Thursday, May 14

Collector will advise strict action against illegal sand transporters – Ashok Chavan | अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकारी देईन – अशोक चव्हाण – NNL

नांदेड| गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना या शासकीय रेती डेपोचा फायदा होत नसेल आणि डेपो चालक जरा रेती बाहेर पाठवून याचा वारेमाप उपयोग घेत असेल तर त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. शासनाचा महसूल बुडू नये हि देखील महत्वाची बाब आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकारी यांना देईन अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य महसूल प्रशासनाच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभधारकांना रेती ही अल्प दरात व घरकुलधारकांना मोफत देण्यात यावी. यासाठी शासकीय डेपोची उभारणी केली असून, डेपो मधून रेती सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभार्थ्यांना न मिळता ती रेती आंध्राप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, सोलापूर लातूर या ठिकाणी जात आहे.

ऑनलाइनच्या नावाखाली झिरो मध्ये म्हणजे ब्लॅक मध्ये रेतीची विक्री केली जाते आहे. याकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले असून, सर्वसामान्य नागरिकांत या डेपो चालकांवरती कारवाई करण्याची मागणी होत आहे, यावरती भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाली की, असाच प्रकार घडत असेल तर निश्चितपणाने कारवाई केली पाहिजे. याची संपूर्ण माहिती घेऊन मी जिल्हाधिकाऱ्यांना रेती डेपो चालकांवरती कडक कारवाई करण्याच्या सूचना देईन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!