हिमायतनगर| कलावंतांच्या न्याय हक्का करता सदैव तत्पर असलेल्या पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी गायक आनंदराव जळपते तर सचिव पदी ह. भ. प. पांडुरंग मिरासे, उपाध्यक्षपदी विश्वंभर वानोळे, कोषाध्यक्षपदी विजय वाठोरे, संघटक पदी अविनाश कदम, सहसचिव प्रताप लोकडे, सह संघटक म्हणून सिद्धू भाऊ कवडे, कार्यकारणी सदस्य जनार्दन मिरासे, गौतम राऊत, बालाजी राऊत ,बालाजी डोखळे, यांची पारंपारिक लोककला महोत्सव पोटा बुद्रुक तालुका हिमायतनगर येथे 14 आक्टोंबर रोजी झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात निवड केली आहे.


पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्न कुमार मा.भवरे कामारीकर, प्रदेश अध्यक्ष रमेश नारलेवाड, जिल्हाध्यक्ष बापूराव जमदाडे, जिल्हा सचिव शाहीर सुभाष गुंडेकर, सुप्रसिद्ध गझलकार मधु बावलकर आदीलाबाद.हदगाव तालुका अध्यक्ष शाहीर माधव वाढवे,पत्रकार रेहाण पठाण भोकर, प्रसिद्धी प्रमुख सुशील भाऊ भवरे, ह .भ .प .नागोराव मेंडेवाड, शाहीर शिवाजी डोखळे, शाहीर जळबा जळपते, शाहीर परमेश्वर वालेगावकर, शाहीर केशव माने अदि कलावंतांच्या उपस्थितीमध्ये पारंपारिक शाहीर लोकाला संवर्धन मंडळाची तालुका हिमायतनगर कार्यकारणी घोषित करण्यात आली.

या कार्यकारिणी निवडीपूर्वी पूर्वीची तालुका कार्यकारणी बरखास्त करण्यात येऊन नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या नवनिर्वाचित तालुका कार्यकारिणीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होताना दिसून येत आहे. गायक आनंदराव जळपते, ह .भ .प. पांडुरंग मिरासे यांचे सामाजिक सांस्कृतिक कार्यात मोठे योगदान आहे. त्या दृष्टीने त्यांनी कलावंताच्या एकजुटी करिता प्रयत्न करावे पारंपारिक शाहीर लोक कला संवर्धन मंडळाच्या हिमायतनगर तालुक्यात गाव तिथे शाखा स्थापन करून कलावंतांचे संघटन मजबूत करावे याकरिता संघटनेचे संस्थापक त्रिरत्नकुमार मा.भवरे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
