Homeक्राईमAccused of theft arrested | हिमायतनगर चोरीच्या घटनेतील आरोपी पोलीसांनी पकडले; विधिसंघर्ष...

Accused of theft arrested | हिमायतनगर चोरीच्या घटनेतील आरोपी पोलीसांनी पकडले; विधिसंघर्ष बालकासह एका आरोपीस अटक – NNL

नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील दोन चोरीच्या घटनेतील आरोपी पोलीसांनी पकडले असून, त्यांच्याकडून 1 लक्ष चार हजार सहाशे रुपयाचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने जारी केली आहे.

IMG 20240727 180858 Accused of theft arrested | हिमायतनगर चोरीच्या घटनेतील आरोपी पोलीसांनी पकडले; विधिसंघर्ष बालकासह एका आरोपीस अटक - NNL

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील जनता काॅलनी भागामध्ये एका किराणा दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी किराणा मालाचे साहित्य व नगदी रक्कम असा एकूण 36 हजार चारशे रुपये किंमतीचा मुद्येमाल घेऊन पोबारा केला होता. हि घटना गेल्या आठवडाभरापूर्वी घडली होती. आणी या अगोदर हिमायतनगर शहरात चोरीच्या घटना घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. तसेच दरम्याच्या काळात आणखी एव घरफोडी करून दुसऱ्या घरफोडीत 81 हजार पाचशे रुपयाचा मुद्येमाल चोरल्याचे पकडण्यात आलेल्या आरोपीने सांगीतले आहे.

IMG 20240727 WA0028 Accused of theft arrested | हिमायतनगर चोरीच्या घटनेतील आरोपी पोलीसांनी पकडले; विधिसंघर्ष बालकासह एका आरोपीस अटक - NNL

दरम्यान पोलीसांनी तपासाची चक्रे गतिमान करून एका २२ वर्ष व एक विधी संघर्ष बालक या दोन आरोपींना हिमायतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी दोन घरफोडीत एकुण 1 लक्ष सतरा हजार नऊशे रुपयाचा मुद्येमाल चोरल्याचे सांगीतले. त्यापैकी 1 लक्ष चार हजार सहाशे रुपयाचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला असुन, गुन्हयात एक एम्पलीफायर आणि माईक असे 13 हजार तीनशे रुपयाचा मुद्येमाल तिथेच सोडुन दिल्याचे सांगीतले आहे.

हिमायतनगर शहरातील चोरी प्रकरणी आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली असून, यातील विधीसंघर्ष बालकास त्याचे पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कोमल कांगणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम सुंदर नागरगोजे, पोलीस नाईक पवन चौदंते यांनी पोलीस ठाणे हिमायतनगर हद्दीत घडलेल्या गुन्ह्य़ातील गेलेला माल व नगदी रक्कम हस्तगत करण्याची कारवाई केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments