Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

authenticate advertisements : इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रसारीत करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण करणे आवश्यक

authenticate advertisements : इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रसारीत करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण करणे आवश्यक

नांदेड, राजकीय
नांदेड| नगर परिषद व नगरपंचायतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निर्भय, पारदर्शक आणि प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवाराला समान संधी मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने माध्यम क्षेत्रातील सर्व नियमांचे काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने व्यापक मार्गदर्शक सूचना आणि जाहिरातीतील आचारसंहितेचे पालन बंधनकारक करण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे. उमेदवारांमार्फत प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक / सोशल मिडीयास देण्यात येणाऱ्या जाहिरांतीचे पूर्व प्रमाणीकरण या समितीमार्फत केल्या जाते. महाराष्ट्र शासनाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्या...
MLA Prataprao Patil Chikhlikar : शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

MLA Prataprao Patil Chikhlikar : शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| “राष्ट्रवादी काँग्रेस ही सर्वसमावेशक, शिव–फुले–शाहू–आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित आणि सर्व धर्म, जातींना समान न्याय देणारी पार्टी आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीत आपण राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या. जे २५ वर्षांत झाले नाही, ते आम्ही फक्त पाच वर्षांत करून दाखवू,” असे प्रतिपादन अजित पवार गटाचे नेते लोह कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर (MLA Prataprao Patil Chikhlikar) यांनी केले. मंगळवार, दि. २५ रोजी हिमायतनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या मंचावर माजी आमदार अविनाश घाटे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावनगांवकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक लूटे, तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर, मागासवर्...
NCP Public Meeting : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक प्रताप पाटील चिखलीकर यांची जाहीर सभा

NCP Public Meeting : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक प्रताप पाटील चिखलीकर यांची जाहीर सभा

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी 11 वाजता भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जावेद मोहम्मद तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे स्टार प्रचारक, लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगांवकर यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही भव्य जाहीर सभा मंगळवारी सकाळी ११ वाजता हिमायतनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित करण्यात आली असून, हिमायतनगर शहर व तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थि...
Ajitdada pawar : कंधार लोह्याच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रवादीस साथ द्या -.अजित दादा पवार

Ajitdada pawar : कंधार लोह्याच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रवादीस साथ द्या -.अजित दादा पवार

नांदेड, राजकीय
कंधार ( सचिन मोरे) कंधार तालुका हा ऐतिहासिक राष्ट्रकूटकालीन असून ही भूमी हाजीसय्या व साधु महाराजांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भागातल्या लोकांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फार मोठा लढा उभारला होता त्यात अनेकांना वीरमरण आले. या संतांच्या भूमीस मी नतमस्तक होतो. या भागाच्या विकासासाठी लोहा कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून भरघोस असा निधी दिला असून तुम्ही मला साथ द्या लोहा कंधारची नगरपालिका माझ्या ताब्यात द्या भव्य दिव्य आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त व्यापारी संकुल व क्रीडा संकुल उभा करून शहरातील सर्व समस्या सोडवून लोहा कंधार शहराचा कायापालट करण्याची ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिली . शिवाजी चौक कंधार येथे २४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जाहीर ...
Shiv Sena : हिमायतनगरात शिवसेना शिंदे गटाची मंगळवारी सांयकाळी भव्य सभा

Shiv Sena : हिमायतनगरात शिवसेना शिंदे गटाची मंगळवारी सांयकाळी भव्य सभा

नांदेड, राजकीय
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे यांच्या प्रचाराला मिळणार वेग हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे आणि सर्व नगरसेवक यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ श्री परमेश्वर मंदिर मैदानात दिनांक २५ नोव्हेंबर मंगळवारी सायंकाळी ६ वाजता भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. संजय शिरसाट, शिवसेना नेत्या ज्योतीताई वाघमारे, आमदार हेमंतभाऊ पाटील तसेच आमदार बाबुराव कदम कोहळीकर, जिल्हाप्रमुख विवेक देशमूख मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे ही सभा हिमायतनगरच्या राजकीय वातावरणात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. सभेच्या माध्यमातून विकासाच्या विविध योजना, आगामी राजकीय दिशा आणि शहरच्या विकासाच्या बाबतीत करण्यात येणाऱ्या योज...
Harshvardhan Sapkal : भाजपने राज्यात फोडाफोडीचे राजकारण केलं, आता वोट चोरी करतायेत -हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal : भाजपने राज्यात फोडाफोडीचे राजकारण केलं, आता वोट चोरी करतायेत -हर्षवर्धन सपकाळ

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणुकीचे ढोल वाजत असताना रविवारी दुपारी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसचे उमेदवार शेख रफीक शेख मेहबूब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच हदगांव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या साक्षीने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला काँग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मतदार बांधव उपस्थित होते. शहरात आगमन होताच प्रदेशाध्यक्षांचे फटाक्यांच्या आतषबाजीने आणि घोषणाबाजीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “भाजपने राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि आता सोबत असणाऱ्यांनाही संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत...
Digambar Kale : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक 2025 : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून दिगंबर काळे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात

Digambar Kale : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक 2025 : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून दिगंबर काळे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांनी आपल्या अधिकृत उमेदवार दिगंबर देवराव काळे यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरवीला आहे. पक्षाच्या ‘विळा–हातोडा–तारा’ या निवडणूक चिन्हावर ते जनतेचा कौल मागत असून, त्याच्यामुळे चौरंगी लढतीत असलेल्या प्रमुख पक्षच्या उमेदवारांचे भविष्य अधांतरी आले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हिमायतनगरमधील कामगार, शेतकरी, शेतमजूर, कंत्राटी कर्मचारी, महिला, विद्यार्थी तसेच अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिल्याचा दावा करत काळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दिगंबर काळे यांनी स्थानिक प्रश्नांवर लढा दिला असून, यात पाणीटंचाई, वीज समस्या, मनरेगा प्रकल्पातील अनियमितता, बांधकाम व सफाई कामगारांचे प्रश्न, तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनांत सक्रिय भूमिका निभावल्याचा पक्षाने उ...
former MLA Madhavrao Patil Javalgaonkar : काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचा माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ

former MLA Madhavrao Patil Javalgaonkar : काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचा माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचा रविवारी सकाळी थाटात शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला. शुभारंभ कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आमदार जवळगांवकर म्हणाले की, “राजकारणात खोटं बोलून मत मागता येत नाही. गेल्या वर्षभरात विरोधकांनी काहीही काम केले नाही, आणि आता मतदानाच्या तोंडावर खोटे आरोप व दिशाभूल सुरू केली आहे. काम करताना कमी-जास्त होऊ शकतं, पण मी नेहमी पारदर्शकतेने व इमाने-इतबारे काम करत जनतेची सेवा केली आहे.” मागील काळात आमच्या पदाधिकारी यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून जनता पुन्हा काँग्रेसच्या हाथी सत्ता देईल. ते पुढे म्हणाले, “ स्व:तला उमेदवार समजून क...
Dr. Rajendra Wankhede : “माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगरचा कायापालट करणार” — डॉ. राजेंद्र वानखेडे

Dr. Rajendra Wankhede : “माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगरचा कायापालट करणार” — डॉ. राजेंद्र वानखेडे

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) “जाती-धर्माच्या राजकारणाला मागे सारत केवळ विकासाला केंद्रस्थानी ठेवून नगरपंचायत निवडणूक लढवित आहोत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकू,” असा ठाम विश्वास डॉ. राजेंद्र वानखेडे यांनी व्यक्त केला. आज शनिवारी भाजपच्या वतीने नारळ फोडून अधिकृतपणे निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रथम ग्रामदैवत श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाला. घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या मंचावर डॉ अंकुश देवसरकर, गिरीश जाधव, डॉ प्रसाद डोंगरगावकर, तालुकाध्यक्ष गजानन चायल, रामभाऊ सूर्यवंशी, विपुल दंडेवाड, कल्याण ठाकूर आदींसह भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. वानखेडे म्हणाले कि, भाजपने हिमायतनगरच्या विकासाची ब्लु प्रिंट काढली आहे. ...
MLA Baburao Kadam Kohlikar : नगरपंचायतीवर भगवा फडकवणारच — आमदार बाबुराव कदम कोहळीकर

MLA Baburao Kadam Kohlikar : नगरपंचायतीवर भगवा फडकवणारच — आमदार बाबुराव कदम कोहळीकर

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारच्या शुभ मुहूर्तावर शिवसेनेने हिमायतनगरात दिमाखात शक्तीप्रदर्शन केले. आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नेतृत्वात शहरात काढण्यात आलेल्या महारॅलीने वातावरण ढवळून निघाले. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजीच्या तालात आणि शिवसेनेच्या भगव्या समुद्राने संपूर्ण शहर रंगून गेले. रॅलीपूर्वी ग्रामदैवत श्री परमेश्वर, हनुमान मंदिर, माताकालिंका मंदिर आणि बौद्ध विहार येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीत महिला, तरुणाई आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. रॅलीनंतर बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले, “मागील सत्ताधाऱ्यांनी शहराचा विकास न करता फक्त स्वहित साधलं. आज शहराची अवस्था एखाद्या खेड्यापेक्षा वाईट आहे.” ते पुढे म्हणाले कि, शहराला स्वच्छ पाणीपुरवठा,...
error: Content is protected !!