Thursday, May 14

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Election of Parameshwara Suryavanshi | भाजपा युवा मोर्चाच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी परमेश्वर सुर्यवंशी यांची निवड – NNL

Election of Parameshwara Suryavanshi | भाजपा युवा मोर्चाच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी परमेश्वर सुर्यवंशी यांची निवड – NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| हिमायतनगर भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी ग्रामीण भागातील निष्ठावंत कार्यकर्ता परमेश्वर लक्ष्मणराव सूर्यवंशी यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदन केले जातआहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तरचे अँड किशोरभाऊ देशमुख व युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तरचे संदीपभाऊ राठोड, युवा मोर्चा प्रदेश सचिव आरुणजी पाठक व भोकर विधानसभा प्रमुख श्रीजया चव्हाण याच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील परमेश्वर सुर्यवंशी यांची निवड केली असून, युवा सांघटन वाढविण्याबरोबर पक्षाचे ध्येय धोरणे आणि योजना जनतेपर्यंत पोचविण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील सोनारीकर, जिल्हा सरचिटणीस अशिषभाऊ सकवान, माजी कृ उत्पन्न सभापती गजानन तुप्तेवार, रामभाऊ सुर्यवंशी, किसनबापु वानखेड...
Dr. Kabde group win | नांदेड एज्युकेशन सोसायटी निवडणुकीत डॉ.काब्दे गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी -NNL

Dr. Kabde group win | नांदेड एज्युकेशन सोसायटी निवडणुकीत डॉ.काब्दे गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| स्वामी रामानंद तिर्थ यांनी स्थापण केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या झालेल्या मतदानानंतर डॉ.काब्दे यांनी विरोधी गटला व्हाईट वॉश दिला असून, या निवडणुकीत डॉ. काब्दे गटाचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या 9 जागेसाठी शनिवार दि.27 रोजी मतदान घेण्यात आले.या निवडणुकीत दोन पॅनल आमने- सामने उभे होते.निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ.काब्दे व त्यंाच्या पॅनलला टक्कर देण्यासाठी स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नावे अ‍ॅड चैतन्य बापू देशमुख यांनी डॉ.काब्दे गटाला आव्हान दिल्याने निवडणुकीत रंग भरला होता मागील निवडणुकीत डॉ.काब्दे गटाला 9 पैकी 6 जागांवर समाधान मानावे लागले होते. आज झालेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत मतदारांची संख्या 116 पैकी 100 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.या निवडणुकीत डॉ.काब्दे गटाने समोरील उमेदवार...
Former MP Subhash Wankhede | वक्त का इंतजार किजीऐ बेहतरीन नजारा दिखायेगे – माजी खा .वानखेडेच्या’स्टेटस’ ने उडवली धमाल -NNL

Former MP Subhash Wankhede | वक्त का इंतजार किजीऐ बेहतरीन नजारा दिखायेगे – माजी खा .वानखेडेच्या’स्टेटस’ ने उडवली धमाल -NNL

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा| वक्त का इंतजार किजीऐ जनाब वादा है बहुत बेहतरीन 'नजारा ' दिखायेगें अशी पोस्ट हिगोली लोकसभाचे माजी खा सुभाष वानखेडे ह्याच्या सोशल मिडीया वरील स्टेटसने नागरिकात धमाल उडवलेली असुन, नेमके विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माञ त्याचे हे स्टेटस फारच चर्चिल्या जात आहे. हदगाव विधानसभाक्षेञाचे आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी जो महाविकास आघाडीचा पुढचा फिक्स उमेदवार मीच ह्या दाव्याची धार कुठे तरी बोधट तर होणार नाही ना..? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच काँग्रेसचे आमदार 'क्रास वोटीग' मध्ये चर्चिल्या जात होते नंतर त्यांनी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठीला पटवून दिले की 'तो मी नव्हेच..आता शिवसेनेतर्फ महाविकास आघाडीत शिवसेना प्रमुख उद्वव ठाकरे यांनी आदेश दिला तर आपण हदगाव विधानसभेची निवडणूक लढू अस माजी खासदार वानखेडे यांनी काही दिवसा पुर्वी जाहीर केल होत. नुकत्याच संपन्न झाल...
Adv Revan Bhosale | महाराष्ट्र विधान परिषदेची निर्मिती ही फक्त पांढरा हत्ती पोचण्यासाठीच! – ॲड रेवण भोसले -NNL

Adv Revan Bhosale | महाराष्ट्र विधान परिषदेची निर्मिती ही फक्त पांढरा हत्ती पोचण्यासाठीच! – ॲड रेवण भोसले -NNL

राजकीय
धाराशिव| दिवसेंदिवस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट होत चाललेली असून राज्याला आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असताना खर्च कमी करण्यासाठी पांढरा हत्ती पोसण्यासाठी निर्माण केलेली महाराष्ट्र विधान परिषद बरखास्त करण्याचा विधानसभेत एक ठराव घेऊन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवून देण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. देशाच्या राज्यघटनेप्रमाणे केंद्रात संसद तयार करताना लोकसभा व राज्यसभा तयार करण्यात आली. त्याच धर्तीवर निवडून आलेल्या विधानसभेच्या सदस्यांच्या प्रमाणात विधानपरिषद तयार केली गेली, म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे 288 आमदार असल्याने विधान परिषदेचे 78 आमदार निवडले जातात परंतु दक्षिणेतल्या काही राज्यांनी आपल्या विधान परिषदा र...
Women’s meeting on behalf of Nationalist Congress Party | किनवट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला मेळावा संपन्न – NNL

Women’s meeting on behalf of Nationalist Congress Party | किनवट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला मेळावा संपन्न – NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या महिला आघाडीची बैठक घेण्यात आली. यावेळी नाईक घराण्याच्या स्नुषा डॉ. सुप्रिया कपिल नाईक यांनी ही महिला आघाडीत सक्रिय सहभाग नोंदवला तर महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सौ. अनुसया सतीश जमादार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या अनेक महिला सदस्य उपस्थित होत्या. आगामी काळात देशाच्या व राज्याच्या राजकारणात 50 टक्के जागा महिलांकरिता राखीव राहणार आहेत. या अनुषंगाने संसदरत्व खा. सुप्रिया सुळे, महिला प्रांत अध्यक्ष रोहिणी खडसे व माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांता ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात लवकरच मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे तर पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील महिलांनाही मुख्य प्रवाहात समाविष्ट करावे कारण भविष...
Guardian Minister Girish Mahajan | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र महिलांना सहभागी करुन घ्या – पालकमंत्री गिरीश महाजन – NNL

Guardian Minister Girish Mahajan | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र महिलांना सहभागी करुन घ्या – पालकमंत्री गिरीश महाजन – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| शासनाकडून प्रत्येक समाजातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभावीपणे सुरु आहे. या योजनेत जिल्ह्यात जवळपास साडेपाच लाख अर्ज भरुन घेण्यात आले आहेत अजून उर्वरित पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना पथदर्शी असून या योजनेसह अनेक योजना शासनाच्यावतीने नागरिकांसाठी राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमं...
शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे व खा. आष्टीकर यांचा वाढदिवस साजरा – NNL

शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे व खा. आष्टीकर यांचा वाढदिवस साजरा – NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे| मा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच हिंगोलीचे खासदार नागेश पाटीलआष्टीकर यांच्या वाढदिवसा निमित्त शिवाजी चौकात मिठाई वाटून तसेच फटाक्याची अतिशबाजी करत वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मा. शहर प्रमुख संतोष येलचलवार यांनी केले होते. मा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून फटाक्याची आतिषबाजी करत मिठाईचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मा . शहर प्रमुख येलचलवार यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थितीत मा. तालुकाप्रमुख राम पाटील, मा. युवा सेना तालुकाप्रमुख प्रमोद केंद्रे, प्रकाश ठोंबरे, राकेश गणोजवार, शैलेश बेलसरवार, संतोष तक्कलवार, पंडित रासमवार, महेश म्याकलवार, संजय मेश्राम, प्रवीण रेड्डी, द...
blood donation camp was organized | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर आयोजन – NNL

blood donation camp was organized | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर आयोजन – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड| शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजक दिलीपसिंह भागिले समन्वयक नांदेड दक्षिण विधानसभा यांच्या कडून महाभव्य रक्तदान शिबीर व अन्नदान वाटप २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सिडको मुख्य रोडवरील श्री साई मोटर्स लातूर फाटा येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रथमच यावर्षी नांदेड समन्वयक दिलीपसिंह बाबुसिंह भागिले यांच्याकडून महाभव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीराचे ऊदघाटक नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार,नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख बंडु खेडकर,डॉ.सुनिल कदम, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महिला जिल्हा संघटक नांदेड वत्सलाताई पुयड, माजी ऊपमहापौर विनय पाटील गिरडे, नांदेड दक्षिण उपजिल्हा प्रमुख व्यंकोबा येडे, भारतीय कामगार सेना जिल्हा प्रमुख ब्रिजलाल ऊगवे,नांदेड दक्षिण तालुक...
Former MP Subhash Wankhede | महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचाही विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा दावा ! – NNL

Former MP Subhash Wankhede | महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचाही विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा दावा ! – NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, दत्ता शिराणे| आगामी विधान सभा निवडणूकीची रंगीत तालीम आता सुरू झाली आहे. इच्छुकांनी आता आपले पत्ते उघड करण्यास सुरूवात केली आहे. परवाच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तत्कालीन आमदार माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी ही आपण हदगाव हिमायतनगर विधान सभेची निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगीतले. या अगोदर माजीमंत्री सूर्यकांताताई पाटील यांचे ही नाव इच्छुकांच्या यादीमध्ये अग्रक्रमाने आहेच. त्यामुळे महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या वाढली असून, काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना तिकीट मिळविण्यास मोठी कसरत करावी लागणार असल्याचे बोलल्या जात आहे. आगामी विधान सभेच्या निवडणूका काँग्रेस, राष्ट्र वादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधान सभेच्या निवडणुकीला सामोरे जातील. हे आता सुनिश्चित आहे. तर भाजपा शिवसेना शिंदे...
Srijaya Chavan | श्रीजया चव्हाण यांचा जीवन घोगरे पाटील यांच्याकडून सत्कार -NNL

Srijaya Chavan | श्रीजया चव्हाण यांचा जीवन घोगरे पाटील यांच्याकडून सत्कार -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| भोकर विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या इच्छुक उमेदवार श्रीजया चव्हाण यांचा भोकर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांनी सत्कार केला. राज्याचे उपमुख्यमत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर येथे आयोजित कार्यक्रमासाठी जीवन घोगरे पाटील हे भोकर येथे गेले होते. भोकर विधानसभा मतदार संघात महायुतीकडून श्रीजयाताई चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे खा. अशोक चव्हाण यांचा भोकर हा पारंपारिक मतदार संघ राहिलेला आहे. त्यामुळे या मतदार संघातून अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजयाताई चव्हाण यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्या अनुषंगाने मतदार संघात भेटी-गाठी देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपसह महायुतीतील इतर मित्रपक्षाकडूनही या मतदार संघात श्रीजयाताई चव्हा...
error: Content is protected !!