किनवट,परमेश्वर पेशवे| मा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच हिंगोलीचे खासदार नागेश पाटीलआष्टीकर यांच्या वाढदिवसा निमित्त शिवाजी चौकात मिठाई वाटून तसेच फटाक्याची अतिशबाजी करत वाढदिवस साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाचे आयोजन मा. शहर प्रमुख संतोष येलचलवार यांनी केले होते. मा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून फटाक्याची आतिषबाजी करत मिठाईचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मा . शहर प्रमुख येलचलवार यांनी केले.


यावेळी प्रमुख उपस्थितीत मा. तालुकाप्रमुख राम पाटील, मा. युवा सेना तालुकाप्रमुख प्रमोद केंद्रे, प्रकाश ठोंबरे, राकेश गणोजवार, शैलेश बेलसरवार, संतोष तक्कलवार, पंडित रासमवार, महेश म्याकलवार, संजय मेश्राम, प्रवीण रेड्डी, देविदास पोतदार, गजानन पेन्शनवर, सुरज कत्तापेल्लीवार, सुशील शहाणे, किशोर बोललेनवार, अंकुश गणोजवार, ओंकार गणोजवार, प्रसाद पर्वत, प्रवीण रायकवाडे, दत्ता काटकर, शैलेश कोत्तापेल्लीवार, साई सामानपेलीवार, आशिष कजबे, कपिल पराते, संस्कार गायकवाड, तेजस पांचाळ, शिवकुमार अडीलवार, सुधाकर अगुवार, विशाल गेडाम, साई बासेवार आदि शिवसैनिक उपस्थित होते.




