Friday, May 15

Senior journalist Kanba Popalwar : पत्रकारांनी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करावे – ज्येष्ठ पत्रकार कानबा पोपलवार

हिमायतनगर,अनिल मादसवार| पत्रकारितेत सोशल मीडियामुळे मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. स्पर्धेत लगाम व भान ठेवने गरजेचे आहे. स्पर्धेमुळे इतरांचे नुकसान होणार नाही याची जण ठेऊन सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. चौथा आधार स्तंभ म्हणून सर्वसामान्य नागरिक मोठ्या अपेक्षेने पत्रकारांकडे समस्या घेऊन येतात. जनसामान्यात पत्रकारांची प्रतिमा कायम चांगली राहावी यासाठी अन्याय अत्याचाला वाचा फोडण्याचे काम करायला हवे. असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार कानबा पोपलवार यांनी केले. ते हिमायतनगर येथील ज्येष्ठ पत्रकार श्री परमेश्वर गोपतवाड यांची नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आणि ओबीसी समाजाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री परमेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

मराठी पत्रकार संघाचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलींद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, विभागीय सचिव शिवशेंद्रे, सचिन अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष विजय जोशी, माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. प्रदीप नागापूरकर, गोवर्धन बियाणी व जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या शिफारशीने नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची जंबो कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारणी मध्ये हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागातील पत्रकारांना स्थान देण्यात आले असून, हिमायतनगर येथील दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांची ग्रामीण जिल्हा संघटकपदी नियुक्ती करून त्यांच्यावर जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी टाकली आहे. 

IMG 20250618 142910 Senior journalist Kanba Popalwar : पत्रकारांनी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करावे - ज्येष्ठ पत्रकार कानबा पोपलवार

तसेच ओबीसी समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक नामदेव आयलवाड यांच्या सूचनेवरून ओबीसी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस.जी.माचनवार, जिल्हाध्यक्ष गोविंद फेसाठे यांनी ओबीसी समाजाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांची निवड केली आहे. त्याबद्दल बुधवार दिनांक १८ रोजी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.

यावेळी जेष्ठ पत्रकार कानबा पोपलवार म्हणाले कि, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकारिता हे प्रभावी साधन आहे. सामाजिक सुधारणा पत्रकारितेतून घडत असते. आत्मविश्वास व चांगले संस्कार असल्यामुळे पत्रकार कठीण परिस्थितीतही काम करतो. अश्या पत्रकारावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे. हिमायतनगर तालुक्यात पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत करून पत्रकारावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात सडेतोड भूमिका घेणार खंबीर नेतृत्व जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांच्या माध्यमातून मिळालं आहे. तर ओबीसी समाजाच्या हितासाठी तळमळीने काम करणारं एक नेतृत्व मिळालं अशी भावना त्यांनी व्यक्त करत पुढील कार्यसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सेवानिवृत्त अधीक्षक मारोती चांदराव जाधव, सरपंच लक्ष्मण मांजरे, शेषराव वानखेडे, जेष्ठ पत्रकार पांडुरंग गाडगे, ज्ञानेश्वर पंदलवाड, अनिल मादसवार, नागोराव शिंदे, आदींसह अनेक पत्रकार बांधव व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!