HomeनांदेडGodavari river ghat ; भायेगाव‌ येथील महादेव मंदिर गोदावरी नदी घाट सुशोभीकरण...

Godavari river ghat ; भायेगाव‌ येथील महादेव मंदिर गोदावरी नदी घाट सुशोभीकरण सह रस्त्यासाठी सहकार्य करणार.. आ.बोढारकर

नवीन नांदेड l नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील भायेगाव येथील गोदावरी नदीच्या काठी असलेल्या महादेव मंदिर नदीकाठ किनारावर सुशोभीकरण व‌ रस्त्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी पंचेविस पंधरा‌ निधी अंतर्गत चाळीस लक्ष रूपयांचा भायेगाव‌ ते महादेव मंदिर तिनं किलोमीटर रस्त्याचा कामांचा शुभारंभ प्रसंगी केले.

गेल्या अनेक वर्षांपासून भायेगाव‌ येथे नदीकाठावर असलेल्या प्राचीन महादेव मंदिर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांची ‌व‌ शेतकरी यांना कच्च्या रस्त्याने जाणे येणे होत असल्याने व‌ पावसाळ्यात चिखल ‌होत असल्याने ही मागणी आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांच्या कडे करण्यात आली होती.

मागणी दखल घेत 25 /15निधी अंतर्गत आ.बोढारकर‌ यांनी ‌चाळीस लक्ष‌ रूपये निधी उपलब्ध करून दिला,या निधीतून महाशिवरात्री ‌निमीताने 27 फेब्रुवारी रोजी भायेगाव ते महादेव मंदिर तिनं किलोमीटर रस्त्याचा‌ कामाचा शुभारंभ आ.बोढारकर, नांदेड शिवसेना ‌शहरप्रमुख तुलजेश यादव,
सरपंच‌ सौ.सविताभायेगावकर ,नारायण देशमुख, विठ्ठल पाटील ‌खोसडे, बापुराव पाटील कोचार,तिरूपती कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य‌ ऊर्मिला खोसडे , शिवाजी ‌खोसडे, गंगाधर पाटील खोसडे,राम पाटील कोल्हे,विशवाभंर ‌पाटील‌ कोचार, शिवानंद पाटील खोसडे,चांदु पाटील पुयड, संभाजी पाटील खोसडे,गिरमाजी पाटील कोल्हे, मारोतराव पाटील कोचार, गोविंदराव पाटील कोल्हे,रामराव‌ पाटील कोल्हे,राजु पाटील खोसडे,शंकर‌ महाराज कोचावर, संभाजी पाटील कोल्हे,गयानबा खोसडे, मारोती पाटील खोसडे,साई खोसडे,शंकर‌ खोसडे,
तिरूपती पाटील कोल्हे, भानुदास कोल्हे यांच्या सह गावातील जेष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ.बोढारकर यांनी नदीकाठ सुशोभीकरण सह तिर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत महादेव मंदिर समाविष्ट करण्यासाठी व‌ पांदण रस्ते,जलजिवन अंतर्गत असलेले अर्धवट कामे व रस्त्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी पाटील भायेगावकर यांनी केले.
महाशिवरात्री निमित्ताने आयोजित महाप्रसादाचा लाभ उपस्थित भाविक भक्तांनी घेतला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments