Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 1 डिसेंबरला रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुदत

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 1 डिसेंबरला रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुदत

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई l नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असेल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही....
Minister Gulabrao Patil : “रामा चं धनुष्यबाण दाबा, नगरपंचायतीवर भगवा फडकवा !” — मंत्री गुलाबराव पाटील

Minister Gulabrao Patil : “रामा चं धनुष्यबाण दाबा, नगरपंचायतीवर भगवा फडकवा !” — मंत्री गुलाबराव पाटील

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सुरू करून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक बळ देणारे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी महिलांच्या विकासाचे नवे पर्वच सुरू केले. या योजनेमुळे लाडक्या बहिणींनी महायुतीला उदंड पाठिंबा दिला. ही योजना पुढेही कायम राहणार आहे. मात्र हिमायतनगरचा नगराध्यक्ष ‘आपल्या विचारांचा’ असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी केले. दिनांक २८ रोज शुक्रवारी येथील श्री परमेश्वर मंदिर मैदानात झालेल्या जाहीर सभेत प्रचंड उत्साहात बोलताना ना. पाटील म्हणाले कि, “३० वर्षे शिवसेनेची पताका खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या राम ठाकरे यांना शिवसेनेने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. खऱ्या अर्थाने हिमायतनगरला रामराज्य आणायचे असेल तर ‘धनुष्यबाण’ या निशाणीवरील बटन दाबून नगरपंचायतीवर भगवा फडकवा!” असे आ...
Sujat Ambedkar : हिमायतनगरात सुजात आंबेडकरांचा झंझावात! वॉर्ड ७ मध्ये विशाल हनवते यांच्या उमेदवारीला प्रचंड बळ

Sujat Ambedkar : हिमायतनगरात सुजात आंबेडकरांचा झंझावात! वॉर्ड ७ मध्ये विशाल हनवते यांच्या उमेदवारीला प्रचंड बळ

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आणि आंबेडकर घराण्याचे करारी नेतृत्व हिमायतनगरात उतरल्याने शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः दणाणून गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पणतू, राज्यातील युवा आयकॉन सुजातसाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विशाल हनवते यांच्या प्रचारार्थ वॉर्ड क्रमांक ७ मधील सभेत सहभाग घेताच संपूर्ण शहराचे लक्ष तिकडे वेधले. सुजातसाहेबांचे आगमन म्हणजे जणू झंझावाताचं आगमन सभेतील उत्साह, टाळ्यांचा कडकडाट आणि समाजाचा उसळलेला जीवंत प्रतिसाद पाहता वातावरण क्षणात तापले. “आंबेडकर घराण्याचे पाऊल आज हिमायतनगरात पडले… समाजबांधवांसाठी हा क्षण भावनिक ठरला. सुजात दादाच्या उपस्थितीने समाजाची अनेक वर्षांची शांतता आणि मरगळ दूर झाली. त्यांच्या शब्दांतील प्रांजळपणा आणि लढाऊ आत्मा पाहून सभागृहातील नागरिक अक्षरशः भारावून गेले. काँग्रेसवर तुफानी ह...
Dnyaneshwar Shinde : वॉर्ड क्रमांक 8 चे उमेदवार ज्ञानेश्वर शेषेराव शिंदे यांनी मांडला मतदारांसमोर विकासदृष्टीचा रोडमॅप

Dnyaneshwar Shinde : वॉर्ड क्रमांक 8 चे उमेदवार ज्ञानेश्वर शेषेराव शिंदे यांनी मांडला मतदारांसमोर विकासदृष्टीचा रोडमॅप

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पार्टीकडून वॉर्ड क्रमांक 8 चे उमेदवार ज्ञानेश्वर शेषेराव शिंदे यांनी प्रभावी निवेदन जारी करत जनतेसमोर आपला विकासदृष्टीचा रोडमॅप मांडला आहे. जनतेला “मतदानरूपी आशीर्वाद” देण्याचे आवाहन करत शिंदे यांनी निवडून आल्यास वॉर्डाच्या सर्वांगिण विकासाचे वचन देत स्पष्ट केले की वॉर्ड क्रमांक 8 मध्ये मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि धार्मिक-सामाजिक स्थळांचे उन्नतीकरण हेच आपले प्रमुख प्राधान्य असेल. शिंदे यांनी आपल्या घोषणापत्रात पुढील महत्त्वाच्या कामांचा समावेश केला आहे असून, वॉर्डातील सर्व रस्ते गुळगुळीत व दर्जेदार करणार, हिंदू-मुस्लिम स्मशानभूमीचे सुसज्जिकरण व सोयीसुविधा उपलब्ध करून देणार, लकडोबा मंदिर परिसराचा सर्वांगीण कायापालट, तुकादेवी व शनि मंदिर परिसराचे सुशोभीकरण, ड्रेनेज लाईनची कायमस्वरूपी समस्या पूर्णपणे दूर कर...
Eng. Swapnil Ingle : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देत शहराचा विकास सध्या करा – इंजी. स्वप्नील इंगळे

Eng. Swapnil Ingle : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देत शहराचा विकास सध्या करा – इंजी. स्वप्नील इंगळे

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार│राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देत हिमायतनगर शहराचा विकास सध्या करा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष इंजी. स्वप्नील इंगळे यांनी केले. आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला वेग आला आहे. नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गटाचे अधिकृत उमेदवार मोहम्मद जाविद भाई हाजी अब्दुल गणी) तसेच वॉर्ड क्रमांक १७ चे उमेदवार अशोक लुटे यांच्या प्रचारार्थ फुलेनगर भागात भव्य कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष इंजी. स्वप्निल इंगळे पाटील, तालुका अध्यक्ष वामनराव मिरासे, सामाजिक कार्यकर्ते अभिषेक भाऊ लुट्टे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वक्...
Ashok Chavan : हिमायतनगरात नगरपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची प्रचारसभा

Ashok Chavan : हिमायतनगरात नगरपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची प्रचारसभा

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला वेग आल्यानंतर शुक्रवार दिनांक २८ रोजी सकाळी मराठवाड्याचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर बसस्टॉप परिसरात सकाळी 11 वाजता नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणुकीत उभे असलेल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.राजेंद्र वानखेडे यांच्यासह सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार असून, या सभेला जिल्ह्याचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांचं मार्गदर्शन होणार आहे. सभेला भाजप पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मतदार नागरिकांना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, शहरातील निवडणुकीच्या वातावरणाला आणखी रंग चढण्याची शक्यता...
Mr. Gulabrao Patil : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : शुक्रवारी ना. गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा

Mr. Gulabrao Patil : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : शुक्रवारी ना. गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे स्टार प्रचारक व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भव्य जाहीर सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा दि. २८ रोजी दुपारी २.३० वाजता श्री परमेश्वर मंदिर बसस्टँड परिसरात संपन्न होणार आहे. या सभेला मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे स्टार प्रचारक, माजी खासदार व विधानपरिषद सदस्य हेमंतभाऊ पाटील, माजी खासदार सुभाषराव वानखेडे, हदगाव-हिमायतनगरचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर, जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय वळसे पाटील व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे यांनी केले आह...
Shujaat Dada Ambedkar : हिमायतनगरमध्ये सुजात दादा आंबेडकर यांचे भव्य स्वागत; काँग्रेसवर दगा-फटक्याचा आरोप

Shujaat Dada Ambedkar : हिमायतनगरमध्ये सुजात दादा आंबेडकर यांचे भव्य स्वागत; काँग्रेसवर दगा-फटक्याचा आरोप

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या गुरुवार सायंकाळी झालेल्या हिमायतनगर भेटीदरम्यान त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. नालंदा बौद्ध विहार येथे आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत झाल्यानंतर लुंबिनी बौद्ध विहार येथे आयोजित सभेत त्यांनी कार्यकर्ते व समाजबांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी सुजात दादांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत “नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत युती केली होती, मात्र ऐनवेळी काँग्रेसने दगा देत युती तोडली आणि आमच्या विरोधात उमेदवार उभे केले,” असा आरोप केला. “दगा फटका करणाऱ्या काँग्रेसला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रभागातील दैनंदिन व मूलभूत समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाच्या असतात, असे सांगत सुजात दादांनी पाणीटंचाई, स्वच्छता, आर...
Politics ; हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक तापली, जनतेत असंतोष वाढला

Politics ; हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक तापली, जनतेत असंतोष वाढला

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत सर्वत्रिक निवडणुकीची धावपळ सुरू असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषांचे षडयंत्र तीव्र होत चालल्याची गंभीर चर्चा नागरिकांत सुरू आहे. निवडणुकीत पैसा, दडपशाही व प्रलोभनांचा वाढता वापर लोकशाहीसाठी घातक ठरणारा आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महिलांना 500 रुपये तर पुरुषांना 700 रुपये रोजच्या हजेरीसाठी, तसेच मतांच्या बदल्यात 10 ते 12 हजार रुपयांचा भाव ठरविण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळींकडून सुरू असल्याचे आरोप होत आहेत. महात्मा गांधींच्या नावाचा वापर करून सुरू असलेल्या काही प्रचार मोहिमा ‘सत्य-अहिंसा’च्या विचारांना विरोधात जात असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. नुकतेच नमनीर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी झालेल्या राजकीय गोंधळाने निवडणुकीत होत असलेल्या गैरप्रकाराला पुष्टी मिळू लागली आहे. आगामी काळात साम, दाम, दंड,...
Sanjay Shirsath : शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत — सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ

Sanjay Shirsath : शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत — सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| “लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही वेळप्रसंगी जेल भोगली, चांगल्या कामाला नेहमीच प्राधान्य दिले हीच शिवसेनेची परंपरा आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे सकारात्मक, लोकाभिमुख काम करणारे आम्ही शिवसैनिक आहोत,” असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाठ यांनी केले. मंगळवार, दि. २५ रोजी रात्री ८ वाजता परमेश्वर मंदिराच्या प्रांगणात हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. नगराध्यक्षपदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे यांच्या समर्थनार्थ ही सभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी पुढे बोलताना ना. शिरसाठ म्हणाले कि, “राम ठाकरे हे गेली ३० वर्षांपासून निष्ठेने शिवसेनेचे काम करणारे, लोकांमध्ये मिसळून काम करणारे कार्यकर्ते आहेत. अशा निष्ठावंत शिवसैनिकाला मतांच्या रूपाने बळ द्या. विकासासाठी निध...
error: Content is protected !!