Dr. Sharda Chondekar : डॉ. शारदा चोंडेकर तहसिलदार किनवट यांचा केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाद्वारे सत्कार
Dr. Sharda Chondekar Tehsildar Kinwat felicitated किनवट, परमेश्वर पेशवे| केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाद्वारे गुरुग्राम, हरियाणा येथे उच्चस्तरीय Intensive Orientation programme मध्ये भाग घेण्यासाठी भारतातील केवळ 32 अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. त्यामध्ये किनवटच्या तहसिलदार डॉ शारदा चोंडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ शारदा चोंडेकर, तहसिलदार या केंद्रशासनाच्या Recognized Trainer आहेत. त्यांना केंद्र शासनातर्फे उच्चस्तारीय प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून विविध राज्यात बोलावण्यात येते. आतापर्यंत त्यांना नवी दिल्ली,केरळ,तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, कर्नाटक इ राज्यात आमंत्रित करण्यात आले असून त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध वरिष्ठ अधिकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
सद्यस्थितीत कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या समन्वयाने क्षमता बांधणी आयोग व मिशन कर्मयोगी द्वार...









