Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Hadgaon : हदगाव एस.टी. आगाराला नवीन बसेस अद्यापही नाहीत….

Hadgaon : हदगाव एस.टी. आगाराला नवीन बसेस अद्यापही नाहीत….

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव विधानसभा क्षेत्राचे आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी मागील महीण्यात पार पडलेलया अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन हदगाव एस.टी. आगारा साठी नवीन बस देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापही या मागणीची पूर्तता झालेली नाही. हदगाव आगारात एका ही नवीन बसची भर पडलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे, नांदेड जिल्ह्यातील काही डेपोला नवीन बसेस प्राप्त झाल्याची माहीती आहे. त्यामुळे हदगाव एस टी आगार ला वगळले गेले का...? असा सवालही नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. या संदर्भात मा. आमदार यांनी संबंधित परिवहन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी करून तातडीने नवीन बसेस देण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. हदगाव आगारातील अनेक बसेस ना दुरुस्त असून, विशेष म्हणजे काही गावे अजूनही एस.टी.च्या सेवांपासून वंचित आहेत. शालेय कॉलेज ...
Ramnavmi mla bhimrao keram ; श्रीराम नवमी निमित्त आमदार भीमराव केराम यांनी प्रभू श्रीराम मंदिरात केली महापूजा

Ramnavmi mla bhimrao keram ; श्रीराम नवमी निमित्त आमदार भीमराव केराम यांनी प्रभू श्रीराम मंदिरात केली महापूजा

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किनवट व गोकुंदा शहरात प्रभू श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात मर्यादा पुरुषोत्तम जय श्री रामाचा जयघोष करत, गजरात साजरा करण्यात आला. परिणामी अवघी किनवट नगरी दणाणली होती. भगव्या पताका, भगव्या झेंड्यांनी अवघे शहर भव्यमय झाले होते. दरम्यान शहरातील रामनगर येथील श्रीराम मंदिरात लोकनेते आमदार भीमराव केराम यांनी श्रद्धा भावाने प्रभू श्री रामाची पूजा केली. सकाळपासूनच प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांची रांग लागली होती. मतदारसंघातील सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच तालुक्यातील रामभक्तांनी श्रीराम भक्त मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावल्याचे दिसून आले. दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील मुस्लिम समाजातील युवा नेतृत्व मुसाखान यांनी बुंदी...
Chikhlikar ; नागरीकांच्या अडीअडचणींचे गावातच निराकरण झाले पाहिजे! आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

Chikhlikar ; नागरीकांच्या अडीअडचणींचे गावातच निराकरण झाले पाहिजे! आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड, राजकीय
महाराष्ट्र राज्य निर्मीती नंतर पहिल्यांदाच महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले ., महायुती सरकार सामान्य नागरिक, लाडक्या बहिणी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसाचा कृती कार्यक्रम अंतर्गत म शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत असुन छोट्या-मोठ्या कामासाठी तालुक्याच्याफेऱ्या टाळण्यासाठी प्रशासन आपल्या गावात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरीकांच्या अडीअडचणींचे गावातच निराकरण झाले पाहिजे.बीडीओ याचे कामात लक्ष नाही घरकुल योजनेत लाभार्थ्यांना वेळेत अनुदान द्यावे. सोमवारी कंधार येथे आठवडी बाजार असतो त्यामुळे शक्यतो अधिकारी यांनी कार्यालयात राहावे असे सूचना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केल्या शिराढोण ( ता कंधार) येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शनिवारी ( ५ एप्रिल ) गावात घेण्यात आला .यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी आश्...
Financial assistance : ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य

Financial assistance : ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
मुंबई| नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी ११ महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले आहे. अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रध्दांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेतिकामासाठी त्या जात होत्या. त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली आहे....
Chief Minister Devendra Fadnavis : सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे ‘जियो टॅगिंग’ करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे ‘जियो टॅगिंग’ करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, राजकीय
मुंबई| राज्यातील सर्व शाळांचे पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह ' जियो टॅगिंग' करण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्य:स्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या इमारतीचे सौर ऊर्जीकरण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी २२ विभागांच्या १०० दिवस आराखड्याचा आढावा घेतला. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संबंधित विभागाचे मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व शासकीय इमारतींचे सौर ऊर्जीकरण करतांना त्याचे पुढील पाच वर्षाचे व्यवस्थापन संबंधित पुरवठादा...
MLA Chikhlikar : शिक्षक नेते बी वाय चव्हाण यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात आमदार चिखलीकरांची चौफेर फटकेबाजी

MLA Chikhlikar : शिक्षक नेते बी वाय चव्हाण यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात आमदार चिखलीकरांची चौफेर फटकेबाजी

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा कंधार एकत्रित तालुका असताना माझे वडील गोविंदराव पाटील ,माजी सभापती व्यंकटराव मुकदम, लोह्याचे माजी सरपंच यशवंतराव चव्हाण यांनी दीर्घकाळ एकत्रितपणे कार्य केले. आता चव्हाण कुटुंबातील दुसऱ्या तिसऱ्या पिढीतही आमच्या सोबत एकत्रित यायला काहीही हरकत नाही. चव्हाण कुटुंबियातील कोणाचीही "सेवानिवृत्त " असो मला बोलवा मी येत जाईल. या भागातील मतदार संघातील जनतेनी "चांगला माणूस" म्हणून मला एवढया अटीतटीच्या काळात निवडून दिले अशी खुमासदार शैलीत फटकेबाजी करत त्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी वाय चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला. आता सेवानिवृती नंतर "घडी" बांधण्याची योग्य वेळ आहे असे जाहीरपणे निमंत्रण दिले. जिल्हा परिषद प्रशाला धावरी येथील मुख्याध्यापक बालाजी यशवंतराव चव्हाण यांच्या सेवानिवृती गौरव सोहळा शहरातील राधाई मंगल कार्यालयात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या अध्यक्षतेखाली पार पडला...
MLA Bhimrao Keram ; आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पाच एसटी बसचे लोकार्पण

MLA Bhimrao Keram ; आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पाच एसटी बसचे लोकार्पण

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर l तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर आगरासाठी किनवट माहुर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे परीवहण मंत्री यांच्या कडे किनवट व माहुर अगारासाठी नविन बससेची मागणी केली होती ती मागणी मान्य केल्याने माहुर अगारासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाच बसेस मिळाल्या त्या बसचे आ.भीमराव केराम यांनी माहूर ते दत्तशिखर असे सात किलोमीटर प्रवास करून लोकार्पण केले यावेळी बस उपलब्ध करून दिल्याने आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि परिवहन मंत्र्यांचे आभार मानले तिर्थक्षेत्र असलेल्या माहुर आगाराच्या बसेसची अवस्था दयनीय झाली असल्याने बसेस सतत नादुरुस्त होत असल्याने त्या प्रवाशांच्या सेवेत वेळेत उपलब्ध होण्यासाठी विलंब होत होता यांचा प्रवासी व साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ शक्तिपीठ असलेल्या रेणुका माता भगवान दत्तप्रभू माता अनुसय...
Chikhlikar ; लोहा नगर पालिकेत घरकुल लाभार्थी – बचत गटाना आ चिखलीकरांच्या हस्तेअडीच कोटी रुपयांचे अनुदान वाटप

Chikhlikar ; लोहा नगर पालिकेत घरकुल लाभार्थी – बचत गटाना आ चिखलीकरांच्या हस्तेअडीच कोटी रुपयांचे अनुदान वाटप

नांदेड, राजकीय
लोहा l लोहा नगर पालिकेत घरकुल लाभार्थ्यांना गेल्या सहा वर्षात अनुदानासाठी चकरा माराव्या लागत होत्या पण आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी १० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून शनिवारी (२९ मार्च) बचत गटांना १ कोटी २६ लक्ष रुपये , घरकुल लाभार्थ्यांना ८० लक्ष रुपये तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रजा रोखीकारणाचे २३ लक्ष रुपयांचे धनादेश आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.शहरातील नागरिकांना कामासाठी नगर परिषदेत त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असा सूचना त्यांनी केल्या. लोहा नगर परिषदेच्या वतीने तुळजाई मंगल कार्यालयात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते विविध योजने अंतर्गत अनुदान वाटप व विविध स्पर्धा बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी नगर परिषदेच्या प्रशासक उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, माजी नगराध्यक्ष...
Prime Minister Narendra Modi’s visit : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ३० मार्च रोजी महाराष्ट्र दौरा

Prime Minister Narendra Modi’s visit : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ३० मार्च रोजी महाराष्ट्र दौरा

नागपूर, राजकीय
नवी दिल्ली| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून, नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये अनमॅन्ड एरियल व्हेईकल्ससाठी १२५० मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे. तसेच नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत २५० खाटांचे रुग्णालय, १४ बाह्यरुग्ण विभाग आणि अत्याधुनिक १४ ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूर आणि विदर्भातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या नेत्रचिकित्सा सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रधान...
Dr. Vijay Satbir Singh ; महसूल मंत्री बावनकुळे व पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन गुरुद्वारा बोर्डाच्या विकासाबद्दल चर्चा – डॉ. विजय सतबीर सिंघ

Dr. Vijay Satbir Singh ; महसूल मंत्री बावनकुळे व पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन गुरुद्वारा बोर्डाच्या विकासाबद्दल चर्चा – डॉ. विजय सतबीर सिंघ

नांदेड, राजकीय
नांदेड l डॉ. विजय सतबीर सिंघ, पूर्व IAS अधिकारी, प्रशासक गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड, नांदेड यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे व नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री श्री अतुल सावे यांच्यांशी सदिच्छा भेट घेऊन गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या विकासाबद्दल चर्चा केली. त्यावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्री राहुल करडीले सुद्धा उपस्थित होते. यावेळी प्रशासक साहेबांनी गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या अंतर्गत सुरु असलेल्या विकास कामांबद्दल आणि शैक्षणिक संस्थांबद्दल माहिती दिली. ज्यामध्ये प्रशासक साहेबांच्या प्रयत्नांनी सुरु झालेल्या नांदेड विमान सेवा हि सध्या देशातील एकूण ०९ शहराशी जुडलेली असून, या सेवेस मुंबई व देशातील इतर मोठ्या शहरांशी जोडण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच गुरुद्वारा बोर्डातर्फे अनेक शैक्षणिक संस्था चालविल्या जात आहेत. ज्यामध्ये CBSE स्कूल, ITI, आ...
error: Content is protected !!