Thursday, May 14

लाइफस्टाइल

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Municipal Corporation : नावा मनपाच्या अग्नीशामक दलाने दोन ठिकाणावरून अनेक नागरीकांना काढले

Municipal Corporation : नावा मनपाच्या अग्नीशामक दलाने दोन ठिकाणावरून अनेक नागरीकांना काढले

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| 25 रोजी गोदावरी नदी वरील प्रकल्पाचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्या कारणाने नदीला महापूर आला आहे व विष्णूपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडल्यामुळे व सकाळपासूनच पाऊस संततधार चालू असल्याकारणाने नांदेड शहरातील सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले यामध्ये श्रावस्ती नगर व समीराबाग येथील नगरामध्ये 12 ते 15 फूटा पर्यंत पाणी विसर्ग होत होते येथील नागरिकांमध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे भीती निर्माण झाली होती. येथील नागरिकांनी अग्निशमन विभाग नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांना ही माहिती दिली सदरील ठिकाणी अग्निशमन विभागाची एक रेस्क्यू टीम रबर बोट आउट बोट मशीन सहित श्रावस्ती नगर कडे रवाना झाली. ऊक्त ठिकाणी पाण्याचा प्रवाह जोरात असल्याकारणाने रबरी बोट आउट बोट मशीन सहित पाण्यात उतरवण्यात आली व श्रावस्ती नगर येथील 15 जणांना पाण्यातील प्रवाहापासून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. ...
Young Man killed by Lightening : सावळेश्वरला वीज कोसळून तरुण ठार: मयताच्या नातेवाईकांचे आ. चिखलीकरांकडून सांत्वन

Young Man killed by Lightening : सावळेश्वरला वीज कोसळून तरुण ठार: मयताच्या नातेवाईकांचे आ. चिखलीकरांकडून सांत्वन

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर ( माणिक भिसे ) नांदेड जिल्ह्यात वीजेचा कडकडाट व मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे वीज कोसळून एक तरुण शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. घटनेचे वृत्त समजताच आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथील तरुण शेतकरी पांडुरंग निवृत्ती कदम वय ४७ वर्षे हा शेताकडे गेला होता. सायंकाळी विजेच्या कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शेतातून घरी येत असताना गावाजवळील डांबरी रस्त्यावर पांडुरंग कदम यांच्या अंगावर वीज कोसळली ते जागीच ठार झाले. कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर हे पुरग्रस्त भागाचा दौरा आटोपून चिखली येथील आपल्या मळ्यात दाखल झाले होते. घटनास्थळ त्यांच्या मळ्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने...
Care and precautions : नागरीकांनी पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी व खबरदारी ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Care and precautions : नागरीकांनी पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी व खबरदारी ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| मागील २४ तासात नांदेड जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील २५ मंडळात अतिवृष्टी झालेली असून जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून सर्व धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग चालू आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सद्यस्थितीत विष्णुपुरी धरणाचे १६ दरवाजे उघडले असून प्रकल्पातून २,१९,२२९ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात चालू आहे. गोदावरी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीची पाणी पातळी सध्या ३५३.९० मी. एवढी आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यास प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात आज संध्याकाळपासून पुढील २४ तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली असून नदी, नाले, ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावातील नागरिकां...
Maratha community meets : नांदेडमध्ये मराठा समाजाची बैठक पार – कुणबी जात प्रमाणपत्रासाठी हेल्प डेस्कची मागणी

Maratha community meets : नांदेडमध्ये मराठा समाजाची बैठक पार – कुणबी जात प्रमाणपत्रासाठी हेल्प डेस्कची मागणी

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक हॉलमध्ये काल मराठा समाजाची महत्वाची बैठक पार पडली. नव्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने झालेल्या या बैठकीत समाज बांधवांच्या वतीने अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी, सामाजिक आंदोलनातून दाखल गुन्हे मागे घेणे, आतापर्यंत किती गुन्हे मागे घेण्यात आले आणि किती प्रलंबित आहेत यावर चर्चा झाली. विशेष म्हणजे, 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक नियमावली व प्रक्रिया स्पष्ट नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्प डेस्क सुरू करण्याची मागणी समाज बांधवांनी केली. समाज बांधवांचे म्हणणे आहे की, नांदेड जिल्ह्यात कुणबी नोंदीचे दस्तऐवज अत्यल्प प्र...
Health camp : स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत आरोग्य शिबीराचे आयोजन

Health camp : स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत आरोग्य शिबीराचे आयोजन

Blog, नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्रमाहूर, राज ठाकूर| केंद्र शासन व राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी नवरात्र महोत्सवाच्या दृष्टीने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत ग्रामीण रुग्णालय माहूर येथे दि २६ रोजी माता व बालकांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असुन आयोजित शिबिरात सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करून घ्यावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण कुमार वाघमारे यांनी केले आहे. उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शनात शिबिर होणार असून या आरोग्य शिबिरास प्रमुख उपस्थिती हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, आ. भीमरावजी केराम, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जेनीत चंद्रा दोन्थुला, तहसीलदार अभिजीत जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थिती राहणार आहे अशी माहि...
Pregnant woman dies : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रसूत महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

Pregnant woman dies : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रसूत महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

नांदेड, लाइफस्टाइल
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. थडी बोरगाव माहेर असलेल्या व नंदगाव (ता. मुखेड) येथे सासरी असलेल्या सोनाबाई मारुती गवते या महिलेची 19 सप्टेंबर रोजी मध्यरात्री प्रसूतीसाठी दाखल करण्यात आली होती. 20 सप्टेंबरच्या पहाटे साडेतीन वाजता तिची सिजेरियन प्रसूती झाली व मुलगा जन्माला आला. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या चुकीमुळे तिला अतिरक्तस्राव सुरू झाला. रक्तदाब अचानक कमी झाल्याने तिची प्रकृती बिघडत गेली. रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वतःच्या वाहनातून तिला नांदेडला हलवले. प्रथम गंगा हॉस्पिटलमध्ये नेले असता ऍडमिट न करता परत पाठवले. त्यानंतर यशोदा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी सोनाबाईला मृत घोषित...
Railway employee : नांदेड विभागात रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे सहकाऱ्याचे प्राण वाचले

Railway employee : नांदेड विभागात रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे सहकाऱ्याचे प्राण वाचले

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात 19 सप्टेंबर रोजी घडलेल्या धाडसी प्रसंगात रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे एका सहकाऱ्याचे प्राण वाचले. कर्तव्यावर असताना शुभाष आर. राठोड (OS/कार्मिक विभाग) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. या गंभीर स्थितीत तातडीने मदतीची गरज असताना, तेथे उपस्थित असलेले महारुद्र दिगोले (Sr. Section Officer/लेखा विभाग तसेच Civil Defence Instructor, SCR) यांनी त्वरित CPR दिला व श्वसनमार्ग साफ करून राठोड यांचे प्राण वाचवले. दिगोले यांनी NDRF नागपूर व Civil Defence/SCR संस्थेतून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या धैर्य, कौशल्य व तत्परतेमुळे सहकाऱ्याचे प्राण वाचणे शक्य झाले. यानंतर राठोड यांना नारायणा मल्टिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या प्रसंगी महेंद्र पकळे (Ch.OS) यांनीही महत्...
Be careful : उपवासाला भगर खाताना काळजी घ्या – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Be careful : उपवासाला भगर खाताना काळजी घ्या – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| उपवासाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भगरीचे सेवन केले जाते. मात्र, भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना पूर्वी घडल्या आहेत. पावसाळी वातावरणामुळे भगरीवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन विषारी द्रव्ये तयार होतात. अशा स्थितीत भगर खाल्ल्यास अन्न विषबाधा होण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी भगर खाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी घ्यायची काळजीभगर पॅकबंद व ब्रँडेडच घ्यावी. पॅकींग व अंतिम वापर दिनांक तपासावा. भगर स्वच्छ, कोरड्या डब्यात साठवावी. जास्त दिवस भगर व भगर पिठाचा साठा करू नये. भगर पिठाऐवजी खिचडीचे सेवन करावे. सलग उपवासात भगर व शेंगदाण्याचे अति सेवन टाळावे, कारण त्यामुळे ॲसिडिटी, मळमळ, पोटाचे त्रास उद्भवू शकतात. विक्रेत्यांसाठी सूचनाफक्त पॅकबंद भगरची विक्री करावी. खरेदी करताना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. मुदतबाह्य भग...
Nagar Panchayat : हिमायतनगर नगरपंचायतीकडून नागरिकांच्या मागणीला त्वरित प्रतिसाद

Nagar Panchayat : हिमायतनगर नगरपंचायतीकडून नागरिकांच्या मागणीला त्वरित प्रतिसाद

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर नगरपंचायतीने नागरिकांनी सोशल मीडियावर केलेल्या तक्रारीची तत्काळ दखल घेतली. उमरखेड रोडवरील अमोल मेडिकल आणि परमेश्वर बसस्थानक परिसरातील घाण सकाळी ९ वाजता स्वच्छता विभागाच्या वाहन व कर्मचाऱ्यांमार्फत उचलली आहे. नगरपंचायतीचे स्वच्छता विभाग प्रमुख श्री. बोकारे यांनी सांगितले की, शहरातील मुख्य चौकात घाण होणार नाही यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजचे आहे. नागरिकांनी वारंवार रस्त्यावर घाण न टाकता ती एका डब्यात किंवा बकेटमध्ये जमा करून नगरपंचायतीच्या वाहनातच टाकावी. असे केल्याने रस्त्यावर घाण व दुर्गंधी पसरणार नाही आणि शहर अधिक स्वच्छ व सुंदर राहील. घरामध्ये केरकचरा जमा करताना नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा जमा करून नगरपंचायतीच्या वाहनात टाकल्यास शहर नीटनेटके होण्यास आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यास मोठी मदत होईल. स्वच्छ शहर...
error: Content is protected !!