Godavari river ghat ; भायेगाव येथील महादेव मंदिर गोदावरी नदी घाट सुशोभीकरण सह रस्त्यासाठी सहकार्य करणार.. आ.बोढारकर
नवीन नांदेड l नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील भायेगाव येथील गोदावरी नदीच्या काठी असलेल्या महादेव मंदिर नदीकाठ किनारावर सुशोभीकरण व रस्त्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी पंचेविस पंधरा निधी अंतर्गत चाळीस लक्ष रूपयांचा भायेगाव ते महादेव मंदिर तिनं किलोमीटर रस्त्याचा कामांचा शुभारंभ प्रसंगी केले.
गेल्या अनेक वर्षांपासून भायेगाव येथे नदीकाठावर असलेल्या प्राचीन महादेव मंदिर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांची व शेतकरी यांना कच्च्या रस्त्याने जाणे येणे होत असल्याने व पावसाळ्यात चिखल होत असल्याने ही मागणी आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांच्या कडे करण्यात आली होती.
मागणी दखल घेत 25 /15निधी अंतर्गत आ.बोढारकर यांनी चाळीस लक्ष रूपये निधी उपलब्ध करून दिला,या निधीतून महाशिवरात्री निमीताने 27 फेब्रुवारी ...
