादावर निवडणूक लढविणे ही आजची परिस्थिती नाही काँग्रेस पक्ष जातीवादाचे विष पेरून राजकारण करत जात आहे. त्यांनी घराणे शाही जोपासली आहे तर...
Home voting today for senior voters : नांदेड उत्तर मतदारसंघातील जेष्ठ मतदाराचे आज गृहमतदान -NNL

Home voting today for senior voters : नांदेड उत्तर मतदारसंघातील जेष्ठ मतदाराचे आज गृहमतदान -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| मतदानाचा टक्का वाढावा तसेच दिव्यांग आणि 85 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेनुसार एक ही मतदार मतदाना पासून वंचित राहू नये यासाठी 85 वर्ष वयाच्या वरील मतदारांच्या घरी जाऊन आज मतदान करून घेतले. आज नांदेड उत्तर मतदार संघातील कैलास नगर प्रभागातील वरिष्ठ नागरिक मोहनराव शिंदे यांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात आले. श्री शिंदे यांनी लोकसभा व विधानसभा मतदार संघासाठी मतदानाचा हक्क बजावला. या वेळी मतदान अधिकारी सौ सरस्वती शिंदे, रोहिदास बसवंरे, सूक्ष्म निरीक्षक बालाजी अंचेवार, सहाय्यक मतदान अधिकारी आर. एम. जाधव, पोलीस कर्मचारी पांचाळ आदी उपस्थित होते....
Meeting of Prime Minister Narendra Modi ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट; प्रतापराव सारख्या नेत्यांची गरज – NNL

Meeting of Prime Minister Narendra Modi ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट; प्रतापराव सारख्या नेत्यांची गरज – NNL

नांदेड, राजकीय
लोहा l कोणत्याही गावाला भागाला मतदार संघाला जिल्ह्याला नेता लागतो ..ते नेतृत्व त्याच मातीत घडते...तेथील भूमीने तो नेता घडविलेला असतो . लहानाचा मोठा केलेला असतो ..त्या नेत्याने यश अपयश पचविलेले असते....एकदा आला अन पैसे देऊन मतदाराना खरेदी करून नेता होतो म्हटल तर कसे चालेल ..मतदार संघासाठी झिजल पाहिजे ४५-५०वर्ष आयुष्याशी खर्ची घालावी लागतात. लोकसंग्रह करावा लागती तेव्हा कुठे या मातीचा सुंगध गल्ली ते दिल्ली पर्यंत दरवळत असतो . असा नेता व नेतृत्व प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत त्याची गरज मतदार संघाला आहे अशा प्रतिक्रिया उघडपणे व्यक्त होत आहेत लोहा विधान सभा मतदार संघात प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची शनिवारी (९ नोव्हेंबर ) दुपारी लोह्यात प्रचार सभा तर दुसरीकडे नांदेड मध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली हजारो जन‌समुदायाच्या साक्षीने देशाचे पंतप्...
A clever move by Congress : काँग्रेसची चाणाक्ष खेळी कोणाला तारक ठरणार, मतदारांत उत्सुकता -NNL

A clever move by Congress : काँग्रेसची चाणाक्ष खेळी कोणाला तारक ठरणार, मतदारांत उत्सुकता -NNL

नांदेड, राजकीय
राज्यामध्ये विधान सभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरु झाली आहे. नांदेड जिल्ह्यात विधान सभेसोबत लोकसभेची पोटनिवडणुकही होत आहे. जिल्ह्यात ९ मतदार संघात विधान सभेची निवडणूक होत असली तरी सर्व मतदारांचे लक्ष नांदेड लोकसभा, भोकर आणि नांदेड उत्तर या मतदार संघाकडे लागले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने यावेळी चाणाक्षपणे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे निकालाची सर्वानाच उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्तेत असलेल्या महायुतीला मोठा पराभव पत्करावा लागल्याने आता विधान सभा निवडणुकीत काय होणार ही उत्सुकता सर्वानाच लागून राहिली आहे. नांदेडमध्ये विधान सभेसोबत लोकसभेचीही पोटनिवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपामध्ये प्रवेश केला. नांदेड जिल्ह्यात आजवर काँग्रेस पक्षाची धुरा चव्हाण...
Notice to five candidates for non-submission of expenses : पाच उमेदवारांना खर्च सादर न करण्यासाठी नोटीस;13 नोव्हेंबरला पुन्हा खर्चाची दुसरी तपासणी होणार  -NNL

Notice to five candidates for non-submission of expenses : पाच उमेदवारांना खर्च सादर न करण्यासाठी नोटीस;13 नोव्हेंबरला पुन्हा खर्चाची दुसरी तपासणी होणार  -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांनी नियमित व निर्धारित कालावधीमध्ये आपला खर्च सादर करणे आवश्यक आहे. यासाठी होणाऱ्या तपासणीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य असते. अशा तपासणीला अनुपस्थित राहणाऱ्या पाच उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्या आहेत.   7 नोव्हेंबर रोजी उमेदवारांसाठी पहिली तपासणी ठेवण्यात आली होती. दुसरी तपासणी 13 नोव्हेंबर तर तीसरी तपासणी ही 17 नोव्हेंबरला होणार आहे. लोकसभेप्रमाणेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर अशा तीन तपासणी आयोजित केल्या आहेत. 7 नोव्हेंबर रोजी नियोजन भवन येथे लोकसभा पोट निवडणूक तसेच 86-नांदेड उत्तर व 87-नांदेड दक्षिण विधानसभा क्षेत्रासाठी तपासणी संपन्न झाली तर जिल्ह्यातील अन्य विधानसभा क्षेत्रासाठी क्षेत्रनिहाय तपासणी झाल्या आहेत.  7 नोव्हेंबरला झालेल्या तपासणीला खर्च निरीक्ष...
error: Content is protected !!