birth anniversary of Late Vasantrao Naik किनवट, परमेश्वर पेशवे | हरित क्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व वसंतरावजी नाईक यांच्या 112 व्या जयंती निमित्त ईस्लापूर येथील सदगुरु श्री सेवालाल महाराज चौक येथे दि.1जुलै मंगळवार रोजी या कार्यक्रमाचे आयोजन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.


यावेळी सर्वप्रथम स्व वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन नारायण शिंनगारे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या नंतर स्व वसंतरावजी नाईक यांच्या जीवन चरित्रावर सखोल मार्गदर्शन करत इस्लापूर शहरातील सोसायटी कॉम्प्लेक्स या ठिकाणी उपस्थित समाज बांधवांच्या वतीने वेगवेगळी झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमास शिवराम जाधव, मनोज राठोड, प्रशांत डांगे, सायबु गुंजकर, कृष्णा राठोड, तुकाराम बोनगीर ,परमेश्वर पेशवे, मारोती शेळके, गौतम कांबळे ,विलास भालेराव ,रवी पाटील, प्रमोद पलीकोंडावार, प्रमोद राठोड,ज्ञानेश्वर राठोड, किशोर जाधव सुभाष कोस्केवाड,गणेश गावंडे, श्याम तुप्तेवार, बाळू गिरी शंकर राठोड, प्रफुल चव्हाण, डॉ दता राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार ईश्वर जाधव यांनी मानले. ईस्लापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय व अन्य विद्यालय शासकीय कार्यालये या ठिकाणी देखील स्व. वसंतरावजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
