Shrawani Sarang Godre ; श्रावणी सारंग गोदरे (स्वामी) हिची RIMC डेहराडून साठी निवड – NNL
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून अर्थात RIMC साठी हिंगोली जिल्ह्यातील हिवरा बु.येथील कु.श्रावणी सारंग गोदरे (स्वामी) हिची निवड झाली आहे. त्याबद्दल तिचा हिंगोलीचे जिल्हाधिकारी मा.अभिनव गोयल साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मा संदिपकुमार सोनटक्के साहेब(EO), गटविकास अधिकारी बोंढारे साहेब, मा.नांदे साहेब(Beo) यांची प्रमुख उपस्थिती होती.
RIMC ही एक अतिशय अवघड परिक्षा समजली जाते. पूर्ण देशातून फक्त 30 विद्यार्थी या परीक्षेमधून निवडले जातात.
यात फक्त 5 मुली निवडल्या जातात. देशातील 5 अव्वल मुलींमध्ये श्रावणीची निवड झाली आहे.
लेखी,तोंडीआणि मेडिकल या तीन टप्प्यामधून ही परीक्षा घेतली जाते. अतिशय हाय स्टँडर्ड असलेली ही परीक्षा शालेय विद्यार्थ्यांसाठी मिनी UPSC समजली जाते.
RIMC ची स्थापना 1922 मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने केली आहे. RIMC मध्ये निवड होणारी महाराष्ट्र राज...









