Thursday, May 14

लाइफस्टाइल

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Anandrao Deshmukh ; आनंदराव देशमुख यांचे निधन

Anandrao Deshmukh ; आनंदराव देशमुख यांचे निधन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l शहरातील मनपा वसाहत काबरा नगर येथील जेष्ठ नागरिक आनंदराव माणिकराव देशमुख शिरडकर (८६) यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी दि. (८) रोजी सकाळी ९वाजता मनपा वसाहत येथून निघणार असून गोवर्धन घाट स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. ते मनपा कर्मचारी मंगेश देशमुख यांचे वडील तर ॲडव्होकेट चंद्रशेखर देशमुख यांचे काका होत....
The plight of the cemetery : मामाच्या अंत्यसंस्कारावेळी झालेल्या त्रासानंतर भाच्याची जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्याकडे धाव

The plight of the cemetery : मामाच्या अंत्यसंस्कारावेळी झालेल्या त्रासानंतर भाच्याची जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्याकडे धाव

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर (प्रतिनिधी)  कंधार तालुक्यातील उस्माननगर (मोठी लाठ) येथील हिंदू वैकुंठ स्मशानभूमीच्या दयनीय अवस्थेमुळे शोकाकुल कुटुंबांना अंत्यसंस्कारावेळी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नुकत्याच आपल्या मामाच्या अंत्यसंस्कारावेळी आलेला विदारक अनुभव एका सामाजिक जाणिवेतून अतुल सुरेशराव सुपेकर या तरुणाने थेट जिल्हाधिकारी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाला निवेदन देत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. काय आहे नेमके प्रकरण? - अहिल्यानगर येथील रहिवासी असलेले अतुल सुपेकर यांचे मामा — आदर्श शिक्षक म्हणून परिचित स्व. विश्वासराव लोखंडे गुरुजी (वय ८४) यांचे ६ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार ७ ऑक्टोबर रोजी उस्माननगर स्मशानभूमीत करण्यात आला. यावेळी लोखंडे कुटुंबीयांना व उपस्थित नागरिकांना स्मशानभूमीच्या दुरावस्थेमुळे ...
victims of house collapse : गटविकास अधिकाऱ्यांच्या निष्क्रियेतेमुळे घरांच्या पडझड बाधीतांचा अहवाल पं.स.च्या कपाटात अडकला

victims of house collapse : गटविकास अधिकाऱ्यांच्या निष्क्रियेतेमुळे घरांच्या पडझड बाधीतांचा अहवाल पं.स.च्या कपाटात अडकला

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली. ग्रामपंचायती मार्फत पंचनामे करून ग्रामसेवक व सरपंचांनी गावनिहाय अहवाल पंचायत समितीकडे सादर केला. मात्र पंचायत समितीकडून सदरील याद्या व अहवाल तहसील कार्यालयास पोहोचलेच नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्तांचा अहवाल शासनाकडे सादर होऊ शकला नाही परिणामी अतिवृष्टीने बाधित झालेल्या लाभार्थीना मदत मिळण्यास विलंब झाला आहे. सोमवारी सरपंचांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेतल्यानंतर ही बाब उघडकीस आली. गटविकास अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे बाधित नागरिकांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. तहसील कार्यालयाच्या माहितीनुसार, पंचायत समितीने आठ दिवसांच्या कालावधीत अहवाल तहसील कार्यालयात सादर करणे बंधनकारक होते. तहसीलदार यांनी दोन ते तीन वेळा लेखी पत्राद्वारे याबाबत पत्रव्यवहार केला. उपविभागीय अध...
Nanded : जिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषणाच्या टेंटमध्ये विषारी साप!

Nanded : जिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषणाच्या टेंटमध्ये विषारी साप!

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या विविध मागण्यांच्या उपोषणादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास एक विषारी साप (डोम्या नाग) उपोषणार्थींच्या टेंटमध्ये शिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमारे रात्री २:४० वाजता ही घटना घडली. उपोषणार्थी गाढ झोपेत असताना साप टेंटमध्ये आला. सुदैवाने एक उपोषणार्थी जागा होता, त्याने तत्काळ साप पाहून इशारा दिल्याने अनर्थ टळला. अन्यथा गंभीर घटना घडली असती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्या डीवायएफआय युवक संघटना आणि सीटू कामगार संघटना यांचे उपोषण सुरू आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मदत, घरकुल घोटाळा चौकशी, आरडीसीच्या चपराश्याची हाकालपट्टी, वझरा शेख फरीद येथील पेसा ग्रामसभेच्या ठरावानुसार घरकुलासाठी ५ लाखांची मंजुरी, तसेच नांदेड रेल्वे पोलिसांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या जबरदस्तीच्या वसुली प्रकरणी कारवाई या आणि इतर मागण्यांसाठी उपोषण चालू आहे. सीटू व माक...
Sharad Deshpande : ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी परंपरा : शरद देशपांडे

Sharad Deshpande : ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी परंपरा : शरद देशपांडे

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी भारतीय परंपरा आहे. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी केले. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मराठवाडा प्रादेशिक विभाग (उ) नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अशोक तेरकर, मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ म...
Patanjali ; पतंजली तर्फे ज्येष्ठ नागरिक व अपंगासाठीचे निशुल्क विशेष योग शिबिर संपन्न

Patanjali ; पतंजली तर्फे ज्येष्ठ नागरिक व अपंगासाठीचे निशुल्क विशेष योग शिबिर संपन्न

नांदेड, लाइफस्टाइल
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पतंजली योग परिवार नांदेड तर्फे ज्येष्ठ नागरिक व अपंगासाठी च्या निशुल्क योग शिबिरात ची सुरुवात आज 1 ऑक्टोबर रोजी चंदिराम अँड सन्स रजिस्ट्री ऑफिस शेजारी स्टेडियम रोड नांदेड ठिकाणी सकाळी 6.00 वाजता माननीय श्री डॉक्टर हंसराज वैद्य, अशोक जी तेरकर, डॉक्टर सौ निर्मला कोरे, गोवर्धन अग्रवाल, नारायणलाल कलंत्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी सविता गबाळे, शिवाजीराव शिंदे हळदेकर, राम रंगनानी, सुनीता तेरकर, शंकर स्वामी तुपकरी, निर्मला बाराळे, संभाजी राजुरे, सरोजनी कलंत्री, दिगंबर पाटील, किशन वंगाल आदी मान्यवर उपस्थित होते असे अनिल अमृतवार यांनी सांगितले....
Vishnupuri project : 2 लाख 90 हजार क्यूसेकच्या महापुरावर विष्णुपुरी प्रकल्पातून नियंत्रण

Vishnupuri project : 2 लाख 90 हजार क्यूसेकच्या महापुरावर विष्णुपुरी प्रकल्पातून नियंत्रण

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड शहराची तहान भागवण्यासाठी, तीन तालुक्यांतील दुष्काळावर मात करण्यासाठी आणि नांदेड एमआयडीसीच्या विकासासाठी स्व. शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून विष्णुपुरी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मागील पंचवीस वर्षांपासून गोदावरी नदीला एवढा मोठा पूर कधीच आला नव्हता. साधारणतः दरवर्षी एक लाख ते सव्वा लाख क्यूसेक एवढा पूर येत असे. परंतु यंदा प्रथमच तब्बल 2 लाख 90 हजार क्यूसेक एवढा प्रचंड महापूर आल्याने प्रशासनासमोर अभूतपूर्व आव्हान उभे राहिले होते. परंतु जिल्हा प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीमुळे व विष्णुपुरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत केलेल्या विविध उपाययोजनांमुळे विष्णुपूरी प्रकल्पाच्या पूरपरिस्थतीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले आहे. 17 दरवाजे प्रथमच पूर्णपणे उघडले पूर्वी पूरनियंत्रणासाठी केवळ सव्वा लाख ते दीड लाख हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यासाठी काही दरवाजे उघडले जात असत. ...
Administration issues alert : नांदेड जिल्हा: नदीकाठच्या गावांना पुराचा धोका – प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Administration issues alert : नांदेड जिल्हा: नदीकाठच्या गावांना पुराचा धोका – प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 27 व 28 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जायकवाडी धरणातून 28 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजता 3,06,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. हे पाणी साधारण 36–40 तासांमध्ये शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पात पोहोचेल, त्यामुळे अंदाजे 30 सप्टेंबर रात्री 10 वाजता ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाण्याची पातळी 3,50,000 क्युसेक्स पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत शंकररावजी चव्हाण प्रकल्पाचे 17 दरवाजे उघडले असून 2,34,732 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीपात्रातील नांदेड जुना पूल येथे सध्याची पाणी पातळी 351.94 मीटर असून, इशारा पातळी 351.00 मीटर आहे. अंदाजे नांदेड शहराची धोका पातळी 354.00 मीटर ओलांडून 354.25 मीटर पर्यंत पोहचू शकते. तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. सद्यस्थितीत आवक 3,95,000 क्युसेक्स अ...
Farmer commits suicide : मुसळधार पाऊस आणि नदीला सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer commits suicide : मुसळधार पाऊस आणि नदीला सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर तालुक्यातील कोठा येथील शेतकरी अशोक विठ्ठल दवणे यांनी सोमवारी सायंकाळी आत्महत्या (Farmer commits suicide) केल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. शेतातील उभे राहिलेले थोडेफार पीकसुद्धा पैनगंगा नदीत इसापूर धरणाचे दरवाजे उघडून सोडण्यात आलेल्या पाण्यात वाहून गेले. परिणामी दवणे यांच्या शेतात तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. या पाण्यात शेतीतील गाळ, पाईप, साहित्य वाहून गेले तर उभे पीक शंभर टक्के नुकसानग्रस्त झाले. झालेला खर्च कसा परत करायचा, सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समजते. गावचे पोलीस पाटील गौतम दवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठा गाव नदीकाठावर असल्याने संपूर्ण शिवार पाण्याखाली गेले होते. या संकटातून मार्ग न दिसल्यानेच शेतकऱ्यांन...
CIDCO ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वसरणी येथील शंभर जणांचे स्थलांतर

CIDCO ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वसरणी येथील शंभर जणांचे स्थलांतर

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड l गोदावरी नदीच्या पात्रात सतत होणाऱ्या नदी पात्रात झाली वाढ पाहता नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या वसरणी भागातील पंचवटी व शंकरनगर भागातील जवळपास शंभर नागरीकांना जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वसरणी येथे स्थांलारीत करण्यात आले असून जेवणासह झोपण्याची व्यवस्था केली आहे, उपायुक्त गाढवे क्षेत्रीय अधिकारी मिर्झा बेग,कर निरीक्षक शेख शादुला हे या भागात परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत, कर्तव्यदक्ष पोलिस पाटील लवकुश अवनुरे व तलाठी राम मुंडे यांनी पाहणी केली आहे. 27 सप्टेंबर रोजी गोदावरी नदीच्या पाण्याची झालेली वाढ पाहता मनपाच्या क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने गोदावरी नदी काठोकाठ असलेल्या वसरणी भागातील पंचवटी व शंकरनगर भागातील अनेक निवासस्थानी पाणी शिरत असल्याने आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त नितीन गाढवे, या...
error: Content is protected !!