Thursday, May 14

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Mp. Ashoka Rao Chavan : कार्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका ठेवावी – खा.अशोकराव चव्हाण -NNL

Mp. Ashoka Rao Chavan : कार्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका ठेवावी – खा.अशोकराव चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| सोशल मिडियावर येणारे बहुतांश मजकूर सध्या नकारात्मक दृष्टिने टाकले जातात, त्याकडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका ठेवून कार्यरत रहावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या नंदेड दक्षिण ग्रामीण विस्तारित जिल्हा कार्यकारिणीची बैठक सोमवारी मातोश्री मंगल कार्यालय, कौठा येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खा.अजि. गोपछडे, आ. जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश सचिव देविदास राठोड, आ. तुषार राठोड, माजी आ. राम पाटील रातोळीकर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना खा.चव्हाण म्हणाले, विरोधकांनी सुरु केलेल्या खोट्या व नकारात्मक प्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. बेरोजगारांना काम मिळावे यासाठी नांदेड शहरात रोजगार मेळावे घेण्याची गरज आहे, अशा मेळाव्यात युवकांच्या हाताला काम मिळेल. याश...
Sarpanch and Upasarpanch was elected unopposed : किवळा सरपंचपदी नेहा टर्के तर उपसरपंचपदी सीमा टर्के बिनविरोध निवड – NNL

Sarpanch and Upasarpanch was elected unopposed : किवळा सरपंचपदी नेहा टर्के तर उपसरपंचपदी सीमा टर्के बिनविरोध निवड – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| लोहा तालुक्यातील किवळा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच व उपसरपंचांनी राजीनामा दिल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात ३० जुलैला नूतन सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात सरपंच पदासाठी व उपसरपंच पदासाठी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱी देशपांडे विस्तार अधिकारी यांनी सरपंचपदी नेहा साईनाथ टर्के तरउपसरपंचपदी सीमा व्यंकटी टर्के यांची बिनविरोध निवड घोषित केली. किवळा येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या ११ असून सरपंच पद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. यावेळी रामजी पाटील ढगे, माजी सभापती शंकर पाटील ढगे, यांच्या सह साईनाथ पाटील टरके, व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते, निवडीनंतर गावकऱ्यांकडून नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या सत्कार करण्यात आला. निवडणूक साठी ग्रामसेवक अमृत शिंदे यांनी सहकार्य केले तर निवडणूक दर...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांनाही प्रति महिना ५००० रु. पेन्शन देण्याचा निर्णय घ्या – ॲड रेवण भोसले -NNL

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांनाही प्रति महिना ५००० रु. पेन्शन देण्याचा निर्णय घ्या – ॲड रेवण भोसले -NNL

राजकीय
धाराशिव/उस्मानाबाद | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रातील ६० वर्षावरील प्रत्येक शेतकऱ्यांना दरमहा किमान ५ हजार रुपये पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे . महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मंदिर, मज्जिद, चर्च बांधण्यात कसलेही स्वारस्य नसून कर्जबाजारीपणामुळे दिवसेंदिवस होत असलेल्या आत्महत्या थांबवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी व बेरोजगारांना रोजगार देणे तसेच राज्यातील भीषण दुष्काळी स्थिती बाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. एकीकडे सार्वजनिक क्षेत्रात बोनसचा कायदा लागू झालेला असला तरी शेतकऱ्यांनी मात्र बोनस कधी पाहिलेलाच नाही. वर्षानुवर्षे जमिनीमध्ये गाळलेला घाम. केलेले श्रम व आठवलेले रक्त यांचे मूल्य शेतकऱ्या...
Ashatai Shinde met Sharad Chandra Pawar : सिल्वर ओक मुंबई येथे शरदचंद्र पवार यांची आशाताई शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट  -NNL

Ashatai Shinde met Sharad Chandra Pawar : सिल्वर ओक मुंबई येथे शरदचंद्र पवार यांची आशाताई शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी काल दि. 3 ऑगस्ट रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, यावेळी शरदचंद्र पवार यांचा आशाताई शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शरदचंद्र पवार व आशाताई शिंदे यांच्यामध्ये लोहा कंधार मतदार संघातील विविध विषयावर सखोल करण्यात आली,आगामी होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी संदर्भात शरदचंद्र पवार व आशाताई शिंदे यांच्यामध्ये यावेळी तासभर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचं...
Prithviraj Chavan : महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकीच्या मार्गाने ठेके दिले: पृथ्वीराज चव्हाण -NNL

Prithviraj Chavan : महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकीच्या मार्गाने ठेके दिले: पृथ्वीराज चव्हाण -NNL

राजकीय
मुंबई| टोलमाफी वरून काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा रस्ता जोपर्यंत सुस्थितीत होत नाही तोपर्यंत 25% टोल सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय 20 किलोमीटर परिसरातील गावातील वाहनधारकांना टोल माफी असणार आहे. तर 50 टक्के टोल सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या एक महिन्याच्या आत केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. याबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केले आहे. या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास, पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज बंटी पाटील यांनी दिला आहे. कोल्हापूर ते पुणे महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत टोल माफी करण्यात यावी, ही मागणी घेऊन काँग्रेस पक्षाच्यावतीने आज टोल नाक्याच्या ठि...
Ad Prakash Ambedkar | विधानसभेत ओबीसीचे शंभर आमदार निवडून येणे गरजेचे – ऍड प्रकाश आंबेडकर – NNL

Ad Prakash Ambedkar | विधानसभेत ओबीसीचे शंभर आमदार निवडून येणे गरजेचे – ऍड प्रकाश आंबेडकर – NNL

नांदेड, राजकीय
लोहा /माळाकोळी| विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसीच्या आरक्षणास धोका नाही तो खरा निवडणूक झाल्यानंतर आहे. त्यामुळे राज्याच्या विधानसभेत किमान शंभर आमदार ओबीसींचे निवडणूक जाणे गरजेचे आहे. मनोज जरांगेंच्या अवास्तव मागणींमुळे व दादागिरीच्या वागण्यामुळे ओबीसी समाज एकवटला आहे. त्याच्यात राजकीय जागृती झाली ही आनंदाची बाब आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे नांदेड जिल्ह्यात आगमन होताच माळेगाव यात्रा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. लोहा विधानसभा मतदार संघात वंचित "कडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले .तसेच भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाच्या वतीने त्याचे जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यात आले. माळाकोळी येथे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्त आयोजित ओबीसी मेळाव्यास ऍड प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केले.वंच...
Ad Prakash Ambedkar : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची भूमिका – एड प्रकाश आंबेडकर-NNL

Ad Prakash Ambedkar : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची भूमिका – एड प्रकाश आंबेडकर-NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| ओबीसी आणि मराठा ताट वेगळे आहे, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची भूमिका आहे. जर आमच्या हातात सत्ता आली तर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा वेगळा मार्ग आम्ही काढू. मात्र मराठा व ओबीसी समाजातील ‎वादाचा फायदा सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी ‎घेत आहेत. महाराष्ट्राचे मणिपूर करू ‎‎नका, हे शरद पवार यांचे वक्तव्य ‎आग लावणारे आहे. तसेच ‎‎आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र‎ मोदींकडे जावे, जागा वाढवून घ्या,‎असे ठाकरे यांचे वक्तव्य‎ चिथावणीखोर आहे. असा आरोप‎ एड प्रकाश आंबेडकर यांनी केला‎ आहे. ते आरक्षण बचाव यात्रेच्या मंचावरून बोलत होते. ‎‎शुक्रवारी नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आल्यानंतर एड प्रकाश आंबेडकर यांचा जोरदार स्वागत करण्यात आलं. ‎ जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ‎माळेगाव येथून यात्रेला शुक्रवारी‎ प्रारंभ झाला. माळेगाव येथील प्रसिद्ध ‎श...
Dr prakash wankhede : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. प्रकाश वानखेडे यांची काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षपदी वर्णी -NNL

Dr prakash wankhede : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. प्रकाश वानखेडे यांची काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षपदी वर्णी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील माजी सरपंच, माजी चेअरमन, हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक डॉ. प्रकाश विठ्ठलराव वानखेडे यांची नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वर्णी करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बि. आर. कदम, यांच्या हस्ते दिनांक १ आगस्ट रोजी देण्यात आले आहे, त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातील नागरिकांतून त्यांचे अभिनंदन केले जाते आहे. एकेकाळी शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत असताना न्याय मिळाला नसल्याने शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेस पक्षामध्ये 15 वर्षांपूर्वी प्रवेश करून डॉक्टर प्रकाश वानखेडे यांनी एक निष्ठेने काँग्रेसचे काम केले आहे. काँग्रेसमध्ये काम करताना त्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाली होती. यातही त्यांनी सर्वसामान्य शेतक...
Dr. Ramesh Naik | डॉ. रमेश नाईक यांचा कळमनुरी मतदार संघात धावता दौरा – NNL

Dr. Ramesh Naik | डॉ. रमेश नाईक यांचा कळमनुरी मतदार संघात धावता दौरा – NNL

नांदेड, राजकीय, हिंगोली
हिंगोली/कळमनुरी| तालुक्यातील कनका गावचे भूमिपूत्र असलेले व प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. रमेश मस्के नाईक यांनी नुकतीच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी कळमनुरी मतदारसंघातील गावा-गावांत भेटी गाठी वाढवून नव्या राजकीय प्रवासाला चालना दिली आहे. 1990 पासून शिवसेनेशी डॉक्टर रमेश मस्के यांचे कुटुंब जोडले गेलेले आहे. हिंगोली जिल्ह्यात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्याचबरोबर कळमनुरीत निर्णायक असणाऱ्या व बहुतांश शिवसेनेशी निगडित असलेल्या हटकर समाजातून ते येत असल्यामुळे त्यांच्या प्रवेशाकडे सर्वच राजकीय धुरीणींचे लक्ष लागले होते. अत्यंत शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर रमेश मस्के हे सर्व दूर परिचित आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गोरगरीब आणि गरजू लोकांची सेवा केली आहे. मागील १८_२० वर्षापासू...
Mahesh Deshmukh | नांदेड उत्तर विधानसभेसाठी महेश देशमुखांची काॅग्रेसकडून दावेदारी – NNL

Mahesh Deshmukh | नांदेड उत्तर विधानसभेसाठी महेश देशमुखांची काॅग्रेसकडून दावेदारी – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाचे नांदेड शहर जिल्हा कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर यांनी आज पक्षाकडे केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटी च्यावतिने मतदारसंघनिहाय ईच्छूकांकडून अर्ज मागणी सुरु असल्याने आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पक्षाचे जिल्हाध्यक्ष बि.आर.कदम यांच्याकडे शहर जिल्हा कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर यांनी आपला मागणी अर्ज दिला आहे.यावेळी नांदेड दक्षिणचे आ.मोहन हंबर्डे,शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार,माजी उपमहापौर आनंद चव्हाण, अब्दुल गफार,आनंद कल्याणकर,बालाजी चव्हाण, अनु.जाती सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर, सत्यपाल सावंत,युवकचे शंकर शिंदे,दिपक हुजुरिया आदींची प्रमुख उपस्थिती होती. महेश देशमुख हे व...
error: Content is protected !!