Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Dcm Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

Dcm Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

नांदेड, राजकीय
नांदेड| महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे आज एक दिवसाच्या नांदेड, परभणी दौऱ्यासाठी श्री. गुरू गोविंद सिंघ जी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले. यावेळी त्यांचा स्वागत करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी त्यांचे आमदार विक्रम काळे, प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.बालाजी कल्याणकर आ.आनंद शंकर तिडके, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. जिल्ह्यामधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी ते नांदेड व परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर त्यांनी स्वागत स्वीकारतानाच या ठिकाणी आलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या शिष्टमंडळाला भेट दिली त्यांचे निवेदन स्वीकारले....
NCP group ; माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या समवेत सिडको परिसरातील अमोल‌ व पवन‌ जाधव व युवकांच्या अजित पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश

NCP group ; माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या समवेत सिडको परिसरातील अमोल‌ व पवन‌ जाधव व युवकांच्या अजित पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सिडको परिसरातील अनेक युवक कार्यकर्ते माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या समवेत अजितदादा पवार राष्ट्रवादी गटात जाहीर प्रवेश करणार असुन त्यांच्या सोबत अमोल अशोकराव जाधव,व पवन अशोकराव पाटील जाधव मित्र परिवार सिडको यांच्या नेतृत्वाखाली ओम गार्डन जुना कौठा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. गेल्या अनेक वर्षा पुर्वी कै.अशोक जाधव हे वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष असतांना वेळोवेळी आंदोलने व विकासासाठी केलेल्या कामाची नोंद आजही परिसरात असुन त्यांच्या अकाली निधनां नंतर त्याचा मुलगा अमोल जाधव हा राजकारण मध्ये प्रवेश करुन वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी व नांदेड शहर महासचिव पदावर कार्यरत असताना अनेक विकासात्मक कामासह , प्रलंबित प्रश्न सोडविले आहे, सार्वजनिक क्षेत्रातील केलेल्या कार्य पाहून व गेल्या पाच वर्षां...
Godavari river ghat ; भायेगाव‌ येथील महादेव मंदिर गोदावरी नदी घाट सुशोभीकरण सह रस्त्यासाठी सहकार्य करणार.. आ.बोढारकर

Godavari river ghat ; भायेगाव‌ येथील महादेव मंदिर गोदावरी नदी घाट सुशोभीकरण सह रस्त्यासाठी सहकार्य करणार.. आ.बोढारकर

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील भायेगाव येथील गोदावरी नदीच्या काठी असलेल्या महादेव मंदिर नदीकाठ किनारावर सुशोभीकरण व‌ रस्त्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी पंचेविस पंधरा‌ निधी अंतर्गत चाळीस लक्ष रूपयांचा भायेगाव‌ ते महादेव मंदिर तिनं किलोमीटर रस्त्याचा कामांचा शुभारंभ प्रसंगी केले. गेल्या अनेक वर्षांपासून भायेगाव‌ येथे नदीकाठावर असलेल्या प्राचीन महादेव मंदिर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांची ‌व‌ शेतकरी यांना कच्च्या रस्त्याने जाणे येणे होत असल्याने व‌ पावसाळ्यात चिखल ‌होत असल्याने ही मागणी आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांच्या कडे करण्यात आली होती. मागणी दखल घेत 25 /15निधी अंतर्गत आ.बोढारकर‌ यांनी ‌चाळीस लक्ष‌ रूपये निधी उपलब्ध करून दिला,या निधीतून महाशिवरात्री ‌निमीताने 27 फेब्रुवारी ...
Politics ; नांदेड दक्षिण पुन्हा काबीजची व्यूहरचना; माजी आ हंबर्डे याच्या समोर आ हेमंत पाटील-आ बोढारकरांचे तगडे आव्हान

Politics ; नांदेड दक्षिण पुन्हा काबीजची व्यूहरचना; माजी आ हंबर्डे याच्या समोर आ हेमंत पाटील-आ बोढारकरांचे तगडे आव्हान

नांदेड, राजकीय
नांदेड। नांदेड दक्षिण हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत नेतृत्व बदल करणारा मतदार संघ होय.नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मानसिकता या भागातील मतदारांची असते त्यामुळे "प्रभावी"नेतृत्व"मिळवूनही या जनतेला हक्काचा नेता मिळू शकला नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नेते आमदार हेमंत पाटील यांचा मतदार संघ अशी ओळख झालेल्या या भागात गेल्या वेळी मोहन अण्णा हंबर्डे यांनी विजय मिळविला. पण या निवडणुकीत त्यांना नवख्या आनंदराव पाटील बोंढारकार यांनी मात दिली.त्यांना प्रतापराव व -हेमंत पाटील यांची साथ मिळाली नवीन आमदार असलेले तरी कट्टर शिवसैनिक आहेत.माजी आमदार हंबर्डे हे राष्ट्रवादी कोंग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत .नांदेड दक्षिण ची स्वारी पुन्हा यशस्वी करण्यासाठी त्याच्या पुढे आ हेमंत पाटील व आ बोढारकर यांचे तगडे आव्हान राहणार आहे नांदेड दक्षिण हा मतदार संघ पुनर्रचना मध्ये २००९ मध्ये ...
Vadgaon ; कै.शंकररावजी चव्हाण यांना‌ वडगाव येथे समाधी स्थळी चव्हाण कुटूंबीय सह मान्यवराचे अभिवादन

Vadgaon ; कै.शंकररावजी चव्हाण यांना‌ वडगाव येथे समाधी स्थळी चव्हाण कुटूंबीय सह मान्यवराचे अभिवादन

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील वडगाव येथे समाधी स्थळी जलनायक ,भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री कै.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमिता भाभी चव्हाण, आमदार ॲड.सुजया चव्हाण, यांच्या सह चव्हाण कुटूंबीय व उपस्थीत मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता वडगाव ता.जि.नांदेड येथे समाधी स्थळी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सह माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आमदार जितेश अंतापुरकर ,माजी आमदार अमर भाऊ राजुरकर,डि.पी.सावंत, ओमप्रकाश पोकर्णा, नरेंद्र चव्हाण, गणपतराव तिडके, कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड सभापती संजय लहानकर, बालाजी पांडागळे, संतोष‌ पांडागळे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर,माजी महापौर मंगला निमकर. जयश्री धुळेकर, माजी ...
Solve the problems of city : महाशिवरात्री आणि रमजान महीण्याच्या काळात शहरवासीयांच्या अडचणी सोडवा

Solve the problems of city : महाशिवरात्री आणि रमजान महीण्याच्या काळात शहरवासीयांच्या अडचणी सोडवा

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात श्री परमेश्वर देवाच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून, लवकरच पवित्र रमजान महिणा देखील सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने शहरातील प्रत्येक वार्डात स्वच्छता ठेवावी आणि ठिकठिकाणी नादुरुस्त झालेले बोअर दुरुस्त करून पाणी टंचाई भासणार नाही याची काळजी घ्यावी. महावितरण विभागाने शहरांमध्ये हिंदू - मुस्लिम समाजाच्या धार्मिक उत्सवाच्या काळात लोड शेडिंग न घेता सुरळीत वीज पुरवठा द्यावा. पोलीस प्रशासनाने किमान श्री परमेश्वराची यात्रा आणि रमजान महिन्याच्या काळात रात्री बारा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे मुभा देऊन सर्व नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी हिमायतनगर शहराचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद व माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी एका निवेदनाद्वारे नगरपंचायत, महावितरण, पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या निवेदनाच्या ...
Sand Provide ; ज्योतिबा दादा खराटेच्या पत्रावरून खा. नागेश पाटील यांचे जिल्हाधिकारी नांदेड यांना पत्र

Sand Provide ; ज्योतिबा दादा खराटेच्या पत्रावरून खा. नागेश पाटील यांचे जिल्हाधिकारी नांदेड यांना पत्र

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना माफक दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, बबनराव बारसे व भुजंगराव पाटील यांनी दि २१ फेब्रु २०२५ रोजी. खासदार नागेश पाटील अष्टीकर यांना पत्र देऊन जिल्हाधिकारी मार्फत घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी पत्र दिले होते. त्या पञाची दखल घेत खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी नांदेड यांना पत्र लिहून घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्याचे पत्र दिल्याने घरकुल लाभार्थ्यातून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे यांचे अभिनंदन होत आहे. नांदेड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना योग्य दरात नव्हे तर घर बांधकाम करण्यासाठी वाळू मिळत नाही. त्यात आपले व जिल्हा पोलीस यांच्या माध्यमातून वाळू माफियाव...
Chikhlikar ; लोहा शहरातील घरकुल लाभार्थ्यांन आ चिखलीकरांचा दिलासा ! ;९ कोटी ९० लक्ष रूपयांचे अनुदान प्राप्त

Chikhlikar ; लोहा शहरातील घरकुल लाभार्थ्यांन आ चिखलीकरांचा दिलासा ! ;९ कोटी ९० लक्ष रूपयांचे अनुदान प्राप्त

नांदेड, राजकीय
लोहा l नगर पालिका क्षेत्रातील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी पाठपुरावा करून ९कोटी ९० लक्षरुपये मंजूर करून आणले त्यामुळे तिन्ही टप्यातील लाभार्थ्यांना अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या चार महिण्याच्या २ कोटी ८३ लक्ष रुपये यापूर्वीच लाभार्थ्यांना मिळाले आणि आता प्रलंबित अनुदान पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरु झालीं आहे. पहिल्या टप्प्यातील घरकुलांचं निधी मिळणार आहे. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा शहराच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. पहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील ,माजी सभापती विठ्ठलराव पवार, व्यंकटराव मुकदम, माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, संभाजीराव धुतमल, लक्ष्मणराव हामदे, माणिकराव मुकदम, रामराव सूर्यवंशी यासह...
Kandahar ; कंधार उबाठा शिवसेनेला खिंडार एकनाथ दादा पवार यांचे विश्वासू समर्थक

Kandahar ; कंधार उबाठा शिवसेनेला खिंडार एकनाथ दादा पवार यांचे विश्वासू समर्थक

नांदेड, राजकीय
उस्माननगर l कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार असलेले एकनाथ दादा पवार यांचे विश्वासू व खंदे समर्थक म्हणून सुपरिचित युवासेनेचे कंधार तालुका प्रमुख संदीप पाटील काळम यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या पदधिकारी यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने उबाठा गटाला खिंडार पडले . उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कंधार तालुक्यात पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. उबाठा मधील बेशिस्तीमुळे आणि निष्क्रियतेमुळे अनेक जणांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला असून युवा सेनेचे कंधार तालुका प्रमुख संदिप पाटील काळम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज खा.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे . हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्य...
Amdar Baburao Kadam Kohlikar : विकासाची कामे पुर्ण करूण मतदार संघ सुजलाम सुफलाम करणार -आमदार बाबुराव कदम कोहळीकर

Amdar Baburao Kadam Kohlikar : विकासाची कामे पुर्ण करूण मतदार संघ सुजलाम सुफलाम करणार -आमदार बाबुराव कदम कोहळीकर

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार। हदगाव, हिमायतनगर मतदार संघातील जनतेनी मला विधान सभेच्या निवडणूकीत भरभरुन आशिर्वाद दिले आहे. यात विशेषकरून सिरंजनी ग्राम वासीयांचा मोलाचा वाटा आहे. हे मी कधीही विसरू शकणार नाही आणि जनतेच्या आशीर्वादाची परतफेड सर्वागीण विकासाची कामे पुर्ण करूण करणार असे प्रतिपादन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले. ते तालुक्यातील सिरंजनी येथील ग्राम वासीयांच्या वतीने आयोजित भव्य नागरीसत्कार सोहळा व तसेच आमदार कोहळीकर यांच्या हस्ते १ कोटी ७ लक्ष रूपये विविध विकास कामाचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक १४ रोजी पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार कोहळीकर उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी केले. यावेळी पुढे बोलताना आमदार कोहळीकर म्हणाले की, दोन्ही तालुक्याच्या सिंचनाचा अनुशेष कायम आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभुर्णी...
error: Content is protected !!