Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Dr. Padmakar Jagtap ; डॉ.पद्माकर जगताप यांच्या विनंतीची ना.गडकरी यांच्या कार्यालयाने घेतली दखल

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहुर l माहुर शहरातून जाणाऱ्या धनोडा ते कोठारी या महामार्गावरील पथदिवे बंद असणे,सर्व्हिस रोड लगत पेवर ब्लॉक न बसविणे आदी बाबींमुळे शहरातील नागरिकांसह भाविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशी व्यथा डॉ. पद्माकर जगताप यांनी दि. १६ फेब्रु. रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या संकेतस्थळावर मांडली होती.ना.गडकरी यांच्या कार्यालयाने त्याची दखल घेऊन कार्यकारी अभियंता नांदेड यांना दि.७ मार्च रोजी उचित उपाययोजना करण्यासंदर्भात सूचित केले आहे. डॉ. पद्माकर जगताप यांनी माहूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील सिसी रस्ता,नाली,सर्व्हिस रोड व दुभाजकाचे काम सुमारे दोन वर्षापूर्वीच पूर्ण झाले असल्याचे वास्तव मांडले आहे.तसेच दुभाजकावर सुमारे दहा महिन्यापूर्वी विद्युत खांब उभारून त्यावर पथदिवे बसविण्यात आले.परंतु ते सुरु झाले नसल्याने महामार्गांवर रात्रीला अंधाराचे साम्राज्य पसरलेल...
Jyotiba Kharate ; उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख ज्योतिबा खराटे यांचे संकल्पनेतून

Jyotiba Kharate ; उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख ज्योतिबा खराटे यांचे संकल्पनेतून

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे l उबाठा शिवसेनेचे खा.नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतून भव्य मोफत नेत्र तपासणी मोती बिंदू शस्त्रक्रिया आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन युवासेना जिल्हा प्रमुख अॅड.यश खराटे यांच्या हस्ते दि.१० मार्च २०२५ रोजी माहूर येथील जुने नगरपंचायत इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत तालुका प्रमुख उमेश जाधव, उपनगराध्यक्ष नाना लाड, रविंद्र बेहेरे पाटील, शहर प्रमुख निरधारी जाधव, शेतकरी से.ता.प्रमुख अशोक उप्पलवाड, युवा जिल्हा समन्वयक आकाश सातव, गटनेत्या आशा जाधव, मा.गटनेते/शहर समन्वयक बालाजी वाघमारे, युवतीसेना तालुका प्रमुख सुरेखा तळणकर, युवासेना जिल्हा उपप्रमुख, जितु चोले युवासेना विधानसभा प्रमुख खुशाल तामखाने, युवासेना तालुका प्रमुख अक्षय वाघ, शहर प्रमुख संदिप गोरडे, सो.मि.वि.स.प्रमुख...
Adv. Sangharatna Gaikwad  : राकाँच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश संघटक सचिवपदी ॲड.संघरत्न गायकवाड

Adv. Sangharatna Gaikwad : राकाँच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश संघटक सचिवपदी ॲड.संघरत्न गायकवाड

नांदेड, राजकीय
उस्माननगर| येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष ॲड.संघरत्न गायकवाड यांनी पक्षात केलेल्या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुनिल मगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक सचिव म्हणून निवड केली आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे. नांदेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते ॲड.संघरत्न गायकवाड यांची १० आकटोबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून प्रा सुनिल मगरे यांनी निवड केली होती. शहराध्यक्ष ॲड.संघरत्न गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात पक्षाचे संघटक व पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले. नांदेड शहरातील सर्व भागात पक्षाचे संघटन वाढवून सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष म्हणून च...
Prataprao Patil Chikhlikar ; तकारी- लक्ष द्या : जनतेची कामे वेळेत करा आ० प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे निर्देश

Prataprao Patil Chikhlikar ; तकारी- लक्ष द्या : जनतेची कामे वेळेत करा आ० प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे निर्देश

नांदेड, राजकीय
लोहा l उपजिल्हा रुग्णालयात वेळेवर रुग्णाला वेद्यकीय सेवा मिळत नाही. डॉक्टर नसतात कर्मचारी येत नाही त्यामुळे रुग्ण व नातेवाईक यांची हेळसांड होतेय.असा तक्रारी आहेत पंचायत समितीत घरकुल व अन्य योजनेच्या असंख्य तक्रारी आहेत. वीज विभागाने वेळत डीपी द्यावेत. तसेच मार्केट कमिटीने व्यापाऱ्याना जादा फीस आकारणी करू नये . सर्व विभागाम्याने जनतेची कामे वेळेत करावे तक्रारी येऊ देऊ नका. जनतेची कामे वेळेवर करावीत शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी असे निर्देश आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले. लोहा तहसील कार्यालयात आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समितीची बैठक पार पडली . या बैठकीस उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार तहसीलदार विठ्ठल परळीकर कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे, प्रविण पाटील चिखलीकर, गटविकास अधिकारी डी. के आडेराघो, माणिकराव मुकदम, हंसराज पाटील बोरगावकर. ...
Shiv Sena Thackeray ; कन्नड भाषिकांना शिवसेना ठाकरे गट कडून जशास तसे उत्तर

Shiv Sena Thackeray ; कन्नड भाषिकांना शिवसेना ठाकरे गट कडून जशास तसे उत्तर

नांदेड, राजकीय
नांदेड| बस स्थानकातून कर्नाटक येथील कलबुर्गी येथे गेलेल्या बसच्या कंडक्टर ड्रायव्हरला कन्नड भाषिकांनी महाराष्ट्राच्या कंडक्टर ड्रायव्हर ड्रायव्हरचा अपमान करून परत पाठवले त्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे प्रकाश मारावार यांच्या नेतृत्वखाली नांदेड बस स्थानकात आलेल्या कर्नाटक येथील बसेस अडवून कन्नडी कंडक्टर.ड्रायव्हर यांना झालेला प्रकाराचा शिवसेना स्टाईल जाब विचारण्यात आला तब्बल तीन तास कन्नडी बसेस अडवून कानडी भाषकांचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. कर्नाटकात नांदेड कलबुर्गी या बस मधील ड्रायव्हर नामदेव पप्पूले. कंडक्टर संदीप किरवले यांना ज्या पद्धतीने अपमान करण्यात आला त्याचा बदला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व एसटी कामगार सेनेच्या वतीने घेण्यात आला. कन्नडी बसेसच्या परमिट नसल्यामुळे गाड्या थांबविण्यात आल्या. कनाडी चालक वाहक यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर गाड्या सोडण्यात आल्या. नांदेड आग...
Amit Gorkhe ; अनुसूचित जाती आरक्षण मध्ये अ ब क ड लागु करावे ,विधानपरिषद सदस्य आ. अमित गोरखे यांची मागणी

Amit Gorkhe ; अनुसूचित जाती आरक्षण मध्ये अ ब क ड लागु करावे ,विधानपरिषद सदस्य आ. अमित गोरखे यांची मागणी

नांदेड, राजकीय
नांदेड l महाराष्ट्र शासनाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात विधान परिषद सभागृहात अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या बदर समितीचा प्रारूप अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देऊन लवकरात लवकर अ,ब, क, ड,आरक्षण महाराष्ट्रात लागू करावे," अशी मागणी सभागृहात आ.अमित गोरखे यांनी विशेष उल्लेख, लक्षवेधीद्वारे मागणी केली असून या मागणीचे स्वागत नवनाथ कांबळे, जिल्हाध्यक्ष,भाजपा अनुसूचित मोर्चा नांदेड यांनी केले आहे. "सर्वोच न्यायालयाच्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य शासनास प्राप्त झाले असून या न्याय निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्यादृष्टीने प्रारुप आराखडा शासनास सादर करण्यासाठी एक सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले. " असे ते म्हणाले, "यासाठी शासनाने अनुसूचित जाती...
Laxmikant Jadhav ; शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी नांदेड जिल्हा संघटकपदी संतोष बारसे तर नांदेड तालूका अध्यक्षपदी लक्ष्मीकांत जाधव यांची निवड

Laxmikant Jadhav ; शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी नांदेड जिल्हा संघटकपदी संतोष बारसे तर नांदेड तालूका अध्यक्षपदी लक्ष्मीकांत जाधव यांची निवड

नांदेड, राजकीय
नविन नांदेड l महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशा नुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजय भाऊ मोरे व ओबीसी नेते तथा शिवसेनेचे व्हिजेएनटी ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जाचे बाळासाहेब किसवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांच्या हस्ते वदि ४ मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील जिल्हा संघटकपदी संतोष बारसे तर नांदेड तालूका अध्यक्षपदी लक्ष्मीकांत जाधव यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. वरील सर्व पदधिकारी यांनी गेल्या अनेक वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात व गावचे सरपंचया पदावर ही त्काम केले असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन त्यांना शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी पक्षाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी कल्हाळचे सरपंच...
free eye checkup and health checkup camp : जिल्हाप्रमुख खराटे यांच्या संकल्पनेतुन भव्य मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.

free eye checkup and health checkup camp : जिल्हाप्रमुख खराटे यांच्या संकल्पनेतुन भव्य मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| किनवट-माहूर विधानसभेतील शहर व ग्रामीण भागात नागरिकांचे सेवेकरिता भव्य मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मा वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात केले आहे. शिवसेनेचे (उबाठा ) जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतुन व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई शिवसेना (उबाठा) किनवट - माहूर विधानसभा व लोककल्याण बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माहूर तालुक्यात रविवार दि.९ मार्च २०२५ रोजी वानोळा ग्राम पंचायत कार्यालय तर सोमवार दि.१० मार्च रोजी माहूर येथील जुने नगर पंचायत कार्यालयात व मगंळवार दि.११ मार्च रोजी वाई बाजार येथील ग्राम पंचायत कार्यालयात सकाळी ९ ते ५ या वेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे. तसेच किनवट तालुक्यात बुधवार दि.१२ मार्च ला संत सेवालाल मंदीर मांडवी,गुरूवार,दि.१३ मार्चला हनुमान मंदीर जवळ, तंटामुक्ती भवण, उमरी (बा.) व शनिव...
Nanded ; नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील सरपंचांना निधी कमी पडू देणार नाही

Nanded ; नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील सरपंचांना निधी कमी पडू देणार नाही

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l नांदेड दक्षिण मतदारसंघातील सरपंचांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही शिवसेना शिंदे गटाचे नेते आ.हेमंत पाटील यांनी जिजाऊ नगर वाडी पाटी येथे नांदेड दक्षिण मधील अनेक गावातातील सरपंच उपसरपंच व पदाधिकारी सह शैकडो कार्यकर्ते जाहीर प्रवेश सोहळा प्रसंगी केले. 27 फेब्रुवारी रोजी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिजाऊ नगर वाडी पाटी येथे नांदेड दक्षिण मधील अनेक गावांतील सरपंच उपसरपंच व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सह शैकडो युवकाचा कामाजी पाटील सरपंच डेरला व आकाश येवले सरपंच मार्कंड यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ.आंनदराव बोढारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, ओबीसी जिल्हा प्रमुख अनिल पाटील धमणे,तालुका प्रमुख अशोक मोरे,शिवसेना शहरप्रमुख तुलजेश यादव, सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे,मारोती धुमाळ, ...
Nagar Panchayat Mahur : नगर पंचायत माहूर ९६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्‍प मंजुर

Nagar Panchayat Mahur : नगर पंचायत माहूर ९६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्‍प मंजुर

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| नगर पंचायत माहूर च्‍या सभागृहात दि, २८ फेब्रु रोजी नगराध्‍यक्ष फिरोज दोसानी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली मुख्‍याधिकारी विवेक कांदे,उपाध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर नारायण लाड यांच्‍या व ईतर सदस्‍यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झालेल्‍या अर्थसंकल्‍पीय विशेष सभेत सन २०२५/२६ चा रक्‍कम रुपये ९५.०५.५८.७०२ रक्‍कमेचा व रक्‍कम रुपये ८.८८.६३७ रुपयांचा शिल्‍लकी अर्थसंकल्‍प मंजूर करण्‍यात आला. नगर पंचायत माहूरच्‍या सभागृहात अर्थसंकल्‍पीय विशेष सभा संपन्‍न झाली. या सभेत सन २५/२६ साठीच्‍या अर्थसंकल्‍पाचे वाचन लेखापाल वैजनाथ स्‍वामी यांनी केले. दि,२८ रोजी नगर पंचायत माहूरच्‍या सभागृहात अर्थसंकल्‍पीय विशेष सभा संपन्‍न झाली. या सभेत सन २०२५/२६ साठीच्‍या अर्थसंकल्‍पाचे सविस्‍तर वाचन लेखापाल वैजनाथ स्‍वामी यांनी केले. अंदाजपत्रकानुसार नगर पंचायत माहूरला 1) दर व करापासुन 1,81,07,400/- रुपये, 2) ...
error: Content is protected !!