Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Former Speaker Sanjay Patil Karhale : सत्ताधारी भाजपाच्या मंडळींना अंतेश्वर बंधारा व शेतकऱ्यांचे काही देणे -घेणे नाही – माजी सभापती संजय पाटील कऱ्हाळे

Former Speaker Sanjay Patil Karhale : सत्ताधारी भाजपाच्या मंडळींना अंतेश्वर बंधारा व शेतकऱ्यांचे काही देणे -घेणे नाही – माजी सभापती संजय पाटील कऱ्हाळे

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा तालुक्यातील अंतेश्वर बंधाऱ्याचे पाणी अहमदपूर येथे नेण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री हे आग्रही आहेत प्रशासकीय पातळीवर तशी जोरदार तयारी सुरू आहे. त्याविरोधात शेतकरी नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी यास तीव्र विरोध दर्शविला असून, मंत्रालय पातळीपर्यंत आणि त्याही पुढे जाऊन या निर्णया विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय अंतेश्वर बंधारा कृती समितीने घेतला आहे. पण शेतकऱ्यांचे नाव घेऊन राजकीय हेतू समोर ठेवून पुन्हा समिती गठीत करणाऱ्या सत्ताधारी भाजपाच्या "बेगडी "पणा कळवळा जनतेला माहिती आहे त्यांना या प्रश्नाचे काहीच घेणेदेणे या शब्दात माजी शिक्षण सभापती व अंतेश्वर बंधारा सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष संजय पाटील कऱ्हाळे यांनी समाचार घेतला . राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लोहा तालुक्यातील अंतेश्वर बंधाऱ्यातून अहमदपुर तालुक्यात शेती सिंचनासाठी पाणी नेण्याचे वक्तव...
Shrirang Gaikwad : श्रीरंग गायकवाड यांचे वक्तव्य संभ्रमित करणारे : स. रविन्द्रसिंघ मोदी

Shrirang Gaikwad : श्रीरंग गायकवाड यांचे वक्तव्य संभ्रमित करणारे : स. रविन्द्रसिंघ मोदी

नांदेड, राजकीय
नांदेड| संत साहित्याचे अभ्यासक आणि दैनिक तरुण भारत (कोल्हापूर) संपादक श्रीरंग गायकवाड यांनी शुक्रवारी श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन केंद्र येथे एका व्याख्यानात संत नामदेवजी महाराज यांनी भ्रमन्ती केली. पंजाब मध्ये जाऊन शीख धर्माचा पाया घातला, असे दिशाभूल करणारे वक्तव्य केले आहे. त्यांनी वरील वक्तव्य परत घ्यावे अशी मागणी अध्यासन केंद्र सल्लागार समितीचे सदस्य आणी शीख धर्माचे अभ्यासक स. रविंद्रसिंघ मोदी यांनी येथे केली आहे. शुक्रवार दि. 21 मार्च रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठाच्या श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन केंद्र येथे श्री गुरु गोबिंद सिंघजी अध्यासन केंद्र आणी नानकसाईं फाउंडेशन नांदेड तर्फे साहित्यिक श्रीरंग गायकवाड यांचे "संत नामदेव महाराज : लौकिक व वांग्मयन योगदान " या विषया वर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ...
The sarpanch of Kamarwadi : हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडीच्या सरपंच अखेर पाय उतार

The sarpanch of Kamarwadi : हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडीच्या सरपंच अखेर पाय उतार

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| तालुक्यातील कामारवाडीच्या सरपंच यांनी वेळेत ग्रामसभा घेतली नसल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पाय उतार व्हावे लागले आहे. वादी व प्रतिवादी यांच्या दस्ताऐवजाचे अवलोकन करून जिल्हाधिकारी नांदेड यांनी हा निर्णय दिला असून, उपसरपंचाकडे आता सरपंच पदाचा पदभार देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या न्याय दालनात वादी संतोष उत्तमराव देवराये उपसरपंच, व ग्रामपंचायत सदस्या गोदावरीबाई प्रकाश कलाणे, चंद्रकलाबाई विलास मनमंदे, सुरेखा मारोती मनमंदे, अमोल केशव सुर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रतिवादी सारिका श्यामसुंदर हुलकाने यांच्या विरुद्ध असा विवाद दाखल केला की,कामारवाडी सरपंच पदांवर निवड झाल्यानंतर माहे जानेवारी २०२२ ते माहे फेब्रुवारी २०२४ पर्यंत २६ मासीक सभा घेणे आवश्यक होते. परंतू आपण माहे जानेवारी २०२२ ते माहे सप्टेंबर २०२३ पर्यंत एकूण २१ मासीक सभेत उपस्थित सदस्य यांची उपस...
Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

नांदेड, राजकीय
नांदेड| महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी श्री. गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक यांचेही आगमन झाले. यावेळी त्यांचे आमदार विक्रम काळे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजू नवघरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार. महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, राज्य उत्पादन शुल्कचे नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. बी.एच. तळवी, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आणि विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्ह्यामधील विविध कार्यक...
Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा

Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार हे रविवार 23 मार्च 2025 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार 23 मार्च 2025 रोजी बारामती विमानतळ येथून विमानाने सकाळी 10.15 वा. श्री गुरू गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11 वा. मोटारीने नायगाव तालुक्यातील नरसी येथे आगमन व राखीव. दुपारी 2.40 वा. नायगाव येथे शिवराज पाटील होटाळकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सायंकाळी 4 वा. मोटारीने स्वागत लॉन्स सांगवी विमानतळ रोड नांदेड येथे आगमन. नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष ग्रामीण, शहर जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी आमदार यांची बैठक. त्यानंतर सायं 6.30 वा. मोटारीने हैदरगार्डन देगलूर नाका नांदेड येथे आगमन व इफ्तार पार्टी कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 7.55 वा. ...
Bhimrao Keram ; गोंडराजे बख्त बुलंदशाह यांच्या समाधी स्थळाचा विकास करा आ.भीमराव केराम यांची लक्षवेधी

Bhimrao Keram ; गोंडराजे बख्त बुलंदशाह यांच्या समाधी स्थळाचा विकास करा आ.भीमराव केराम यांची लक्षवेधी

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे l नागपूर नगरीचे संस्थापक गोंडराजे बख्त बुलंदशाह यांच्या समाधीचे संवर्धन करण्यासाठी ९ कोटी ७२ लाखांचा आराखडा नागपूर सुधार प्रन्यासने राज्य शासनाकडे पाठविला, त्याला नऊ महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही तिथला विकास झाला नाही. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात निधी मंजूर करावा आणि सक्करदरा येथे असलेल्या या समाधी स्थळाच्या कामाला गती द्यावी अशी मागणी आ.भीमराव केराम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे. गोंडराजे बख्त बुलंदशाह यांच्या समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने संवर्धनाची प्रक्रिया हाती घेतली.परंतु त्या कामी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या त्या दूर करून समाधीचे संवर्धन होऊन नागपूरचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा. यासाठी हा प्रकल्प पूर्णत्वास जाणे आवश्यक असल्याचे आ. भीमराव केराम यांनी आपल्या लक्षवेधित म्हटले आहे.तसेच नागप...
Pratap Patil Chikhalikar ; पाच वर्षात रस्त्यासह जल सिंचनाला प्राध्यान –आ प्रतापराव पाटील चिखलीकर

Pratap Patil Chikhalikar ; पाच वर्षात रस्त्यासह जल सिंचनाला प्राध्यान –आ प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड, राजकीय
लोहा। पाच वर्षीत दळणवळणाची सुविधा व्हावी रस्ते आरोग्य शिक्षण यासह जल सिंचनासाठी प्रयत्न दुरु राहणार असून येत्या काळात धोंड प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा राहणार आहे जेणेकरून या भागात शेती सिचनासाठी त्याचा उपयोग होईल.आपण नेहमीच जाती विरहित राजकारण केले कधीच जातीभेद केला नाही आणि करणार नाही आपला हात -घडी "के साथ असावा असे अहवान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. लोहा तालुक्यातील बेरळी ते देऊळगाव फाटा या १६२.१७ लक्ष रुपये निधी खर्चून रस्ता होणार आहे त्याचे भुमिपुजन शनिवारी (१५ मार्च) आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते देऊळगाव येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष देऊळगाव चे सरपंच मारोतराव सोनवळे होते प्रमुख पाहुणे म्हणून , माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी,माणिकराव,मुकादम, राकॉ पार्टी कंधार तालुकाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर, राकाँ पार्टी तालुकाध्यक्ष छत्रपत...
Committee formed : माहूर शहरातील बुथ ३० व ३१ ची समिती गठीत

Committee formed : माहूर शहरातील बुथ ३० व ३१ ची समिती गठीत

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर,कार्तिक बेहरे| भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात बुथस्तरीय समित्या गठीत करण्यात येत आहेत, त्या अनुषंगाने किनवट-माहुर मतदारसंघांचे आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष श्रीकांत घोडेकर यांच्या नेतृत्वात माहुर शहरासह तालुक्यात बुथस्तरीय समित्या स्थापन करण्यात येत आहे. दि.११ मार्च २०२५ रोजी जेष्ठ पत्रकार तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले यांनी माहुर शहरातील बुथ क्रमांक ३० व ३१ मध्ये बुथ समित्या गठीत करीत बुथ क्र. ३० च्या बुथ प्रमुख पदी जुने जाणते कार्यकर्ते गोपाल वामनबुवा आराध्ये तर बुथ क्र.३१ च्या बुथप्रमुख पदी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सुजाता सुदर्शन जोगदंडे याची निवड करण्यात आली. यावेळी विजय आमले यांनी दोन्ही बुथ प्रमुखांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत....
Mahayagya : आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी सपत्नीक महायज्ञात घेतला सहभाग

Mahayagya : आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी सपत्नीक महायज्ञात घेतला सहभाग

नांदेड, राजकीय
हिमायतनगर/नांदेड| मौजे पिंपळगाव ता हदगाव येथे १०८ कुंडी विश्र्वशांती दत्तयाग महायज्ञात आज दि १२/०३/२५ रोजी सकाळी लोकनेते आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी सपत्नीक महायज्ञात सहभाग घेतला. सातव्या दिवशी दिनांक १३ मार्च रोजी वृंदावन (रेवासा) शि.भ.प.राजेद्रदास देवाचार्यजी महाराज यांच्या मधूर वाणितून शिवमहापुराण कथा समाप्ती कार्यक्रम आहे. दत्त मंदिर पिंपळगाव मठाधिपती प.पू. व्यंकटस्वामी महाराज यांच्या या भव्य कार्यक्रमासाठी अनेक संत, महंत, नागा साधू, साध्वी, किर्तनकार,अनेक आखाड्याचे प्रमुख मठाधिपती, अनेक मंत्री, खासदार, आमदार, प्रशासकिय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, सर्व क्षेत्रातील भाविक भक्त मंडळी, महीला मंडळी, शेतकरी, युवकांनी, स्वयंसेवक, सेवेकरी भक्त मंडळी, नांदेड जिल्हा, यवतमाळ, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी, परराज्यातील अनेक मान्यवर मंडळी, महंत, संत, कथा -किर्तनकार , श्र...
Godavari Irrigation Corporation takes Anteshwar Dam water issue : गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडे अंतेश्वर बंधाऱ्याचा पाणी प्रश्न ; माजी आ धोंडगे न्यायालयात जाणार (?)

Godavari Irrigation Corporation takes Anteshwar Dam water issue : गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडे अंतेश्वर बंधाऱ्याचा पाणी प्रश्न ; माजी आ धोंडगे न्यायालयात जाणार (?)

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा तालुक्यातील अंतेश्वर बंधाऱ्यातून दोन टीएमसी पाणी आपल्या मतदार संघात अहमदपूर (झरी) येथे नेण्याचे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर तयारी केली आहे. पण या निर्णयास एमआरएस पक्षाचे संस्थापक माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, माजी शिक्षण सभापती काँग्रेसचे संजय पाटील कऱ्हाळे व ५० गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. बंधारा बचाव कृती समितीचे अध्यक्ष शिष्टमंडळाने माजी आमदार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर येथे वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. पाणी कोणत्याही परिस्थितीत अहमपूर येथे जाऊ देणार नाही वेळप्रसंगी न्यायालयाचे दार ठोठावु असा निर्धार कृती समितीने व्यक्त केला. लोहा तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर अतेश्वर येथे उच्च बंधारा तत्कालीन आमदार शंकर अण्णा धोंडगे याच्या काळात उभारण्या...
error: Content is protected !!