Thursday, May 14

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ – NNL

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ – NNL

नांदेड, राजकीय
मुंबई| महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मंत्रिमंडळ सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबतचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आदेश वाचून दाखवला...
साबांवि.अधिकारी व खाजगी गुत्तेदार यांनी संगनमताने प्रस्तावित कामे केलेली हाणून पाडणार- सरपंच दत्ता जाधव -NNL

साबांवि.अधिकारी व खाजगी गुत्तेदार यांनी संगनमताने प्रस्तावित कामे केलेली हाणून पाडणार- सरपंच दत्ता जाधव -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड तालुक्यातील मौ वांगी येथे पुनर्वसन अंतर्गत मूलभूत सोयी सुविधेची कामे सरपंच तथा जिल्हाध्यक्ष पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ता जाधव यांनी वेळो वेळी पाठपुरावा करून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत जिल्हा प्रशासनाला सूचना करून गावातील सर्व मूलभूत सोयी सुविधा यांचा अहवाल तयार केला. जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतला विश्वासात घेऊन सर्व सहकार्य करून घेऊन गावात जाय मोक्यावर जाऊन अहवाल करून सर्व गावकर्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई येथे अहवाल दाखल केला असून संगनमताने प्रास्तावित केलेल्या कामा बाबत ऊप जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात, वांगी येथील पुनर्वसन बाबत अहवाल महसूल मंत्री यांनी जिल्हाध्यक्षांची दखल घेऊन मंजुरी देण्यास शिफारस केली असता पु...
S. Manmeet Singh Kunjwale as Yuvasena City Chief | युवासेना शहर प्रमुख पदी स.मनमित सिंग कुंजीवाले – NNL

S. Manmeet Singh Kunjwale as Yuvasena City Chief | युवासेना शहर प्रमुख पदी स.मनमित सिंग कुंजीवाले – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या प्रमुख उपस्थितीत आ.बालाजीराव कल्याणकर यांच्या शिफारशीनुसार नांदेड शहर युवासेना शहर प्रमुख पदी स.मनमित सिंग कुंजीवाले यांची नियुक्तीची घोषणा करून नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समवेत उत्तरचे आ. बालाजीराव कल्याणकर यांची उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण नागरिकांच्या न्याय हक्कासाठी कार्य सुरू केले असून आपल्या सामाजिक कार्याची दखल घेत स.मनमितसिंग कुंजीवाले यांची युवासेना शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. स.मनमित स...
Collector will advise strict action against illegal sand transporters – Ashok Chavan | अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकारी देईन – अशोक चव्हाण – NNL

Collector will advise strict action against illegal sand transporters – Ashok Chavan | अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकारी देईन – अशोक चव्हाण – NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नांदेड| गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना या शासकीय रेती डेपोचा फायदा होत नसेल आणि डेपो चालक जरा रेती बाहेर पाठवून याचा वारेमाप उपयोग घेत असेल तर त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. शासनाचा महसूल बुडू नये हि देखील महत्वाची बाब आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकारी यांना देईन अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र राज्य महसूल प्रशासनाच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभधारकांना रेती ही अल्प दरात व घरकुलधारकांना मोफत देण्यात यावी. यासाठी शासकीय डेपोची उभारणी केली असून, डेपो मधून रेती सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभार्थ्यांना न मिळता ती रेती आंध्राप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, सोलापूर लातूर या ठिकाणी जात आहे. ऑनलाइनच्या नावाखाली झिरो मध्ये म्हणजे ब्लॅक मध्ये रेतीची विक्री केली जाते आहे...
Nana Patole | लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी जोमाने काम करा: नाना पटोले – NNL

Nana Patole | लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी जोमाने काम करा: नाना पटोले – NNL

राजकीय
मुंबई| भारतीय जनता पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करत आहे. भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र देश जोडण्याचे काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीत जनता काँग्रेस व इंडिया आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर आली आहे, लोकसभेत चांगले यश मिळाले म्हणून गाफील राहू नका विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत करा, जनतेपर्यंत जा व काँग्रेस व महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी काम करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आढावा बैठकीला मार्गद...
Kirtan by Habhap Vishal Maharaj Khole | लोह्यात चिखलीकरांच्या वाढदिवसा निमित्त हभप विशाल महाराज खोले यांचे ३ तारखेला किर्तन -NNL

Kirtan by Habhap Vishal Maharaj Khole | लोह्यात चिखलीकरांच्या वाढदिवसा निमित्त हभप विशाल महाराज खोले यांचे ३ तारखेला किर्तन -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| जिल्ह्याचे लोकनेते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ३ ऑगस्ट राजी लोहा शहरातील व्यंकटेश गार्डन येथे सांयकाळी चार वाजता सुप्रसिद्ध किर्तनकार हभप विशाल महाराज खोले यांच्या किर्तननाचा कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजन दीपक पाटील कानवटे, पत्रकर केशव पवार, आवीनास पवार यांन केले आले आहे. जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हयात करण्यात आले आहे. लोह्यात हभप विशाल महाराज खोले याचे किर्तन होणार आहे या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे माजी खासदार चिखलीकर व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा ३ तारखेला सायंकाळी चार वाजता होणार आहे. यावेळी ह भ प आत्माराम महाराज रायवाडीकर, ह भ प लक...
Loan limit will be increased from 50 thousand to 2.5 lakh | दिव्यांगांना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षांचे वाटप दिव्यांगांसाठी सर्व महानगरपालिकांमध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करावे – NNL

Loan limit will be increased from 50 thousand to 2.5 lakh | दिव्यांगांना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षांचे वाटप दिव्यांगांसाठी सर्व महानगरपालिकांमध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करावे – NNL

राजकीय
मुंबई| दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता यासर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महानगरपालिकांनी सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी आज दिले. दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम अडीच लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे दिव्यांग कल्याण महामंडळाची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर आदी उपस्थित होते. दिव्यांग महामंडळाला ५०० कोटी र...
Let’s give priority to people’s development along with party organization | काॅग्रेसच्या माध्यमातून तरोड्यातील पक्षसंघटनवाढीसह जनविकासाला प्राधान्य देऊ -NNL

Let’s give priority to people’s development along with party organization | काॅग्रेसच्या माध्यमातून तरोड्यातील पक्षसंघटनवाढीसह जनविकासाला प्राधान्य देऊ -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| स्वातंत्र्यपूर्वकाळापासून देशप्रेम व जनहित,धर्मनिरपेक्ष भारत देशासाठी कार्यरत असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये श्रेष्ठीने आपणांस दिलेल्या पदाच्या माध्यमातून पक्षसंघटनवाढीसह जनविकासाला प्रथम प्राधान्य देऊन कर्तव्यतत्पर राहू व पक्षश्रेष्ठीचा विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही नांदेड शहर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे नवनियुक्त शहर जिल्हा कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर यांनी दिली. महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या शूभहस्ते व नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव पाटील चव्हाण,आ.मोहन हंबर्डे,शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी युवा नेतृत्व महेश देशमुख तरोडेकर यांची नुकतीच नियुक्ती करुन त्यांना तसे,नियुक्तीपत्र मुंबई प्रदेश कार्यालयात नुकतेच प्रदान करण्यात आल्यानंतर त्...
 Nandagiri fort | नंदगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार-आ. मोहनराव हंबर्डे – NNL

 Nandagiri fort | नंदगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार-आ. मोहनराव हंबर्डे – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड| गोदाकाठी वसलेला नांदेडकरांचा ऐतिहासीक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून ओळखल्या जाणार्‍या नंदगिरी किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालणार असून त्यासाठी आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केली. जुन्या नांदेड भागात स्थित असलेला नंदगिरी किल्ल्यास आ. मोहनराव हंबर्डे यांनी भेट देवून पाहणी केली.त्यांच्यावतीने किल्ला परिसरात दगडी चुरी टाकण्याचेही काम सुरु करण्यात आले.ते म्हणाले, हा किल्ला म्हणजे नांदेड जिल्ह्याची शान असून किल्ल्याला ऐतिहासीक वारसा आहे.गोदावरी नदी तीरावर असलेला हा किल्ला पर्यटनच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा आणि आकर्षक आहे.गेल्या अनेक वर्षांपासून किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. किल्ल्याचे उत्तम संवर्धन आणि डागडुजी केल्यास देश -विदेशातील पर्यटकांसाठी नंदगिरी किल्ला विशेष आकर्षण ठरणार ...
Adv.Avinash Rathod | संधी मिळाल्यास ज्वलंत मुद्यांवर लढणार विधानसभा – ॲड.अविनाश राठोड – NNL

Adv.Avinash Rathod | संधी मिळाल्यास ज्वलंत मुद्यांवर लढणार विधानसभा – ॲड.अविनाश राठोड – NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत राहणाऱ्या किनवट/माहूर विधानसभेत आमदारकीच्या उमेदवारी वरून भाजपाच्या ईच्छूकान मध्ये घमासान रंगले आहे. त्यातच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.अविनाश राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीकरीता आपली तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या राज्यात महायुतीचे सरकार असून सत्ता पक्षाचेच आमदार विद्यमान स्थितीत किनवट /माहूर क्षेत्राचे नेतृत्व करत आहे. दरम्यान भाजपने संधी दिली तर आरोग्य, शिक्षण, पर्यटन, शेती व रोजगार या ज्वलंत मुद्यांवर निवडणूक लढणार असल्याची इच्छा ॲड.अविनाश राठोड यांनी त्यावेळी व्यक्त केली. सदर काही मुद्यांना विधानसभा मुकली असून आपल्या कल्पनेतील विधानसभा कृतीतून खरी करून दाखविणार असल्याचे मत त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना राठोड यांनी व्यक्त केले. स्थानिक शासकीय विश्रामगृहात दि.२९ जुलै रोजी पत्रकार परिषदेत आयोजन करण...
error: Content is protected !!