Himayatnagar bus stand problem : ६० वर्षांपासून प्रलंबित असलेली हिमायतनगर बसस्थानकाची समस्या अखेर मार्गी लागणार !
नागपूर/नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी बातमी समोर आली असून, हिमायतनगर शहराला तालुक्याचा दर्जा मिळूनही साठ वर्षांपासून बसस्थानकापासून वंचित ठेवले गेले. हा अन्याय अनेकांनी पाहिला, पण तो मांडण्याची राजकीय इच्छाशक्ती मात्र प्रथमच आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दाखवली. यामुळे हिमायतनगर बसस्थानकाचा प्रश्न अखेर सुटण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
आजवर केंद्रीय राज्यमंत्री, माजी खासदार, विद्यमान खासदार, माजी आमदार यांना हिमायतनगरने संधी दिल्या. परंतु साधे बसस्थानकही शहराला मिळाले नाही हा कटू पण वास्तव प्रश्न आहे. सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी हिमायतनगर बसस्थानकासह शेतकरी, पीकविमा, आरोग्य व इतर मूलभूत प्रश्नांवर लक्षवेधी सूचना मांडत सभागृहाचे लक्ष वेधले आ...









