Traditional Shaheer Folk Art Conservation Board : पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ अध्यक्षपदी आनंदराव जळपते तर सचिव पदी पांडुरंग मिरासे यांची निवड -NNL
हिमायतनगर| कलावंतांच्या न्याय हक्का करता सदैव तत्पर असलेल्या पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी गायक आनंदराव जळपते तर सचिव पदी ह. भ. प. पांडुरंग मिरासे, उपाध्यक्षपदी विश्वंभर वानोळे, कोषाध्यक्षपदी विजय वाठोरे, संघटक पदी अविनाश कदम, सहसचिव प्रताप लोकडे, सह संघटक म्हणून सिद्धू भाऊ कवडे, कार्यकारणी सदस्य जनार्दन मिरासे, गौतम राऊत, बालाजी राऊत ,बालाजी डोखळे, यांची पारंपारिक लोककला महोत्सव पोटा बुद्रुक तालुका हिमायतनगर येथे 14 आक्टोंबर रोजी झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात निवड केली आहे.
पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्न कुमार मा.भवरे कामारीकर, प्रदेश अध्यक्ष रमेश नारलेवाड, जिल्हाध्यक्ष बापूराव जमदाडे, जिल्हा सचिव शाहीर सुभाष गुंडेकर, सुप्रसिद्ध गझलकार मधु बावलकर आदीलाबाद.हदगाव तालुका अध्यक्ष शाहीर माधव वाढवे,पत्रकार रेहाण पठाण भोकर,...
